D. Pharmacy कशी करायची ?

D. Pharmacy कशी करायची ?

         D. Pharmacy कशी करायची  मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपण आयुष्यात खूप मोठे व्हावे व काहीतरी चांगली गोष्ट करावे. आता या तुमच्या प्रयत्नांना मिळणार आमची पूर्ण साथ… तसेच यामध्ये अनेकांची काही इच्छा असते की आपण डॉक्टर (Doctor) बनावे? इंजीनियरिंग (Engineering) बनावे? किंवा फार्मसिस्ट (Pharmacist) बनावे? अशा अनेक क्षेत्रात आपण जावे असे अनेक विद्यार्थ्यांना वाटते. आणि अशाच प्रकारे आपल्या सर्वांची इच्छा व आपल्या भविष्याबाबत ची काही मोठी स्वप्ने असतात. चला तर पाहुयात अशाच वरील एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच फार्मसिस्ट (Pharmacist) कसे बनावे? किंवा D फार्मसी (D. Pharmacy) कशी करायची?

D. Pharmacy
D. Pharmacy

           विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहुयात आजच्या या लेखामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर मुद्देसूदपणे आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे फार्मसिस्ट (Pharmacist) कसे बनावे?  किंवा D फार्मसी कशी करायची? म्हणजेच मेडिकल फील्ड मध्ये कसे जावे? तेथे जाण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता लागते? कोणती परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते? फार्मसिस्ट Pharmacist कोण असतो? व त्याची भूमिका काय असते? त्यांचे काम काय आहे? आणि डी फार्मसी (D Pharmacy) बद्दलची पूर्ण माहिती काय आहे? डी फार्म (D Pharm) म्हणजे काय असतं? व डी फार्म (D Pharm) किती वर्षाचा कोर्स असतो? अशाच अनेक सर्व गोष्टींचा किंवा बाबींचा आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत किंवा समावेश करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सर्वांना फार्मसिस्ट कसे बनावे व कशी करायची आणि त्या मध्ये किती प्रकार आहेत अशाच अनेक गोष्टी यामध्ये आपण पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला फार्मसिस्ट बनवण्यासाठी योग्यता किंवा पात्रता असणे आवश्यक असते? आपल्याला कोणती कोणती परीक्षा द्यावी लागते? अशा काही अनेक गोष्टी / बाबीं आहेत जे की तुम्हाला माहित नसते ते आपण आज या लेखात सर्व काही पाहणार आहोत. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आज त्या लेखातून मिळेल. भविष्यात आपण ही एक फार्मसिस्ट (Pharmacist) बनण्याच्या तयारीला लागू शकू…

D. Pharmacy प्रवेश हायलाइट्स.

 डी फार्मसी (D Pharmacy) प्रवेशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :-

                     श्रेणी     मुख्य हायलाइट [ Major Highlights]
पातळी डिप्लोमा ( Diploma)
कालावधी              2 वर्ष
परीक्षा प्रकार             सेमिस्टरनिहाय परीक्षा / सत्र
पात्रता             10 + 2 किंवा समकक्ष
प्रवेश प्रक्रियागुणवत्ता (Merit Base) प्रवेश आधारित (Enterance Base)
कोर्स फी             4,000/ to 5,50,000/ वर्ष

           आपण आजच्या या लेखामध्ये खाली दिल्या प्रमाणे किंवा या अनुक्रमे नुसार काही मुद्दे पाहणार आहोत..

१) डी फार्मसी (D. Pharmacy) काय असते? व त्यांचे कार्य काय असते?

२) डी फार्मसी (D. Pharmacy) व बी फार्मसी (B Pharmacy) या दोघांमध्ये काय फरक आहे?

३) डी फार्मसी (D. Pharmacy) करण्यासाठी आपली काय शैक्षणिक योग्यता तसेच पात्रता (Eligibility Criteria) असावी लागते.

४) डी फार्मसी (D. pharmacy) करण्यासाठी किंवा फार्मसिस्ट (Pharmacist) बनण्यासाठी कोणती पुस्तके अभ्यासावी लागतात?

५) डी फार्मसी (D. Pharmacy) ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी किंवा उत्तीर्ण व्हावी लागते?

६) डी फार्मसी D. Pharmacy साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?

७) अंतिम निष्कर्ष :-

१) डी फार्मसी (D. Pharmacy) काय असते? व त्यांचे कार्य काय असते?

        मित्रांनो, डी फार्मसी (D Pharmacy) म्हणजे बारावी नंतर दोन वर्षाचा केला जाणारा कोर्स म्हणजे डी फार्मसी (D Pharmacy) होय. आणि त्यांचे कार्य म्हणजे दोन वर्ष डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच (D Pharmacy) केल्यानंतर त्यांना स्वतःचा मेडिकल सुद्धा काढता येतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये फार्मसिस्ट (Pharmacist) म्हणून काम करू शकतो.

२) डी फार्मसी (D. Pharmacy) व बी फार्मसी (B Pharmacy) या दोघांमध्ये काय फरक आहे?

          मित्रांनो, डी फार्मसी व बी फार्मसी हा दोन्ही कोर्स आपल्याला दिसायला जरी सारखा असला किंवा दोन्ही समान शब्द असतील तरी त्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे.

