Logical Reasoning Questions in Marathi | Venn diagram Questions in Marathi

Logical Reasoning Questions in Marathi | Venn diagram questions in marathi

Logical Reasoning Questions in Marathi: विद्यार्थी मित्रांनो तर्कशास्त्र हा घटक साधारण अभ्यास नसून आपल्याला योग्य निर्णय पर्यंत पोहोचण्यास मदत करतो. आकृत्यांचा योग्य अभ्यास व भरपूर सराव करा कारण MPSC असो किंवा इतर कोणतीही सरळ सेवा परीक्षा या घटकावर पेपर मध्ये प्रश्न नेहमी विचारला जातो

1. भारत, महाराष्ट्र, जर्मनी यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य राहील?

Logical Reason Questions in Marathi
Logical Reason Questions in Marathi

स्पष्टीकरण: वरील विधानासाठी आकृती C) योग्य राहील. कारण महाराष्ट्र भारतात आहे. म्हणून गोल एकात एक येतील व जर्मनी व भारत यांच्या दरम्यान काही संबंध नाही. म्हणून अमेरिकेचा गोल भारत व महाराष्ट्रापासून पूर्णपणे वेगळा आहे.


2)

Local Reasoning Questions in Marathi
Local Reasoning Questions in Marathi

1) शेतकऱ्यांची एकूण संख्या किती?

A. 10 
B. 12
C. 15
D. 1

 स्पष्टीकरण: शेतकऱ्यांचे एकूण संख्या त्रिकोणा मधील आहे म्हणून त्रिकोणातील सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल
म्हणून शेतकऱ्यांची संख्या बरोबर = 4 + 3 + 1 + 2 = 10

2) जे शेतकरी नाहीत; परंतु डॉक्टर आहेत असे लोक किती आहेत?
A. 5
B. 4
C. 9 
D. 18

 स्पष्टीकरण: शेतकरी नाही असे म्हटले, त्यामुळे त्रिकोणातील कोणतीच संख्या धरू नये व गोलातील परंतु त्रिकोणातील संख्या सोडून बेरीज करावी.
म्हणून 4 + 5 = 9

3) जे दारू पितात, शेतकरी आहेत व डॉक्टरही आहेत असे लोक किती आहेत?
A. 2
B. 1 =
C. 3
D. 4

 स्पष्टीकरण: सर्वांमध्ये सामायिक अंक एक आहे.

4) दारू पिणारे एकूण लोक किती आहेत?
A. 13
B. 3
C. 3
D. 12 =

 स्पष्टीकरण: दारू पिणारे चौकोनात आहेत. म्हणून फक्त चौकोनातील संख्यांची बेरीज करावी?
4 + 3 + 4 + 1 = 12

5) जे दारू ही पीत नाहीत व डॉक्टरही नाहीत असे एकूण लोक किती आहेत?
A. 4
B. 3 =
C. 4
D. 5

स्पष्टीकरण: एकूण संख्येमध्ये चौकोन व गुळातील संख्या कमी कराव्यात

 

हे देखील वाचा: Riddles in hindi


3) कोणते अनुमान सत्य आहे – खालील शब्द गट अ, ब, क, ड, यांपैकी कोणत्या वेन आकृती शी संबंधित आहे ते ठरवा व त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शविणारा योग्य पर्याय निवडा?

शब्द गट – कोबी, मेथी, भाजी

या प्रश्नात स्पष्टपणे कोबी व मेथी या एकमेकांशी संबंधित नसून त्या भाजी या घटकात संपूर्णपणे समाविष्ट आहेत म्हणून ही व्हेन आकृती योग्य आहे.


4) खालीलपैकी कोणती आकृती घोडे कुत्रे आणि हत्ती यांना निर्देशित करते?

