पत्रकार होण्यासाठी काय करावे? | How to Become Patrakar in Marathi
How to Become Patrakar in Marathi: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जात असतो.आजकाल आपण प्रत्येक जण रोज सकाळी चहा पिण्याबरोबरच वर्तमानपत्र देखील वाचत असतो.वर्तमानपत्रांमध्ये छोटे मोठे मथळे हे लेखकांनी लिहिलेले असतात आणि काही लेख स्वत: त्या वर्तमानपत्रात कार्यरत असलेल्या पत्रकाराने लिहिलेले असतात ज्यात तो भष्टाचारासारख्या कायद्याच्या विरूदध असलेल्या घटना प्रसंगाविरूदध आपल्या लेखणीद्वारे मवाळ तसेच जहालपणे देखील आवाज उठवत असतो.
आजच्या लेखातुन आपण पत्रकाराविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.ज्यात आपण पत्रकार आणि पत्रकारितेविषयी सखोलपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पत्रकार कोण असतो?आणि पत्रकारीता काय असते?
पत्रकार हा एक असा व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळया घटना,प्रसंगांविषयी, भ्रष्टाचाराविषयी वेगवेगळया माध्यमांचा आधार घेऊन माहीती गोळा करत असतो आणि समाजातील लोकांपर्यत ती पोहचविण्याचे काम करत असतो.आणि ह्याच व्यवसायाला पत्रकारिता असे म्हटले जात असते.
पत्रकारांचे प्रकार किती असतात आणि ते कोणकोणते असतात?
तसे पाहायला गेले पत्रकार हा एकच प्रकारचा नसतो त्यांचे देखील काही प्रकार असतात.जे त्यांच्या कार्यानुसार पडत असतात.ते प्रकार पुढीलप्रमाणे असतात:
1) शोध पत्रकार :
2) क्रिडा पत्रकार:
3) मनोरंजनाच्या क्षेत्रातील पत्रकार :
4) आर्थिक क्षेत्रातील पत्रकार :
5) गुन्हे गारी विरूदध काम करणारे पत्रकार
6) बाल पत्रकार
7) महिला पत्रकार
How to Become journalist in Marathi
1) शोध पत्रकार : शोध पत्रकार हा एक असा पत्रकार असतो जो कोणत्याही विषयावर आधी संशोधन करतो,त्याची कसुन चौकशी तसेच तपासणी करतो मग त्यावर न्युज तयार करत असतो.किंवा वर्तमानपत्रात लेख लिहित असतो.
2) क्रिडा पत्रकार: आज पाहायले गेले तर खेळ हे नुकतेच मनोरंजनाचे साधन राहिले नाहीये तर ते आपल्या शारीरीक तसेच बौदधिक विकासाचे माध्यम बनले आहे.आणि ह्याच क्रिडाक्षेत्राचा प्रचार प्रसार करण्याचे काम एक क्रिडा पत्रकार करत असतो.आणि आणि ह्याच कारणामुळे क्रिडा क्षेत्राला एवढी जगभर प्रसिदधी प्राप्त झालेली आहे.
3) मनोरंजनाच्या क्षेत्रातील पत्रकार : दर महिन्याला आठवडयातुन एकदा तरी आपल्याला रोजच्या वर्तमानपत्राबरोबरच एक पुरवणी देखील मिळत असते.ज्यात लहान मुलांसाठी मनोरंजनपर कथा कविता येत असतात.तसेच टिव्ही मालिकेत काम करत असलेल्या नट नटींविषयी माहीती देण्याचे काम हे पत्रकार करत असतात.
4) आर्थिक क्षेत्रातील पत्रकार : ह्या प्रकारच्या पत्रकारांमध्ये अशा पत्रकारांचा समावेश होतो ज्यांना अर्थव्यवस्थेविषयी चांगले ज्ञान असते.ज्यांना सेंसेक्स तसेच शेअर मार्केटसारख्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेल्या क्षेत्रांचे उत्तम प्रकारचे ज्ञान असते.