         डी फार्मसी (D Pharmacy) हा बारावीनंतर केला जाणारा दोन वर्षाचा हा कोर्स असतो. बी फार्मसी (B Pharmacy) हा बारावीनंतर चार वर्षाचा हा कोर्स आहे. या कोर्सनंतर आपणाला डी फार्मसी (D Pharmacy) च्या विद्यार्थ्यांना शिकवता येतो.

३) डी फार्मसी (D Pharmacy) करण्यासाठी आपली काय शैक्षणिक योग्यता तसेच पात्रता (Eligibility Criteria) असावी लागते.

           मित्रांनो डी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी आपल्याला दहावीनंतर अकरावीला विज्ञान शाखेला (Science Stream) प्रवेश घेणे गरजेचे असते. हा कोर्स बारावीनंतर म्हणजेच (10+2) केला जातो. व या कोर्ससाठी आपली पात्रता कमीत कमी (10+2) असायला हवी.आणि भौतिकशास्त्र Physics, रसायनशास्त्र Chemistry व जीवशास्त्र (Biology) म्हणजेच PCB ग्रुप या मुख्य विषयांचा अभ्यास केला असावा. डी फार्मसी (D Pharmacy) साठी विद्यार्थ्याला कमीत कमी किमान एकूण 50% – 55% Marks गुणांची आवश्यकता असते. 

४) डी फार्मसी (D pharmacy) करण्यासाठी किंवा फार्मसिस्ट (Pharmacist) साठी कोणती पुस्तके अभ्यासावी लागतात?

            मित्रांनो, डी फार्मसी करण्यासाठी किंवा डी फार्मसी ला कोणते विषय अभ्यासायला असतात. हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. आम्ही तुम्हाला काही फार्मसी बद्दलचे कोणते विषय असतात. खाली नावे सूचित केले आहे.

  • Anatomy
  • Physiology
  • Community pharmacy
  • Biochemistry
  • Pharmaceutics
  • Chemistry

इत्यादी या विषयांचा अभ्यास केला जातो ‌.

५) डी फार्मसी (D Pharmacy) ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी किंवा उत्तीर्ण व्हावी लागते?

             मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेलच की डी फार्मसी ला ऍडमिशन कसे मिळवावे व त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते. तर महाराष्ट्र सीईटी सेल मार्फत परीक्षा घेतली जाते म्हणजेच CET (Common Entrance Test) MHT CET ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दोन वर्षापूर्वी ऑफलाइन घेतली जात होती तर आता ती परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. याचे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू (MCQ) पद्धतीने घेतली जाते. यामध्ये पीसीबी(PCB), पीसीएम(PCM), पीसीएमबी (PCMB) अशी ग्रुप नुसार असते. ही परीक्षा 200 मार्काची असते प्रत्येकी एका प्रश्नाला एक गुण असतो. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसते. व ती परीक्षा आपणाला उत्तीर्ण व्हावी लागते.

६) डी फार्मसी साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?

            मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की डी फार्म ला प्रवेश प्रक्रिया कशी असते तर सामान्यता सर्व संस्थांमध्ये म्हणजेच खाजगी किंवा सरकारी कॉलेजेस मध्ये प्रवेश-आधारित (Entrance Based)किंवा गुणवत्ता-आधारित (Merit Based) अशा या दोन प्रकारे प्रवेश दिला जातो.

1] Enterance Based Admission :-

             ही परीक्षा प्रवेशाच्या अंतर्गत दोन लोकप्रिय प्रकारच्या प्रवेश परीक्षा असतात. म्हणजेच सामान्यता वेगवेगळ्या राज्यात घेतला जातो. म्हणजेच ही परीक्षा राज्यस्तरीय आणि विद्यापीठ स्तरीय प्रवेश परीक्षा घेतली जाते.

2] Merit Based Admission :-

             मित्रांनो येथे विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या आवडीच्या विद्यापीठात किंवा महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल तर संबंधित महाविद्यालयाच्या प्रवेश समितीने बनवलेल्या प्रवेश प्रोटोकॉल च्या अनुसरून प्रवेश दिला जातो. तसेच यामध्ये प्रवेश घेण्यासाठी निवड प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मुलाखत आधारित निवड प्रक्रिया सुद्धा समाविष्ट असू शकतो.

७) अंतिम निष्कर्ष :-

             मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण डी फार्मसी (D Pharmacy) कशी करावे? किंवा डी फार्मसी (D Pharmacy) कशी करायची? तसेच डी फार्मसी ला ऍडमिशन मिळविण्यासाठी काय करावी लागते? व त्यासाठी किती शिक्षण घ्यावे लागते? ऍडमिशन साठी कोणती परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण होणे गरजेचे असते. अशा अनेक सर्व गोष्टी आपण आज या लेखांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

             तरी हा लेख तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या जवळच्या व वर्गातील सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही डी फार्मसी (D Pharmacy) कशी करायची? किंवा डी फार्मसी (D Pharmacy) कसे करावे? हे कळेल व त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते हेही कळेल. आणि डी फार्मसी ची प्रवेश प्रक्रिया कशी असते इत्यादी अशा अनेक गोष्टी कळेल. व त्यांनाही या लेखाच्या द्वारे डी फार्मसी (D Pharmacy) कशी करायची? हे कळेल.

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे ?

ca information in Marathi 2021

6 thoughts on “D. Pharmacy कशी करायची ?”

  1. Sir mi civil engineering Polytechnik clear kele ahe…ani mala degree la 2nd year la Addmission ghyaychi ahe sir confusion as ahe ki mala top university made Addmission kase gheta yeil?

    Reply

Leave a Comment