येथे स्पष्टपणे घोडे, कुत्रे आणि हत्ती हे स्वतंत्र घटक आहेत त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही म्हणून ऑप्शन D येथे बरोबर उत्तर येईल


५) पुढील विधानांचे परीक्षण करा

अ) या खेड्यातील सर्व काँक्रीटची घरे पांढरी रंगवली आहेत

ब) काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे

क) उदारीकरणानंतर बांधलेल्या काँक्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत

ड) सर्व घरे काँक्रीटचे नाहीत.

वरील विधानांच्या आधारे पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा

१. या गावात काही पांढरी काँक्रीटचे घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत

२. या गावात फक्त काँक्रीटची घरे आहेत

३. बहुतेक काँक्रीटची घरे उदारीकरणानंतर बांधलेले आहेत

४. जे घरी काँक्रीट ने बांधलेली नाहीत त्यांना प्रशस्त द्वार मंडळ तू शकत नाही.

उत्तर: संभवनीय वेन आकृत्या

वरील वेन आकृती वरून असे दिसते की, बिंदूंनी अंकित केलेला भाग असे दाखवतो की त्या गावात काही पांढरी काँक्रीटचे घरे प्रशस्त द्वार मंडळ असलेली आहेत

उत्तर पर्याय क्रमांक १


६) व्हेन आकृती चे निरीक्षण करून उत्तर लिहा?

एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत

A. २०

B. ११

C. ०५

D. २८

वरील आकृतीत.

एकूण पुरुष = संच A

धूम्रपान करणारे = संच C

विवाहित पुरुष = संच B

= १५ + २ + ३ = ३०


७) खालील आकृती असे दर्शविते की,

◻ – वैद्यकीय शिक्षणात रस असणारे विद्यार्थी

◯  – अभियांत्रिकी शिक्षणात रस असणारे विद्यार्थी

△ – पदव्युत्तर स्पर्धा परीक्षेत रस असणारे विद्यार्थी तर तिन्ही शाखांत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकूण विद्यार्थ्यांशी असलेले प्रमाण किती?

A. 8.33 %

B. 16 %

C. 13.88 %

D. 25 %

उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार तिन्ही शाखेत रस असणारे विद्यार्थी म्हणजे चौकोन, वर्तुळ त्रिकोण तिन्ही मध्ये माईक असणारा अंक=25

आता तिन्ही शाखांमध्ये रस असणारे एकूण विद्यार्थी बरोबर = 25 + 32 + 25 + 38 + 67 + 23 + 90 = 300

म्हणजे 300 पैकी 25 विद्यार्थ्यांना तिन्ही शाखांत रस आहे.

300 यापैकी -> 25

तर 100 पैकी – > x

यावरून 8.33 टक्के विद्यार्थ्यांना तिन्ही शाखांमध्ये रस आहे


८)  बहुतांश गीतार वादक दाढीवाले पुरुष आहेत. जर A हे वर्तुळ सर्व पुरुषांचे, B हे वर्तुळ दाढीवाल्या पुरुषांचे आणि C हे वर्तुळ सर्व गीतार वादक पुरुषांचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्यांचे एकमेकांशी संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती?

 उत्तर: पर्याय १.

उदाहरणात दिल्याप्रमाणे, A = सर्व पुरुष, B = दाढीवाले पुरुष, C = गीतारवादक पुरुष येथे दाढीवाले पुरुष हे गीतार वादक पुरुष असू शकतात.

तसेच गीतारवादक पुरुषांना दाढी असू शकते. याचाच अर्थ हे दोन घटक अंशतः परस्पर संबंधित आहेत. म्हणजेच B आणि C वर्तुळे एकमेकांना छेदतात. आता दाढीवाले पुरुष व गिटार वादक पुरुष हे दोन्ही मिळून पुरुषच आहेत. म्हणून B आणि C ही दोन्ही वर्तुळे A ( सर्व पुरुष) या एकाच वर्तुळात समाविष्ट असणार. अशी स्थिती फक्त पर्याय क्रमांक एक मध्येच दिसते.


