महाराष्ट्रातील अष्टविनायक | Ashtavinayak Ganpati Information in Marathi
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची असणारी आठ गणपतीची मंदिरे होय. पेशवाईच्या काळापासून या गणपतीच्या आठ मंदिरांना आश्रय लाभल्यामुळे ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. म्हणून यांना अष्टविनायक असे म्हणतात.
आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी श्रींची पूजा केली जाते. श्रींची पूजा म्हणजेच श्रीगणेशा केला जातो. श्रीगणेश हे विद्येची देवता आहेत. श्रीगणेश हे सुखकर्ता दुखहर्ता व रक्षणकर्ता आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहेत.
महाराष्ट्रातील असंख्य भाविक या अष्टविनायकाची यात्रा करत असतात. सर्वसाधारणपणे दोन दिवसात हा अष्टविनायकाचा प्रवास पूर्ण होतो. यावरून हे लक्षात येते की अंतराच्या दृष्टीने देखील हि मंदिरे जवळ आहेत. अष्टविनायक गणपती मंदिरातील विनायकाची मूर्ती महाड, सिद्धटेक, रांजणगाव या मुर्त्या उजव्या सोंडेचे आहेत तर इतर पाच ठिकाणच्या मुर्त्या या डाव्या सोंडेच्या आहेत.
अष्टविनायक गणपती नावे | अष्टविनायक नावे | Ashtavinayak Ganpati List in Marathi
- 1) मोरेश्वर
- 2) सिद्धेश्वर
- 3) बल्लाळेश्वर
- 4) वरदविनायक
- 5) चिंतामणी
- 6) गिरिजात्मक
- 7) विघ्नेश्वर
- 8) महागणपती
अष्टविनायक गणपती नावे व ठिकाण | Ashtavinayak Ganpati marathi mahiti
क्र. | अष्टविनायक गणपती नावे | ठिकाण | जिल्हा |
1) | मोरेश्वर | मोरगाव | पुणे |
2) | सिद्धेश्वर | सिद्धटेक | अहमदनगर |
3) | बल्लाळेश्वर | पाली | रायगड |
4) | वरदविनायक | महाड | रायगड |
5) | चिंतामणी | थेऊर | पुणे |
6) | गिरिजात्मक | लेण्याद्री | पुणे |
7) | विघ्नेश्वर | ओझर | पुणे |
8) | महागणपती | रांजणगाव | पुणे |
12 Jyotirlinga in Marathi | बारा ज्योतिर्लिंग
1) मोरेश्वर –
मोरगावच्या मोरेश्वराला मयुरेश्वर असेही म्हटले जाते. कऱ्हा नदीकाठी वसलेले हे गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरेश्वर हे गणेशाचे आद्यपीठ आहे. मोरेश्वराचे दर्शन घेताना श्री समर्थ रामदास यांनी सुखकर्ता दुखहर्ता ही आरती कोणी रचली होती.
2) चिंतामणी –
अष्टविनायकापैकी दुसरा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी आहे. कदंब वृक्षाखाली हे गणेशाचे मंदिर आहे. भक्तांची चिंता हरणारा हा चिंतामणी आहे. थेऊर हे ठिकाण पुणे सोलापूर महामार्गावर ती आहे.
3) सिद्धिविनायक –
सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकातील तिसरा गणपती आहे. भीमा नदीवर वसलेले हे ठिकाण आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे.
4) महागणपती –
अष्टविनायकातील चौथा गणपती रांजणगावचा महागणपती होय. पुणे जिल्ह्यातील हे गणपतीचे पवित्र ठिकाण आहे. अष्टविनायकातील सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीला मांडले जाते. महागणपती ने त्रिपुरासुररक्षणाचा वध केलेला होता. महागणपतीला दहा हात आहेत.
5) विघ्नेश्वर –
अष्टविनायक गणपतीच्या रांगेतील ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते. विघ्नेश्वर गणपतीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावरती हिरा आहे. भक्तांच्या जीवनातील विघ्नांचे हरण करणारा म्हणून हा विघ्नेश्वर ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई च्या लढ्यात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
6) गिरीजात्मक –
सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरीजात्मक आहे. कुकडी नदीच्या जवळपास असणारा डोंगरावर गिरीजात्मक गणेशाचे स्थान आहे. जुन्नरच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मक मंदिर आठव्या गुहेत असून तेथे जाण्यासाठी 367 पायऱ्या आहेत. एकाच दगडापासून हे मंदिर कोरले असून या मंदिराच्या दालनात एकहि खांब नाहि. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या मूर्तीवर उजेड पडतो.
7) वरदविनायक –
रायगड जिल्ह्यातील महाड चा वरदविनायक हा अष्टविनायकापैकी सातवा गणपती आहे. भाविकांसाठी 24 तास खुले असणारे हे एकमेव गणेशाचे मंदिर आहे.
8) बल्लाळेश्वर –
अष्टविनायकापैकी आठवा व शेवटचा गणपती पालीचा बल्लाळेश्वर आहे. अंबा नदीच्या परिसरात रायगड मधील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे. या मंदिरापासून जवळच उन्हेरेचे गरम पाण्याचे झरे आहेत.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी गणपतीची यात्रा भरते. अष्टविनायकापैकी आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक गणपतीची मंदिरे निसर्गरम्य वातावरणामध्ये स्थिरावलेली असल्याने अष्टविनायकाची यात्रा म्हणजे धार्मिक यात्रेबरोबरच एक नैसर्गिक पर्यावरण यात्रा सुद्धा ठरते.
अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकांची माहिती घेतली. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
अष्टविनायकांच्या माहितीचे अधिकृत पान – Click Here
FAQ (Ashtavinayak Ganpati Information in Marathi)
अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो?
अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करण्यास दोन दिवस लागतात.
पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत?
पुणे जिल्ह्यामध्ये पाच अष्टविनायक आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची किती मंदिरे आहेत?
रायगड जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची दोन मंदिरे आहेत.
अष्टविनायक किती जिल्ह्यामध्ये आहेत?
अष्टविनायक तीन जिल्ह्यांमध्ये आहे. पुणे, रायगड आणि अहमदनगर.
अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक कोणते?
अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक सिद्धटेक आहे.
सुखकर्ता दुखहर्ता ही श्रीगणेशाची आरती कोणी लिहिली?
सुखकर्ता दुखहर्ता ही श्री गणेशाची आरती श्री समर्थ रामदास यांनी लिहिली.