BDS कसे करावे? दातांचा डॉक्टर कसे होतात? | BDS course information in Marathi
मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपण आयुष्यात खूप मोठे व्हावे यासाठी अनेक विद्यार्थी मित्र धडपडत असतात. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की बारावी नंतर काय करावे? कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यावे? इत्यादी अनेक अनेक प्रकार चे विद्यार्थ्यांना करिअर बद्दलचे प्रश्न पडलेला असतो.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा म्हणजेच निर्णायक टप्पा (Turning Point) असतो. कारण बारावी विज्ञान शाखे नंतर (Science Stream) असंख्य असे कोर्स असतात जेकी विद्यार्थ्यांना विचारात पाडतात.
जसे की इंजीनियरिंग (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy),डॉक्टर (Doctor) म्हणजेच एम. बी. बी. एस. (MBBS), बी एच एम एस (BHMS), बी ए एम एस (BAMS), बी डी एस (BDS) इत्यादी असे अनेक मेडिकल कोर्सेस आहेत. तर आपण आजच्या या लेखात बीडीएस बद्दल पाहणार आहोत. म्हणजेच बीडीएस (BDS) कशी करायची? बीडीएस (BDS) म्हणजे काय? इत्यादी असे अनेक तुम्हाला प्रश्न पडली असतील.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बीडीएस म्हणजे काय? बीडीएस कशी करायची? बीडीएस ला ऍडमिशन मिळवण्यासाठी आपली कोणती शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता लागते? बीडीएस हा कोर्स कधी करतात? बीडीएस या कोर्सनंतर काय? बीडीएस ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते? बीडीएस हा कोर्स किती वर्षाचा असतो? इत्यादी बीडीएस याबद्दल संपूर्ण माहिती तसेच अनेक बीडीएस या कोर्स अभ्यासाबद्दल ची माहिती या सर्व गोष्टी आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
जेणेकरून तुम्हाला कळेल की बीडीएस म्हणजे काय? किंवा बीडीएस कशी करायची? तसेच अनेक काही गोष्टी तुम्हाला या लेखांमधून समजून जाईल. आणि आपण बीडीएस या कोर्ससाठी ऍडमिशन मिळविण्यासाठी अभ्यासाच्या तयारीला लागू शकू.
तर विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा स्वप्न असतो की आपण एक डॉक्टर बनून आपल्या समाजाची समाजसेवा करावे म्हणून काही विद्यार्थी एम बी बी एस (MBBS) या कोर्ससाठी धडपडत असतात पण काही विद्यार्थ्यांना काही कारणामुळे किंवा कमी मार्क मिळाल्यामुळे ॲडमिशन मिळत नाही. तर हे विद्यार्थी बीडीएस हा कोर्स सुद्धा करू शकतात.
बी डी एस (BDS) प्रवेश हायलाईट्स :
• बीडीएस (BDS) प्रवेशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :-
श्रेणी | मुख्य हायलाइट्स (Major Highlights) |
पातळी | डिग्री (Bachelor) |
कालावधी | 5 वर्ष (4 वर्ष शैक्षणिक शिक्षण + 1 वर्ष इंटर्नशिप) |
परीक्षा प्रकार | सेमिस्टरनिहाय परीक्षा / सत्र |
पात्रता | 10 + 2 किमान 50% |
प्रवेश प्रक्रिया | प्रवेश परीक्षा [ NEET (National Eligibility Entrance Test)] |
कोर्स फी | 2 to 6 लाख / वर्ष |
आपण आजच्या या लेखामध्ये खाली दिल्याप्रमाणे किंवा या अनुक्रमे नुसार काही मुद्दे पाहणार आहोत:-
1. बीडीएस म्हणजे काय असते? व त्यांची कार्ये काय असतात?
2. बीडीएस हा कोर्स किती वर्षाचा असतो?
3. बीडीएस (BDS) कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?
4. बीडीएस ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी किंवा उत्तीर्ण व्हावी लागते?
∆ Entrance Based Admission Process:-
5. बीडीएस नंतर काय?
~ The Full Form of BDS बीडीएस Bachelor of Dental Surgery ~
1. बीडीएस म्हणजे काय असते? व त्यांची कार्ये काय असतात?
तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की बी डी एस म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो बीडीएस म्हणजेच दंतचिकित्सक (Dentist) होय. तर बीडीएस कोर्सचा कालावधी 5 वर्षाचा असतो. त्यामध्ये 4 वर्षे शैक्षणिक शिक्षण आणि 1 वर्ष इंटर्नशिप असतो. हा पाच वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण एखाद्या मोठ्या नामांकित हॉस्पिटल मध्ये दंतचिकित्सक म्हणून काम करू शकतो किंवा आपला स्वतःचा दंतचिकित्सक म्हणून हॉस्पिटल सुद्धा काढू शकतो. दातांचे आजार बरे करणे हे त्यांचे कार्य असते.