९) विधाने:

अ) सर्व कागद पुस्तक आहेत

ब) काही पुस्तके पेन आहेत

क) सर्व पेन पेन्सिल आहेत

ड) सर्व पेन्सिल खोडरबर आहेत

निष्कर्ष:

I) काही खोडरबर कागद आहेत

II) काही कागद पेन्सिल आहेत

III) सर्व खोडरबर पेन आहेत

IV) काही पेन कागद आहेत

A. फक्त II) अनुसरण करतो

B. फक्त I) आणि IV) अनुसरण करतो

C. फक्त II) आणि III) अनुसरण करतो

D. I), II), III) आणि IV) अनुसरण करतो

उत्तर: 

 

निष्कर्ष पडताळा

निष्कर्ष I = असत्य, कारण फक्त शक्यता I साठी यथार्थ शक्यता II साठी नाही

निष्कर्ष II = असत्य, कारण फक्त शक्यता I साठी यथार्थ शक्यता II साठी नाही

निष्कर्ष III = असत्य, कारण काही खोडरबर पेन आहेत, सर्व नवे

निष्कर्ष IV = असत्य, कारण फक्त शक्यता II साठी यथार्थ शक्यता I साठी नाही.

उत्तर पर्याय क्रमांक: 4 – I, II, III, IV, सर्वच अनुसरण करीत नाहीत


10) खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक अध्ययन करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या

गायक नसलेले भारतीय नेते दर्शवणारे क्षेत्र कोणते?

A. 2
B. 3
C. 4
D. 5

उत्तर: पर्याय – A. 2 – आपणास अपेक्षित असलेले क्षेत्र X आणि Y या वर्तुळात जोडणारे परंतु Z या वर्तुळात न मोडणारे असणार. असे क्षेत्र 2 या अंकाने दर्शविले आहे.

गायक असलेले भारतीय नेते दर्शविणारे क्षेत्र कोणते?

A. 2
B. 3
C. 4
D. 5

उत्तर: पर्याय – B. 3 – स्पष्टपणे आपणास अपेक्षित असणारे क्षेत्र X, Y आणि Z यांच्या सामायिक अंतरछेदा(common intersection) मध्ये असणार. असे क्षेत्र आकृतीत 3 या अंकाने दर्शविले आहे

गायक नसलेले आणि भारतीय सुद्धा नसलेले नेते दर्शवणारे क्षेत्र कोणते?

A. 2
B. 3
C. 6
D. 7

उत्तर: पर्याय – C. 6 – येथे आपणास अपेक्षित असणारे क्षेत्र म्हणजे Y या वर्तुळात असणारे परंतु X आणि Z या वर्तुळात नसणारे क्षेत्र होय. असे क्षेत्र 6 या अंकाने दर्शवले आहे

नेते नसलेले भारतीय गायक दर्शवणारे क्षेत्र कोणते?

A. 1
B. 2
C. 3
D. 4

उत्तर: पर्याय – D. 4 – येथे आपणास अपेक्षित असणारे क्षेत्र म्हणजे X आणि Z या वर्तुळात मोडणारा परंतु Y या वर्तुळात न मोडणारा अंक होय. असे क्षेत्र 4 या अंकाने दर्शविले आहे.

कोणते क्षेत्र असे गायक दर्शविते जे नेते नाहीत आणि भारतीय सुद्धा नाहीत>

A. 2
B. 4
C. 6
D. 7

उत्तर: पर्याय – D. 7 – हे आपणास अपेक्षित असणारे क्षेत्र म्हणजे Z या वर्तुळात असणारे परंतु X आणि Y या वर्तुळात नसणारे क्षेत्र होय. क्षेत्र 7 या अंकाने दर्शविले आहे.


Final Words

विद्यार्थीमित्रांनो, स्पर्धा परीक्षेत वेन आकृत्या संबंधी नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकासंबंधी परीक्षेला जाण्यापूर्वी तयारी नक्की करा. मला अशा आहे Venn diagram Questions in Marathi या लेखात दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतिल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

जगातील विविध देश, राजधानी आणि चलन

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment