MPSC exam preparation 2021 – mpsc previous year question papers.
MPSC previous year question paper in Marathi :राज्यसेवा व आयोगाच्या इतर परीक्षेमध्ये मागील काही वर्षांमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आपल्या सरावासाठी येथे देण्यात येत आहेत. प्रश्नांची सर्व उत्तरे प्रश्न मालिकेच्या शेवटी देण्यात आलेली आहेत. MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त प्रश्न मालिका.
Previous Years Questions for MPSC exam in Marathi
१) भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा.
- a) चीन, सौदी अरेबिया, यु. ए. ई., यु. एस. ए., दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, इराक.
- b) यु एस ए, चीन, यु ए ई.,सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, इराक.
- c) चीन, युएसए, यू. ए. ई.,सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, इराक.
- d) यु एस ए सौदी अरेबिया चीन दक्षिण कोरिया,यू. ए. ई., इंडोनेशिया.
२) आर्थिक सुधारणा नंतर 1990 91 ते 2012 13 याकाळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर……. प्रवृत्ती दर्शवतो.
- a) स्थिर
- b) घटती
- c) वाढती
- d) वरीलपैकी कोणतीही नाही
३)बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या ……..सूची मध्ये समाविष्ट नाहीत.
- a) दुसऱ्या
- b) पहिल्या
- c) तिसऱ्या
- d) चौथ्या
४)भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो?
- a) नियोजन आयोग
- b) वित्त आयोग
- c) केंद्रीय लोकसेवा आयोग
- d) वरीलपैकी कोणतेही नाही.
५)पी डी ओझा (1960-61)समितीने दारिद्र्यरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
- a) प्रति व्यक्ती, प्रति महिना, मिळणारे उत्पन्न
- b) प्रति व्यक्ती, प्रति महिना, उपभोग खर्च
- c) वरील दोन्ही
- d) यापैकी नाही
MPSC PYQ Questions in Marathi
६)दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही?
अ) राऊरकेला (ओरिसा)
ब)भिलाई (छत्तीसगढ)
क)दुर्गापुर (पश्चिम बंगाल)
ड)बोकारो (झारखंड)
- a) फक्त अ आणि ब
- b) फक्त क
- c) फक्त ड
- d) फक्त अ आणि ड
७) भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे?
- a) 16.5 टक्के,
- b) 17.3 टक्के,
- c) 17.5 टक्के,
- d) 17.7 टक्के
८) भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती?
- a) नियोजन आयोग
- b) राष्ट्रीय नमुना पाहणी
- c) गाडगीळ समिती
- d) कोठारी आयोग
९) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते?
- a) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
- b) 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर
- c) 1 जुलै ते 30 जून
- d) 1 एप्रिल ते 31 मार्च
१०) बँकेचा दर हे पत नियंत्रणाचे कोणते साधन आहे?
- a) गुणात्मक
- b) संख्यात्मक
- c) संख्यात्मक व गुणात्मक
- d) वरीलपैकी एकही नाही
११) दहाव्या पंचवार्षिक योजने दरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला
- a) कृषी क्षेत्र
- b) उद्योग क्षेत्र
- c) कारखानदारी क्षेत्र
- d) सेवा क्षेत्र
१२) कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात?
- a) पाचवी
- b) सहावी
- c) सातवी
- d) आठवी
१३) भारतात सूचक नियोजनाचा अमर्यादित प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला?
- a) पाचवी
- b) सहावी
- c) सातवी
- d) आठवी
१४)भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनांमध्ये करण्यात आली होती?
- a) बॉम्बे योजना
- b) जनता योजना
- c) गांधी योजना
- d) विश्वेश्वरय्या योजना
१५)विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणतात?
- a) चक्रीय बेरोजगारी
- b) घर्षणात्मक बेरोजगारी
- c) संरचनात्मक बेरोजगारी
- d) प्रच्छन्न बेरोजगारी
१६) काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार मिळत नसेल तर ती कोणत्या प्रकारची बेरोजगारी असते?
- a) प्रच्छन्न बेरोजगारी
- b) खुली बेरोजगारी
- c) घर्षणात्मक बेरोजगारी
- d) चक्रीय बेरोजगारी
१७) खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतातील लोकसंख्या वृद्धीदर नकारात्मक राहिला आहे?
- a) 1911
- b) 1921
- c) 1941
- d) 1981
१८) भारताची पहिली पंचवार्षिक योजना……
- a) 1950 ते 1955
- b) 1941 ते 1946
- c) 1951 ते 1956
- d) 1961 ते 1966
१९) 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा……. प्रवृत्ती दर्शवतो.