2. बीडीएस हा कोर्स किती वर्षाचा असतो?
तर बीडीएस या कोर्सचा कालावधी 5 वर्षाचा डिग्री कोर्स असतो. त्यामध्ये 4 वर्षे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण दिले जाते. व 1 वर्षाची इंटरंशिप असते.
3. बीडीएस (BDS) कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?
मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की बीडीएस कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर विद्यार्थी मित्रांनो बीडीएस हा कोर्स करण्यासाठी आपल्याला दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेणे गरजेचे असते. आणि हा कोर्स बारावीनंतर म्हणजेच (10+2) केला जातो. विद्यार्थी हा बारावी बोर्ड परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि जीवशास्त्र (Biology) या विषयांमध्ये किमान 50% गुणांनी उत्तीर्ण असावा. सामान्य विद्यार्थ्याला म्हणजेच (General) किमान 50% गुण असावे. आणि आरक्षित विद्यार्थ्याला म्हणजेच (SC/ST/OBC) किमान 40% गुण असावे. आणि नीट (NEET) परीक्षा Qualified असावा.
4. बीडीएस ला ऍडमिशन मिळविण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी किंवा उत्तीर्ण व्हावी लागते?
तर मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला असतो की बीडीएस ला ऍडमिशन कशी मिळवायची? व त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? बीडीएस ला ऍडमिशन मिळवायची असेल तर NTA (National Testing Agency) मार्फत परीक्षा घेतली जाते ती म्हणजे NEET (National Eligibility Entrance Test) ही परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावी लागते. कारण बीडीएस या कोर्सला ॲडमिशन नीट परीक्षेच्या गुणावरून मेरीट नुसार ॲडमिशन मिळते.
∆ Entrance Based Admission Process:-
बीडीएस या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला प्रथम बीडीएस महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची निवड प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतर मेरिट सूची याची यादी 3 Round मध्ये होतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज Allotment होतात. ह्याच्या आधी विद्यार्थ्यांला NTA मार्फत घेतली जाणारी म्हणजे NEET (National Eligibility Entrance Test) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. कारण बीडीएस हा कोर्स देणारे जवळ पास सर्व महाविद्यालय किंवा विद्यापीठ NEET या निकालावरून विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. ही परीक्षा 720 गुणांची असते. प्रत्येकी एका प्रश्नाला चार गुण असतात. आणि ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. तुम्हाला जर NEET या परीक्षा बद्दल अजून डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर मागच्या लेखात नीट या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे ते तुम्ही पाहू शकता. NEET (National Eligibility Entrance Test)
5. बीडीएस नंतर काय?
तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला असतो की बीडीएस या कोर्स नंतर काय? तर विद्यार्थी हा 5 वर्षे कोर्स म्हणजेच (4 वर्ष शैक्षणिक शिक्षण व 1 वर्ष इंटर्नशिप) पूर्ण केल्यानंतर आपण सरकारी हॉस्पिटल मध्ये दंतचिकित्सक (Dentist) म्हणून काम करू शकतो किंवा स्वतःचा खाजगी दंतचिकित्सक (Dentist) हॉस्पिटल सुद्धा काढू शकतो. जर याही पुढे विद्यार्थ्याला अजून पुढे शिकायचे असेल तर एमडीएस [MDS (Master of Dental Surgery)], MBA in Healthcare Management, MBA in Hospitality Management किंवा पीएचडी Ph.D हा कोर्स सुद्धा करू शकता.
6. अंतिम निष्कर्ष:-
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या लेखांमधून समजले असेल की बीडीएस कशी करायची? बी डी एस म्हणजे काय? बी डी एस हा कोर्स कधी करतात? व त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता काय आहे? इत्यादी अशा अनेक गोष्टी किंवा बाबींचा तुम्हाला सर्वांना कळालेच असेल. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर BDS कशी करायची? याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा BDS बद्दल शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखातून समजले असेल की बीडीएस हा कोर्स कशी करायची इत्यादी तर तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की बीडीएस कशी करायची किंवा बी डी एस म्हणजे काय? व त्यानुसार तुम्ही बीडीएस या कोर्सच्या तयारीला लागू शकाल.
12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? Best For You.
Bharatacha Bhugol भारताचा भूगोल – पर्वत व पठार
इंटर्न शिप करताना मानधन आहे का