अर्थशास्त्र | MPSC economics question paper in Marathi | MPSC economics questions with solutions in Marathi

अर्थशास्त्र | MPSC economics question paper in Marathi | MPSC economics questions with solutions in Marathi

1. मध्यवर्ती राजकोषीय सुधारणा चा अंतिम उद्देश………..(Combine 2019).

अ) कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे.

ब) राजकोषीय तुटीत वाढ करणे.

क) चालू खात्यावरील तूट कमी करणे.

ड) अर्थसहाय्य कमी करणे.

पर्यायी उत्तरे

  • A) अ आणि ब
  • B) अबक
  • C) फक्त क
  • D) फक्त ड

उत्तर – C


2. केंद्र सरकारच्या ही अगोदर खालील पैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी (FRL ) कायदा अमलात आणला? (combine 2018 )

अ) उत्तर प्रदेश, पंजाब

ब) कर्नाटक, केरळ

क) तमिळनाडू

ड) पश्चिम बंगाल

खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे.

  • A) फक्त अ
  • B) अ ब आणि क
  • C) फक्त ब
  • D) फक्त ड

उत्तर – B) अ ब आणि क

  • कारण – 2016 मध्ये एफ. आर. बी. एम. साठी नवीन पाच सदस्यीय समिती गठित केली. त्याचे अध्यक्ष यांनी के.सिंग हे आहेत. एफ.आर.बी. एम. कायदा 2003 मध्ये करण्यात आला अंमलबजावणी 2004मध्ये झाली यापूर्वी कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश पंजाब या राज्यांनी यासाठी कायदे केले होते.

३. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? (PSI 2014)

  • A) आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे.
  • B) नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
  • C) अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
  • D) विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे.

उत्तर – C

  • कारण – सरकारने आपल्या अर्थसंकल्पात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेली तूट ज्या मार्गांनी भरून काढले जाते त्याला तुटीचा अर्थभरणा म्हणतात. भारतासारख्या विकसनशील देशासाठी तुटीच्या अर्थकारणाचा मर्यादित वापर अर्थव्यवस्थेस चालना देणारा ठरू शकतो त्याचा वापर उत्पादन वाढीस, रोजगार निर्मितीस, संसाधनांचा वापर होण्यास तसेच मागास भागात विकास प्रक्रिया चालू करण्यास होऊ शकतो.

४. सुखमय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन होण्यासाठी खालील पैकी कोणती संकल्पना योग्य आहे? (ASO 2014 )

  • A) महसुली तूट
  • B) राजकोषीय तूट
  • C) प्राथमिक तूट
  • D) वरीलपैकी कोणतीही नाही.
  •  

उत्तर – B 

  • कारण सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली 1997 98 मध्ये भारतीय चलन व्यवस्था विषयक समितीच्या शिफारशीनुसार वित्त मंत्रालयाने तुटीचा अर्थभरणा या तुटीचा वापर करणे सोडून दिली.
  • राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च आणि सरकारची स्वतःची जमा या दोघांमधील फरकाला राजकोषीय तूट म्हणतात. राजकोषीय तूट वाढत जाणे म्हणजे आर्थिक अस्थिरता वाढत जाणे होय.

5. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्‍यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. (Combine 2017)

अ)सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश.

ब) विकास बाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च.

वरीलपैकी कोणते बरोबर आहे?

  • A) अ
  • B) ब
  • C) अ आणि ब
  • D) कोणतेही नाही.
  • उत्तर – C कारण – भारतासारख्या विकसनशील तूटीच्या अर्थ भरण्याच्या मर्यादित वापर अर्थव्यवस्थेस चालना देणारा त्याचा वापर उत्पादनवाढीस रोजगार निर्मिती संसाधनांचा वापर होण्यास तसेच मागास भागात विकास प्रक्रिया चालू करण्यास होऊ शकतो.

६. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये……. चा समावेश होतो.

  • A) अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च
  • B) भांडवली प्राप्ती आणि भांडवली कर्ज
  • C) महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च
  • D) वरील सर्व तिनी प्राप्ती आणि खर्च
  • उत्तर – B MPSC Economics मध्ये हा प्रश्न महत्वाचा आहे.

7. भारतामध्ये तुटीच्या भरणे मध्ये पुढील गोष्टी येतात.(combine 2017)

अ) केंद्र सरकारने रिझर्व बँकेकडून घेतलेले कर्ज.

ब) बाजारात आणलेल्या सरकारी कुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठवलेली रोखीचे शिल्लक कमी करणे.

क) चलन निर्माण करणे.

  • A) अ आणि क
  • B) ब आणि क
  • C) अ आणि ब
  • D) वरील सर्व

उत्तर – वरील सर्व

  • कारण – सरकारने अर्थसंकल्पात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेली तूट ज्या मार्गाने भरून काढले जाते त्याला तुटीचा अर्थभरणा म्हणतात. भारतात तुटीचा अर्थभरणा मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. 
  • आरबीआयकडून घेतलेली कर्जे
  • नवीन चलन निर्मिती – सरकार आपले रोखे आरबीआय कडे पाठविते आरबीआय त्या आधारावर तेवढ्या प्रमाणात नोटा छापून सरकारला देते त्यामुळे नवीन पैसा निर्माण होत असतो.
  • स्वतःच्या संचित रोख पैशातून पैसे वापरणे.mpsc economics मध्ये हा प्रश्न महत्वाचा आहे.

