mpsc current affairs december 2020
टाइम्स चा पहिलाच कीड ऑफ दी इयर पुरस्कार जाहीर

भारतीय-अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षाच्या संशोधक मुलीस टाइम्स चा पहिलाच कीड ऑफ दी इयर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गीतांजली ने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत. टाइम ने 5000 उमेदवारांमधून गीतांजली ची निवड केली आणि मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली. current affairs
भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदविण्यात आले आहे.मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील अकरा देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशावर लक्ष केंद्रित केले होते रतातील मलेरिया रुग्णांची संख्या 72 टक्क्यांनी कमी झाली आहे. ओडीसा, मेघालय, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळणाऱ्या राज्यातही ही रुग्ण संख्या घटली आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर मधील जिल्हा परिषद शिक्षक रणजीतसिंह डीसले यांची निवड IMP current affairs
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर मधील परिते वाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डीसले यांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार असून रणजीत सिंह डीसले हे पहिलेच अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारे भारतीय शिक्षक आहेत. जगभरातील 140 देशातील बारा हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारासाठी नामांकने दिली होती.
डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना क्यूआर कोड ची जोड देऊन शिक्षणात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयोग केला आहे सोबत 84 देशातील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.
भारतीय नौदलात तर्फे चार डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
स्टॅच्यू ऑफ युनिटी ने पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं
गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ने पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी असलेलं केवडिया हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे फॅमिली हॉलीडे डेस्टिनेशन बनत चालले आहे.
डॉक्टर शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या
महारोगी सेवा समितीच्या सीईओ ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. शीतल आमटे सध्या आनंदवन ची जबाबदारी सांभाळत होत्या.
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर उणे
कोरोना संकटामुळे देश मंदीच्या छायेत आहे कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे 7.5 टक्के इतका दर नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर उणे 23.9 दशांश टक्के होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती चे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष
न्यूझीलंड क्रिकेट ची प्रमुख ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती चे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सध्या आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर हे आहेत शशांक मनोहर यांचे उत्तराधिकारी म्हणून ग्रेग बार्कले काम पाहतील. 2012 पासून ग्रेग बार्कले न्युझीलँड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. current affairs
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे | directive principles of state policy