MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही

tet । Maha tet । maha tet exam 2021 बद्दल सर्व काही

शिक्षणाचा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला बहाल केला.  यावरून शिक्षणाला असलेले महत्त्व अधोरेखित केले गेले.  शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा याविषयी मार्गदर्शन सुद्धा यामध्ये आपल्याला आढळते.  शिक्षक हा कोणत्या पात्रतेचा असावा?  याबाबत राष्ट्रीय स्तरावरती विचार केला गेला. या विचारमंथनातून समोर आली ती म्हणजे TET. Teachers Eligibility Test. याच आधारावर ती महाराष्ट्रामध्ये महाटीईटी maha tet घेतले जाते. 

     जाणून घेऊ या tet बद्दल सर्व काही. Maha tet  

TET / tet म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. (Teachers Eligibility Test)   शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांची परी पूर्तता करणारा शिक्षक कोणत्या पात्रतेचा असावा याबाबत स्पष्टीकरण देणारी टीईटी/ tet ही संकल्पना आहे. 

 शिक्षक होण्याच्या मूलभूत ज्ञाना सोबत  किमान पात्रता असावी अशी अट नवीन शिक्षणाच्या कायद्यानुसार घालण्यात आली.  शिक्षणाचा मूलभूत अधिकार 2009 हा नवीन कायदा करून शिक्षणाचे महत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य करण्यात आले. 

महाराष्ट्राच्या संदर्भाने maha tet टीईटी परीक्षा 2013  मध्ये सुरु करण्यात आली.  यासाठी आधारभूत ‘शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा 2009’ / बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009  हा कायदा आहे.  

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने वेळोवेळी नियमावली ठरवून दिलेली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. 

प्राथमिक वर्गासाठी इयत्ता पहिली ते सातवी साठी शिक्षकांची व्यवसायिक पात्रता बारावी आणि अध्यापक शिक्षण पदविका D.T.ed. अशी आहे.

केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत 86 वी घटना दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल केलेला आहे. त्या अनुषंगाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 पारित केला आहे.

महाराष्ट्र राज्यात हा कायदा 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला. या अधिनियमातील तरतुदी लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 अधिसूचित केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकांना व्यवसायिक पात्रता सोबत शिक्षक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. 

शिक्षक पात्रता परीक्षा tet दोन प्रकारच्या घेण्यात येतात.

maha tet

 पहिली ते पाचवीसाठी शिक्षक पात्रता tet – 1

1) दोन वर्षांची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका

2) शिक्षक पात्रता परीक्षा -राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण

सहावी ते आठवीसाठी शिक्षक पात्रता tet – 2

1) मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि शिक्षणशास्त्र पदविका. 

2)  शिक्षक पात्रता परीक्षा -राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) maha tet मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.

maha tet परीक्षेसाठी पात्रता गुण

टीईटी परीक्षा मध्ये 60 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना पात्र असे समजण्यात येईल. आरक्षित प्रवर्गासाठी पात्रता गुण मर्यादा 55 टक्के इतके राहील.

बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की खाजगी शाळांमध्ये जर आपण काम करत असू तर अशा प्रकारे आपल्याला टीईटी देणे अनिवार्य आहे का?

तर याचे उत्तर अगदी हो असे येईल.  बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा पूर्ण देशभर लागू आहे आणि 86 वी घटनादुरुस्ती 2002 नुसार मूलभूत अधिकारांमध्ये याचा समावेश असल्यामुळे खाजगी, विनाअनुदानित, अनुदानित, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व प्रशासनाच्या शाळांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य आहे.

टीईटी परीक्षा maha tet वर्षातून किती वेळा होते? (maha tet exam 2020)

 टीईटी परीक्षा वर्षातून एकदा होत असते. tet परीक्षेसाठी अर्ज करत असताना पेपर एक किंवा पेपर दोन किंवा पेपर 1 व 2 साठी अर्ज करता येतो. अर्ज करत असताना आवेदन शुल्क मात्र दोन्ही पेपर देणार असाल तर दोन्ही पेपराचे भरावे लागेल.

शिक्षक पात्रता परीक्षेची कालमर्यादा

 शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारा उमेदवार शिक्षक होण्यासाठी पात्र म्हणून प्रमाणपत्र देण्यात येते.  उत्तीर्ण असणारा उमेदवार पुढील सात वर्षापर्यंत त्याच्या पत्र तिची कालमर्यादा पूर्वी ठरवण्यात आलेली होती.  शिक्षक पात्रता परीक्षेतील अद्ययावत बदलानुसार पात्रतेची सात वर्षाची मर्यादा रद्द करून एकदा शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कायमचा शिक्षक होण्यासाठी पात्र म्हणून ठरविण्यात येईल. पहा अधिक माहिती व्हिडीओ द्वारे click here

टीईटी परीक्षेसाठी कोण पात्र आहे?

 डी. एड, बी. एड अशा शिक्षण शास्त्र विषयांशी संबंधित पदवी व पदविका धारण करणारा प्रत्येक विद्यार्थी किंवा उमेदवार टीईटी परीक्षेसाठी पात्र आहे.

maha tet exam 2020 | maha tet exam 2021

महा टीईटी 2019 ही परीक्षा 2019 मधील असून देखील 19 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती.  2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव असल्याकारणाने maha tet exam 2020 होऊ शकली नाही. आपल्या प्राथमिक अंदाजानुसार maha tet exam 2020 / maha tet exam 2021 एकत्रितपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. Maha tet exam 2021 जाहीर होताच आपल्याला कळविण्याची व्यवस्था येथे करण्यात येईल. 

TET बद्दल नव्याने जाहिरात येण्याची श्यक्यता आहे. दिनांक २० जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या माहिती नुसार MAHATET 2021 ची परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

MAHA TET 2021 DATE AND TIME

मित्रांनो वरील मुदत सांगितल्याप्रमाणे दिनांक 29 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद देणे यांनी MAHA TET २०२१ साठी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले.

क्रमांककार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे25 सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ २१ नोव्हेंबर २०२१ वेळ – सकाळी १०:३० ते दुपारी १:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक व वेळ २१ नोव्हेंबर २०२१ वेळ – दुपारी २:०० ते सायंकाळी ४: ३०
MAHA TET 2021

Maha Tet Exam 2021 | Maha TET Exam Date 2021 New Date

सदर परीक्षेच्या दिनांका मध्ये बदल करण्यात आलेला होता मात्र अगदी अलीकडील बदलानुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेने Maha Tet 2021 परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे संबंधित परीक्षा परिषदेचे पत्रक खाली दिलेले आहे.

maha tet exam 2021
Maha Tet Exam 2021

आणखी वाचा

शिक्षक कसे होतात ? शिक्षक होण्यासाठी काय करावे? शिक्षक होण्यासाठी पात्रता

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

Maharashtra Police Bharti 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

29 thoughts on “MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही”

    • तुमची सगळी माहिती खूप छान आहे ???????? पण ही maha tet exam फक्त डी. एड आणि बी.एड चे उमेदवार exam देऊ शकता का B.Sc चे उमेदवार नाही देऊ शकत का .

      Reply
      • मॅडम मी सप्टेंबर महिन्यातल्या पेपरला हजर राहिली असती परंतु आता मला थोडी अडचण आहे मला रायटर मिळू शकतो का मला परीक्षेसाठी
        परीक्षेसाठी बसता येणार नाही काही सोल्युशन आहे का यावर परंतु आता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे मला पेपर ला हजर राहता येणार नाही मला रायटर मिळू शकतो का

        Reply
      • मला मॅडम वरील प्रश्नांची सोल्युशन सांगा मॅडम प्लीज

        Reply
    • Second year Apper विद्यार्थी TET देवु शकतो का ply जरुर सांगा मला first year ला 88% आहेत

      Reply
  1. पदवीला 50 टक्के मार्काची अट आहे का आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 5%टक्के सवलत आहे का

    Reply
  2. M.A. पर्यंत शिक्षण झालेलं आहे पण डी. एड. किंवा बी. एड. झालेलं नाही, तर मला टिईटी देता येईल काय?

    Reply
    • सर tet चे क्लासेस लावायचे आहेत कृपया मार्गदर्शन करा.

      Reply
  3. CTET परीक्षा महाराष्ट्र राज्यातील शाळांना लागू आहे का?

    Reply
  4. जर आपण bsc bed student असेल आणी आपण फक्त paper 1st च भरला असेल तर आपल्याला त्याचा काही फायदा आहे का नाही

    Reply
  5. पुन्हा जास्त घोटाळे होतील हे मात्र नक्की ,100%.

    Reply
    • आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. शेअर करून सहकार्य करा.

      Reply
    • जरा आठवीपासून खालच्या वर्गांना शिकवायचं असेल तर आवश्यक आहे. अन्यथा नाही.आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

      Reply
  6. Tet G R व केव्हापासून लागू आहे ती दिनांक,महिना व वर्ष सांग कृपया

    Reply

Leave a Comment