लेखक कसे बनावे? | How to become a writer in Marathi
आपल्या दैनंदिन जीवणामध्ये नेहमी आपण पुस्तक,लेख ईबुक इत्यादींचे आँनलाईन तसेच आँफलाईन पदधतीने वाचन करत असतो.आणि हे लेख, पुस्तके,ईबुक लिहिण्याचे काम एक खास व्यक्ती करत असतो आणि तो व्यक्ती असतो एक लेखक .
वर्तमानपत्रातील स्तंभ लेखनापासुन ते ब्लाँग वेबसाईटवरील पब्लिश केलेले कंटेट राईट करण्याचे,ईबुक रायटिंगचे काम देखील लेखकाचे असते.
भविष्यात जर आपल्यापैकी कोणाला लेखक बनायचे असेल तर लेखक बनण्यासाठी काय करावे लागते? कोणते गुण आपल्यात असावे लागतात? हे आपल्याला माहीत असायला हवे म्हणुन आज आपण आजच्या लेखातुन लेखकाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. How to become a writer?
लेखक कोण असतो? How to become a writer?
कोणत्याही वर्तमानपत्रात स्तंभ लेखन, निरनिराळया पुस्तकांचे लेखन करत असलेल्या तसेच ब्लाँग वेबसाईटसाठी कंटेट लिहिण्याचे,ईबुक रायटिंगचे चित्रपटांसाठी स्क्रीप्ट लिहिणे इत्यादी लेखनाशी संबंधित काम करत असलेल्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते.
एक उत्तम लेखक बनण्यासाठी कोणती कौशल्ये आपल्यात असणे गरजेचे आहे?
- आपण ज्या विषयावर लेखन करत असतो त्याविषयावर आपल्या मनापासुन,आत्मियतेने लेखन करता येणे फार आवश्यक असते.
- आपले लेखन वाचकांच्या मनात रूची निर्माण करणारे असायला हवे.आणि आपल्या लेखनामध्ये एक रोचकता तसेच वेगळेपणा असणे देखील खुप गरजेचे असते.
- आपण ज्या भाषेत लेखन करतो आहे त्या भाषेवर आपले चांगले प्रभुत्व असणे देखील गरजेचे आहे.कारण जो पर्यत आपण कोणत्याही भाषेवर प्रभुत्व प्राप्त करत नाही तोपर्यत आपण त्या भाषेत आत्मियतेने लेखन करूच शकत नसतो.म्हणुन आपल्याला त्या भाषेचे चांगले आकलन देखील असावे लागते.
- आपले लेखन वाचकांच्या मनात वाचणाची रूची निर्माण करेल तसेच त्यांची उत्सुकता वाढवेल त्यांना वाचणात गूंतवून ठेवेल असे असावे लागते.
लेखकांचे प्रकार किती व कोणकोणते आहेत? How to become a writer?
तसे पाहायला गेले तर लेखन हे एक असे विस्तृत क्षेत्र आहे.ज्यात वेगवेगळया प्रकारचे लेखन केले जात असते.त्यातील लेखकांचे लेखकांचे काही प्रकार खालील प्रमाणे आहेत:
1) ब्लाँग रायटर : कोणत्याही ब्लाँग तसेच वेबसाईटसाठी नियमित कंटेट लिहिण्याचे काम करत असलेल्या व्यक्तीला ब्लाँग रायटर असे म्हणतात.
2) ई बुक रायटर :आपल्याला उत्तम ज्ञान असलेल्या एखाद्या विषयावर बुक लिहुन ते आँनलाईन प्लँटफाँर्मवर विकण्यासाठी पब्लिश करणे हे ईबुक रायटरचे काम असते.
3) बुक रायटर :आपल्याला ज्या क्षेत्राचे विषयाचे उत्तम ज्ञान आहे त्या विषयावर पुस्तक लिहुन ते एखाद्या प्रकाशन संस्थेकडे प्रकाशनासाठी देण्याचे काम बुक रायटर करत असतो.
4)स्क्रीप्ट रायटर : एखाद्या पुस्तकासाठी,चित्रपटाच्या कथेसाठी,मालिकेसाठी,नाटकासाठी इत्यादी माध्यमांसाठी स्क्रीप्ट लिहिण्याचे काम स्क्रीप्ट रायटर करत असतो.