- a) स्थिर
- b) घटती
- c) वाढती
- d) तटस्थ
२०) शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज……… कालावधीसाठी लागते.
- a) ५ वर्षासाठी
- b) ५ वर्षापेक्षा अधिक
- c) १५ महिने ते ५ वर्षे
- d) ५ वर्षांपेक्षा कमी
२१) मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्या द्वारे केंद्रीय बँक…….. वर आपले नियंत्रण ठेवते.
- a) सार्वजनिक खर्च
- b) पैशाचा पुरवठा
- c) कर महसूल
- d) वरील सर्व
२२) भारतातील एकूण राज्या पैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे?
- a) गुजरात
- b) तमिळनाडू
- c) पंजाब
- d) महाराष्ट्र
२३) दारिद्र मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या.
अ) उष्मांक आधारित दारिद्र्यरेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे.
ब)दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे.
क) शिक्षण व आरोग्य साठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
- a) अ आणि क
- b) अ आणि ब
- c) ब आणि क
- d) वरील सर्व
२४) गरीबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
- a) तिसरी
- b) पाचवी
- c) सातवी
- d) सहावी
२५) केंद्र सरकारने अन्नसुरक्षा अभियानाची सुरुवात कशासाठी केली?
- a) तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी
- b) अन्नधान्य वाढवण्यासाठी
- c) गोडाऊन बांधण्यासाठी
- d) यापैकी नाही
२६) अलीकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूंची वेगाने वाढ झाली आहे?
- a) साखर व कापूस
- b) सोने व चांदी
- c) चहा व कॉफी
- d) इलेक्ट्रॉनिक वस्तू व सॉफ्टवेअर
२७) रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीयीकरण करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
- a) 1935 व 1949
- b) 1934 व 1949
- c) 1934 व 1948
- d) 1935 व 1948
२८) रिझर्व बँकेचे निरसन गृह/समाशोधन गृह म्हणून कार्य म्हणजे….
- a) सरकारची बँक म्हणून कार्य
- b) अंतिम ऋण दाता म्हणून कार्य
- c) आंतर बँक व्यवहारांची पुर्तता करणारे केंद्र म्हणून कार्य
- d) परकीय चलन साठ्याचा नियंत्रक म्हणून कार्य
२९) योजनेला सुट्टीचा पहिला व दुसरा कालावधी कोणता?
- a) 1966-69 व 1988-90
- b) 1968-71 व 1990-92
- c) 1966-69 व 1990-92
- d) 1965-68 व 1989-91
30) निती आयोग हा ….. आहे.
- a) संवैधानिक
- b) असंवैधानिक
- c) वैधानिक
- d) असंवैधानिक आणि अवैधानिक
For More Previous Years Questions mpsc Practice Click here
mpsc previous year question papers Answers in Marathi | Answer key
प्रश्न क्रमांक | उत्तर |
1 | b) यु एस ए, चीन, यु ए ई.,सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, इराक. |
2 | c) वाढती |
3 | a) दुसऱ्या |
4 | b) वित्त आयोग |
5 | b) प्रति व्यक्ती, प्रति महिना, उपभोग खर्च |
6 | c) फक्त ड |
7 | c) 17.5 टक्के |
8 | a) नियोजन आयोग |
9 | d) 1 एप्रिल ते 31 मार्च |
10 | b) संख्यात्मक |
11 | d) सेवा क्षेत्र |
12 | c) सातवी |
13 | c) सातवी |
14 | a) बॉम्बे योजना |
15 | c) संरचनात्मक बेरोजगारी |
16 | b) खुली बेरोजगारी |
17 | b) 1921 |
18 | c) 1951 ते 1956 |
19 | b) घटती |
20 | b) ५ वर्षापेक्षा अधिक |
21 | b) पैशाचा पुरवठा |
22 | d) महाराष्ट्र |
23 | d) वरील सर्व |
24 | d) सहावी |
25 | b) अन्नधान्य वाढवण्यासाठी |
26 | d) इलेक्ट्रॉनिक वस्तू व सॉफ्टवेअर |
27 | c) 1934 व 1948 |
28 | c) आंतर बँक व्यवहारांची पुर्तता करणारे केंद्र म्हणून कार्य |
29 | c) 1966-69 व 1990-92 |
30 | d) असंवैधानिक आणि अवैधानिक |
Combined higher secondary level examination – 2020
MPSC Exam Book List In Marathi