5) गुन्हे गारी विरूदध काम करणारे पत्रकार : समाजात ज्या अमानवीय घटना घडत असतात जसे की हत्या,बलात्कार,अपहरण भ्रष्टाचार अशा घटनांविरूदध आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करून त्याविरूदध आवाज उठविणे हे एक क्राईम रिपोर्टरचे म्हणजेच गुन्हेगारी विरूदध काम करत असलेल्या पत्रकाराचे काम असते.
6) बाल पत्रकार : हा एक असा पत्रकार असतो जो लहान मुलांच्या आरोग्याविषयी,त्यांच्या संगोपणाविषयी,त्यांच्या खेळण्याविषयी माहीती पोहचविण्याचे काम करत असतो.
7) महिला पत्रकार : महिला पत्रकार ह्या महिलांच्या अधिकारासाठी लढण्याचे काम करत असतात.त्यांच्या सर्व समस्या सोडवत असतात.महिलांविरूदध होत असलेल्या अनयायाविरूदध ह्या पत्रकार आवाज उठवण्याचे कार्य करत असतात.
एका उत्तम पत्रकाराच्या अंगी कोणती कौशल्ये, कोणते गुण असणे गरजेचे असते?
- एका पत्रकाराने आपल्या पत्रकारितेच्या सर्व नियम तसेच सिदधांताचे पालन करायला हवे.
- एका पत्रकाराने कोणत्याही सामाजिक,राजकीय दबावांना तसेच प्रलोभनांना बळी न पडता तटस्थपणे समाजासमोर सत्य बातमी मांडायला हवी.
- एक पत्रकाराचे आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व असणे गरजेचे असते.
- एका पत्रकारामध्ये नेहमी जिज्ञासु आणि संशोधक वृत्ती असणे गरजेचे असते.
- एका पत्रकाराला सामाजिक,धार्मिक,तसेच राजकीय अशा सर्व क्षेत्रांचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे असते
फ्रिलान्स पत्रकार कोण असतो?फ्रिलान्स पत्रकार कसे बनावे?
फ्रिलान्स पत्रकार हा एक असा पत्रकार असतो जो एक स्वतंत्र पत्रकार म्हणुन ओळखला जात असतो.
फ्रिलान्स पत्रकार हा कोणत्याही वर्तमानपत्रात पत्रकार म्हणुन नोकरी करत असतो.तो आपल्याला हव्या त्या ठिकाणी बसुन हव्या त्या वेळात एखाद्या न्युज चँनलसाठी,वर्तमानपत्रासाठी फ्रिलान्स पत्रकारीतेचे काम करत असतो.
ह्यात आपल्याला फक्त वेगवेगळया न्युज चँनलशी तसेच वर्तमानपत्रांशी संपर्क साधुन त्यांना फ्रिलान्सर पत्रकार हवा आहे का नाही याची विचारपुस करावी लागत असते.ज्यांना फ्रिलान्स पत्रकाराची गरज असते ते न्युज चँनल आपल्याला नक्की हायर करत असतात.
पत्रकाराची नोकरी आपल्याला कशी आणि कुठुन मिळत असते?
आपल्याला जर प्रिंट मिडियामध्ये पत्रकार म्हणुन नोकरी करायची असेल तर सगळयात आधी आपल्याला त्या क्षेत्राचा अनुभव प्राप्त होण्यासाठी एखादी इंटर्नशिप करावी लागत असते.किंवा त्या संबंधीत एखादा कोर्स करावा लागतो.मग त्यानंतर आपण कोणत्याही न्युज चँनल तसेच वर्तमानपत्रात नोकरीसाठी अर्ज देखील करू शकतो.
पत्रकाराचे वेतन काय असते?
प्रत्येक पत्रकाराचे वेतन हे कधीच सारखे नसते.कारण प्रत्येक पत्रकाराचे वेतन हे त्याचे त्या क्षेत्रातील अनुभव तसेच त्याच्या कौशल्यानुसार त्याला प्राप्त होत असते.म्हणुन आपण पत्रकाराचे फिक्स वेतन किती असते हे सांगु नही शकत.पण साधारणत सुरुवातीला १५ ते २० हजार सुरूवातीला पत्रकाराला वेतन दिले जात असते.