5)पोयम रायटर : पोयम रायटर हा वेगवेगळया विषयांवर कविता लिहित असतो आणि त्या कविता वर्तमानपत्र,मासिक,तसेच कवी संम्मेलनामध्ये इत्यादी ठिकाणी सगळयांसमोर सादर करत असतो.
6)न्युज रायटर : वेगवेगळया न्युज चँनलसाठी तसेच न्युज वेबसाईटसाठी न्युज तयार करून त्यावर न्युज आर्टिकल लिहिण्याचे काम न्युज रायटर करत असतो.
फ्रिलान्स रायटर कोण असतो?आणि आपण फ्रिलान्स रायटर कसे बनावे? How to become a writer?
फ्रिलान्स रायटर हा एक असा रायटर असतो.जो कुठेही बसुन,कोणत्याही क्षणी वेगवेगळया ब्लाँग वेबसाईटसाठी,कंपनींसाठी,एजंसीसाठी कंटेट रायटिंगचे ईबुक रायटिंगचे काम करत असतो.
फ्रिलान्स रायटर बनण्यासाठी आपल्याकडे चांगले रायटिंगचे नाँलेज,स्कील असणे तसेच ज्याच्यासाठी आपण काम करू शकतो असा एक क्लाईंट असणे गरजेचे आहे.याचसोबत आपल्याकडे आपला स्वताचा एक अँड्राँईड मोबाईल,लँपटाँप,चांगले इंटरनेट कनेक्शन,बँक अकाऊंट नंबर आणि स्वताचा एक ईमेल आयडी असणे देखील गरजेचे आहे.
लेखक म्हणुन नोकरी कशी आणि कुठे मिळते?
तसे पाहायला गेले तर मार्केटमध्ये आज अशा खुप कमी कंपन्या आपल्याला आढळुन येतात ज्या रायटरला हायर करत असतात.आपल्या कंपनीत रायटरची भरती करत असतात.पण आज सर्व जग डिजीटल होत चालले असल्यामुळे सर्व जाँब देखील डिजीटल होत चालले आहे.त्यामुळे फ्रिलान्सरची मागणी देखील वाढली आहे.आणि ह्याचकरता अनेक कंपन्या आज पार्ट टाईम तसेच फुलटाईम फ्रिलान्स रायटरला आपल्या कंपनीत आँनलाईन जाँब वेबसाईटद्वारे काम देत असतात.आणि फ्रिलान्सर त्यांची कामे आपल्या स्कील एक्सपर्टीजचा वापर करून करत असतात.
लेखकाचे वेतन काय असते? How to become a writer?
एखाद्या कंपनीमध्ये लेखक म्हणुन काम करत असलेल्या लेखकाचे वेतन हे किमान १५ ते २० हजार इतके सुरूवातीला असते.पण जर आपण फ्रिलान्स रायटर म्हणुन काम केले तर आपण आपल्या स्कील एक्सपर्टीजनुसार पर वर्ड प्रमाणे आपल्या क्लाईंटला चार्ज करू शकतो.
समजा आपण एखादे पुस्तक लिहुन प्रकाशन संस्थेद्वारे आँफलाईन किंवा आँनलाईन प्लँफाँर्मवर प्रकाशित केले तर लोक जशी त्या पुस्तकांची खरेदी करतात तशी त्याची राँयल्टी आपल्याला प्राप्त होत असते.
लेखक बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते? How to become a writer?
तसे पाहावयास गेले तर लेखक बनण्यासाठी कोणतेही शिक्षण घेण्याची अजिबात आवश्यकता नसते.फक्त आपल्यामध्ये लिहिण्याची आवड आणि निर्मितीशीलता असावे लागते.ज्यासाठी आपण भरपुर अनुभवी लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करायला हवे त्याचबरोबर नियमित लेखनाचा सराव देखील करायला हवा.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे आपले आपल्या भाषेवर देखील प्रभुत्व असणे गरजेचे असते.
