Maharashtra Gazetted Technical Service Combine Pre Examination 2022 | तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिकृतरीत्या जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ सुचित केली जात आहे.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
एकूण पदांची संख्या – ५८८
संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक – ३० एप्रिल २०२२
भरावयाच्या एकूण पदांचा संक्षिप्त आढावा.
क्रमांक | विभाग | पदांचे नाव | भरावयाच्या एकूण जागा |
१ | महसूल व वन विभाग | वनक्षेत्रपाल | ७७ |
२ | कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग | उपसंचालक कृषी व इतर | १९ |
तालुका कृषी अधिकारी | ६१ | ||
कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर | १२३ | ||
३ | जलसंपदा विभाग | सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य | २१ |
सहाय्यक अभियंता स्थापत्य | १३२ | ||
सहाय्यक अभियंता यांत्रिकी | ७६ | ||
४ | सार्वजनिक बांधकाम विभाग | सहाय्यक अभियंता विद्युत | ४८ |
५ | मृद व जलसंधारण विभाग | उपविभागीय जलसंधारण अधिकारी | ११ |
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग ३९४ /-
मागासवर्गीय प्रवर्ग २९४/-
अर्ज करण्याचा कालावधी – २१ फेब्रुवारी २०२२ ते १४ मार्च २०२२
परीक्षेचे टप्पे – १) संयुक्त पूर्व परीक्षा – २०० गुण
२) प्रत्येक संवर्गाकरिता मुख्य परीक्षा – ४०० गुण
३) प्रत्येक संवर्गाकरिता स्वतंत्र मुलाखत – ५० गुण
मुख्य परीक्षा दिनांक – २४ सप्टेंबर २०२२आणि १ ऑक्टोबर २०२२
शैक्षणिक पात्रता पदाच्या अनुषंगाने उमेदवार धारण करणे आवश्यक आहे.
वनक्षेत्रपाल पदासाठी शारीरिक पात्रता आवश्यक आहेत.
विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत.
अधिक माहितीसाठी विस्तृत जाहिरात खालील लिंकवर पाहू शकता.