8. अनुच्छेद …….अन्वये संसदेच्या दोन्ही सदना समोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते. (ASO 2016)

  • A) कलम 280
  • B) कलम 112
  • C) कलम 202
  • D) कलम 370

उत्तर – B 

  • कारण  अनुच्छेद 112 अनुसार संसदेच्या दोन्ही सदना समोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते. राज्य विधिमंडळासमोर अनुच्छेद 202 नुसार वार्षिक वित्तीय पत्रक मांडले जाते. अर्थसंकल्प प्रथम लोकसभेत मांडला जातो राष्ट्रपतींच्या शिफारशीने. mpsc economics मध्ये हा प्रश्न महत्वाचा आहे.

9. गार (GAAR) म्हणजे ?(STI 2015)

  • A) जागतिक करचुकवेगिरी विरोधातील नियम
  • B) अमेरिकन सामान्य लेखा नियम
  • C) जागतिक लेखा व परीक्षण नियम
  • D) सर्वसाधारण करचुकवेगिरी विरोधातील नियम

उत्तर – D

  • GAAR – General Anti Avoidance Rules
  • या विधेयकाला डायरेक्ट टॅक्स कोड प्रत्यक्ष कर संहिता म्हणूनही ओळखले जाते.
  • हे विधेयक 2010 मध्ये मांडण्यात आले मात्र ते संमत होऊ शकले नाही.
  • सर्व प्रत्यक्ष करांसाठी एकच संहिता असण्यासाठी हे विधेयक होते.

10. आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर…….            ( Combine 2017

  • A) वाढले.
  • B) कमी झाले.
  • C) ऋण झाले.
  • D) स्थिर राहिले.

उत्तर – कमी झाले.


11. वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (Psi 2016)

A)भारतीय राज्य घटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते.

B) चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ.Y.V. रेड्डी आहेत.

वरीलपैकी बरोबर विधान कोणते?

  • A) फक्त A
  • B) फक्त B
  • C) A आणि B
  • D) वरीलपैकी नाही.

उत्तर – C

  • कारण – भारतीय राज्य घटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. हा वित्त आयोग पाच वर्षासाठी कार्यरत असतो चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष रेड्डी हे आहेत. तर 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह हे आहेत. 15 वा वित्त आयोग दोन हजार वीस ते पंचवीस कालावधीसाठी आहे. mpsc economics मध्ये हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे.

12. स्थूल देशांतर्गत उत्पादन ( GDP ) चा अर्थ आहे.

(STI 2016)

  • A) स्थूल राष्ट्रीय उत्पादन
  • B) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
  • C) एका देशाच्या सीमेत तच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
  • D) सरकारी उत्पन्न

वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?

  • A) फक्त A
  • B) A आणि ब
  • C) फक्त C
  • D) फक्त D

उत्तर – फक्त C

  • कारण – स्थूल देशांतर्गत उत्पादन – एका वर्षाच्या कालखंडात एका देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत त्या देशातील नागरिकांनी व विदेशी नागरिकांनी उत्पादीत केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार किमतीनुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन.

13. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही? (STI 2016)

  • A) उत्पादन पद्धती
  • B) आयात निर्यात पद्धती
  • C) उत्पन्न पद्धती
  • D) खर्च पद्धती

उत्तर – B

  • कारण – राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत.
  • उत्पादन पद्धत देशाच्या आर्थिक क्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित त्यांची बेरीज केली जाते उत्पादन पद्धतीने काढलेल्या राष्ट्रीय उत्पन्न हे बाजार भावाला मोजले जाते.
  • खर्च पद्धत: राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप खर्च पद्धतीनेही करता येते त्यासाठी उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो.
  • उत्पन्न पद्धत: राष्ट्रीय उत्पादनाची मोजमाप उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पादनाच्या आधारावर केला जातो. उत्पन्न हे घटक किमतीवर मोजला जातो. वरील तीनही पद्धती mpsc economics मध्ये महत्वाच्या आहेत.

14.देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते?

A) लोक लेखा समिती

B) अंदाज समिती

C) सार्वजनिक उद्योग समिती

D) वरील सर्व

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? (ASO 2013)

  • A) फक्त A
  • B) A आणि B
  • C) B आणि C
  • D) वरील सर्व.

उत्तर – वरील सर्व


महाराष्ट्र पोलिस व सरळसेवा भरतीसाठी पुस्तकांची सूची

maha bharti new GR || maharashtra bharti 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “अर्थशास्त्र | MPSC economics question paper in Marathi | MPSC economics questions with solutions in Marathi”

Leave a Comment