तरी देखील आपल्याला असे वाटत असेल की आपण औपचारिक शिक्षण देखील घ्यायला हवे तर आपण भाषेमध्ये मास्टरची पदवी घेऊ शकतो.तसेच मास कम्युनिकेशन मध्ये मास्टर देखील करू शकतो.फ्रिलान्स पत्रकारीतेचा एखादा कोर्स देखील करू शकतो.
लेखकाच्या कोणकोणत्या जबाबदारी असतात ज्या त्याने पार पाडणे अत्यंत गरजेचे असते? How to become a writer?
- एक लेखकाची सगळयात पहिले जबाबदारी ही असते की त्याने जे काही लेखन करावे सत्य लेखन करावे.कारण एका लेखकाचे विचार लोक वाचत असतात.आणि ते आत्मसात देखील करत असतात.म्हणुन लेखकाची ही जबाबदारी आहे त्याने नेहमी खरे तेच लिहावे.
- एका लेखकाची दुसरी जबाबदारी असते जनतेपर्यत तसेच समाजापर्यत चांगले विचार पोहचवणे,त्यांची रूजवण करणे.
- एका लेखकाची तिसरी जबाबदारी असते जनजागृती करणे.समाजातील वाईट रूढी प्रथा यांच्याविरूदध समाजजागृती करणे.
लेखक म्हणुन करिअर करण्यात स्कोप आहे का?
एक क्षण असा होता की लेखकांसाठी लेखन करून उदरनिर्वाह करणे अवघड होते.त्यामुळे बहुतेक लेखनाकडे करिअर म्हणुन न बघता छंद म्हणुन एकवेळ बघत होते.आणि उदरनिर्वाहासाठी एखादी नोकरी तसेच व्यवसाय करत होते.पण आता तसे राहिले नाहीये लेखकांसाठी आज करिअरच्या भरपुर संधी आज उपलब्ध आहे.ज्यात आज लेखन फुलटाईम करिअर Career करून महिन्याला लाखो कमवू शकतात.
उदा: ई-बुक रायटिंग,कंटेट रायटिंग,स्क्रिप्ट रायटिंग इत्यादी
लेखक बनण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
- आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व प्राप्त करावे.
- आपल्या लेखणात निर्मितीशीलता आणावी.त्यासाठी नवनवीन पुस्तकांचे वाचन करावे,रोज लिहिण्याचा सराव करावा.
- आपल्या लेखणात जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे.
भारतामध्ये एक लेखकाच्या कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ज्यादवारे तो पैसे कमवित असतो?
- ईबुक
- वर्तमानपत्रे तसेच मासिकातील स्तंभलेखन
- पुस्तक लेखन
- ब्लाँग वेबसाईटसाठी,चित्रपटातील कथेसाठी,मालिकेसाठी,नाटकासाठी कंटेट रायटिंग करणे तसेच स्क्रीप्ट रायटिंग करणे इत्यादी.
एका चांगल्या लेखकामध्ये कोणते गुण असतात तसेच त्याच्यामध्ये कोणकोणती वैशिष्टये असतात?
- प्रत्येक चांगला लेखक जास्तीत जास्त वाचणावर भर देत असतो.
- आपल्या भाषेतील आपला शब्दसाठा वाढवविण्यावर देखील तो खुप लक्ष देत असतो.
- एक चांगला आणि व्यासंगी लेखक आपल्याजवळ नेहमी एक डायरी आणि पेन ठेवत असतो म्हणजे त्याला एखादा चांगला विषय लिहिण्यासाठी सुचला तर तो त्याची नोंद करु शकेल.
- आपल्या आजुबाजूच्या घडत असलेल्या घटना तसेच परिस्थितीचे सुक्ष्म निरीक्षण करणे म्हणजेच संवेदनशीलता हा गुण त्याच्यात असतो.
- नेहमी सातत्याने लेखन करत राहणे हे सुदधा एक चांगल्या लेखकाचे वैशिष्टय आहे.
How to become a writer? किंवा लेखक कसे होतात हे समजले असेल. आणखी वाचा पुढील लेख ….
खूप छान माहिती. थोडक्यात आणि मुद्देसूद. धन्यवाद!
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/