महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा | MPSC Technical Services information in Marathi
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध सनदी सेवकांच्या निवडीसाठी विविध परीक्षा घेत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक घटनात्मक आयोग असून लोक सेवकांच्या निवडीचे काम प्रभावीपणे या आयोगाच्या माध्यमातून होत असते. maharashtra public service commission
maharashtra public service commission आयोगाकडून होणाऱ्या विविध परीक्षेमध्ये वेळोवेळी बदल केला जातो. मग हा बदल अभ्यासक्रमात असो, परीक्षापद्धतीत असो किंवा इतर कोणताही मुद्दा उमेदवार व परीक्षा या संबंधित असो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्यासाठी नागरी सेवा परिक्षा सोबतच इतर परिक्षांचे आयोजन करीत असतो.
त्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा,महाराष्ट्र दुय्यमसेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा प्रमाणे (PSI/STI/ASO) अशा विविध परिक्षा अंतर्भूत असतात.
18 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आणखी एका परीक्षा पद्धतीतील बदल सुचविण्यात आलेला आहे.महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
विविध परीक्षांमध्ये सद्यस्थितीत खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज भरतात. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा आयोगाला स्वतंत्र रीतीने घ्यावी लागत असते. त्यामुळे आयोग आवरती कामाचा ताण निर्माण होतो. सोबत परीक्षेची काठिण्यपातळी नियंत्रित ठेवणे हा सुद्धा एक कळीचा मुद्दा असतो.
राज्य लोकसेवा आयोग maharashtra public service commission परिस्थिती अनुरुप वेळोवेळी बदल करते .असाच बदल या प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे.
पाहुयात हा बदल आणि यातील महत्त्वाचे मुद्दे. mpsc technical combine exam
महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषि सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पद्धतीत बदल या प्रसिद्धीपत्रकात यामाध्यमातून सुचविण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग सार्वजनिक बांधकाम जलसंपदा पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ व गट- ब संवर्गातील भरती करिता आयोगाकडून सन 2020 पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती. तसेच सदर संवर्गाच्या परीक्षेकरिता उमेदवाराकडून स्वतंत्र अर्ज मागवण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात होते.
प्रस्तुत तीनही परीक्षांच्या योजना संदर्भात विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरती करिता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
ज्याप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षा अराजपत्रित गट-ब घेण्यात येते त्याचप्रमाणे राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीचा अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक दोन किंवा तीन ही परीक्षा करिता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प घेण्यात येईल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी अर्ज करत असताना निवड करायचे आहे की आपण किती परीक्षांना बसू इच्छितो.
संबंधित परीक्षेकरिता उमेदवाराने दिलेला किंवा दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील पद भरती करीता अर्ज समजण्यात येईल. याआधारे तसेच भरावयाच्या पद संख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्ग करता पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकत्रित होणार असली तरी त्याचा निकाल मात्र विभागानुसार वेगवेगळ्या लावण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यमसेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा प्रमाणे (PSI/STI/ASO) परीक्षा घेण्यात येणार आहे. निकाल सुद्धा स्वतंत्र रीतीने लावण्यात येणार आहेत.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गात करिता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत पात्रता वयोमर्यादा शुल्क निवडीची प्रक्रिया परीक्षा योजना अभ्यासक्रम इत्यादी बाबत सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी चा नवा बदल हा सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पासून पुढे लागू होईल असे आयोगाने कळवले आहे. maharashtra public service commission
सदर परीक्षा पद्धतीतील बदल उमेदवारांच्या खर्चामध्ये घट घडवून आणतो. कारण तीन परीक्षेला तीन स्वतंत्र अर्ज भरून तीन स्वतंत्र परीक्षेची तयारी करणे म्हणजे मानसिक व शारीरिक त्रास वाढवण्यासारखे होते. तीनही परीक्षांचा एकच फॉर्म भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खिशाला आर्थिक झळही बसणार नाही.
महाराष्ट्रातील सनदी सेवकांच्या नियुक्तीसाठी maharashtra public service commission महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोण कोणत्या परीक्षा घेते यासंदर्भातील व्हिडिओ येथे पहा. watch now महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
Latest Update – तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
siac mumbai | प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र | Siac Entrance Exam
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ midc act 1961 in marathi