पत्रकार बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे असते?
- पत्रकार बनण्यासाठी बारावीनंतर आपण मास कम्युनिकेशन मध्ये तसेच जर्नलिझम (bachelor of mass communication,bachelor of journlism मध्ये पदवी घेणे आवश्यक असते.मग त्यानंतर आपल्याला जर मास्टर करायचे असेल तर आपण मास कम्युनिकेशन मध्ये मास्टरची पदवी(master of journalism देखील घेऊ शकतो.
- याचसोबत आपण जर्नलिझममध्ये डिप्लोमा(diploma in journalism) तसेच इंटर्नशिप कोर्स देखील करू शकतो.
पत्रकाराची जबाबदारी तसेच कर्तव्य काय असते?
- समाजात घडत असलेल्या अनैतिक अमानवीय जसे कुठेही घडत असलेल्या तसेच घडलेल्या चोरी,लुट भष्टाचार,हत्या,अपहरण,भ्रष्टाचारासारख्या घटना प्रसंगाविषयीचे समाजासमोर सत्य चित्र मांडणे हे एक पत्रकाराचे कर्तव्य आणि जबाबदारी देखील असते.
- आणि आपली कोणतीही बाजु मांडताना पत्रकाराने ती निपक्षपातपणे समाजासमोर मांडायला हवी.
पत्रकारीतेचे शिक्षण देत असलेल्या काही संस्थांची नावे :
- इंडियन इंस्टीटयुट आँफ मास कम्युनिकेशन
- एशियन काँलेज आँफ जर्नलिझम
- झेवियर इंस्टीटयुट आँफ मस कम्युनिकेशन
- सिंबाँसिस इंस्टीटयुट आँफ मास कम्युनिकेशन
पत्रकार म्हणुन करिअर करण्यात स्कोप आहे का?आहे तर किती स्कोप आहे?
पत्रकारितेचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर अशा खुप सरकारी तसेच खासगी न्युज वेबसाईट तसेच न्युज चँनल्स आहेत जिथे आपण पत्रकार म्हणुन काम करू शकतो.आणि आपल्याला हवे असेल तर आपण कुठेही जाँब न करता फ्रिलान्स पत्रकार म्हणुन देखील काम करू शकतो.आणि सध्या पाहावयास गेले तर फ्रिलान्स पत्रकारीतेला देखील खुप महत्व आज प्राप्त झालेले आहे.
पत्रकार बनण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
- आपण पत्रकार बनण्यासाठी भरपुर वाचन करायला हवे.वर्तमानपत्रे,मासिके पुस्तकांचे नियमित वाचन केले पाहिजे.टिव्हीवरील बातम्या बघितल्या पाहिजे जेणेकरून समाजात कुठे काय घडते आहे याची आपल्याला माहीती प्राप्त होत असते.
- नियमित न्युज लेखनाचा सराव केला पाहिजे.नवनवीन न्युज गोळा करणे आणि त्यावर रिपोर्ट तयार करण्याचा सराव केला पाहिजे.
- आपल्या लेखणात कोणत्याही व्याकरणिक चुका होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी.त्यासाठी आपण व्याकरणाचा देखील नीट अभ्यास करायला हवा.याने आपले आपल्या भाषेवरचे प्रभुत्व तसेच पकड देखील वाढत असते.
- आपल्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या पत्रकारांसोबत चर्चा केली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.त्यांच्यासोबत ज्ञानाची देवाणघेवाण केली पाहिजे.त्यांच्यासोबत सल्ला मसलत करायला हवी.
- लोकांशी उत्तम पदधतीने संवाद कसा साधायचा हे शिकले पाहिजे यासाठी कम्युनिकेशन स्कील डेव्हलप करण्याकडे देखील आपण लक्ष द्यायला हवे.
हे हि वाचा …
लेखक कसे बनावे? How to become a writer?
बी फार्मसी B Pharmacy कशी करायची ?
भारतातील पहिले । Bharatatil Pahile
Aditya jagdale