शिक्षक होण्यासाठी काय करावे ? | How to become teacher in Marathi 2024
how to become teacher in Marathi: समाजामध्ये सामाजिक मूल्य रुजवणारा एक मुल्यवान पेशा म्हणजे शिक्षकी पेशा. शालेय जीवनातून जात असताना शिक्षक व्हावे असं वाटत असते.
शिक्षक हा स्वतः राजा नसला तरी अनेक राजे निर्माण करण्याची क्षमता असणारा मार्गदर्शक असतो. व्यक्तीच्या जीवनातील शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रत्येक व्यक्तीची काहीतरी बनण्याची इच्छा असते. तसेच काही व्यक्तींची शिक्षक बनण्याची इच्छा असते. शिक्षक बनण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रक्रिया याठिकाणी आपण पाहणार आहोत.
अंगणवाडी पासून ते बारावीपर्यंत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना शिक्षक या संकल्पनेत गणता येईल. बारावी पुढीलअध्यापकांना प्राध्यापक म्हटले जाते.
- शिक्षक पात्रता
आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. दर्जानुसार पात्रता असावी लागते.
- डी.टी. एड(D.T.Ed.)
- बी. एड(B.Ed.)
- एम.एड(M.Ed.)
- SET,NET.
अंगणवाडी शिक्षक होण्यासाठी दहावीनंतर अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम पुर्ण करावा लागतो. अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम हा महिलांसाठी असून फक्त महिलांनाच अंगणवाडी सेविका होता येईल.
प्राथमिक स्तरावरती कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना डी.एड. अध्यापनशास्त्रीय पदवी धारण करणे गरजेचे असते. वर्ग इयत्ता पहिली पासून वर्ग आठवी पर्यंत डी.एड. (D.Ed.) पात्रता आवश्यक असते. बारावी नंतर करता येते.
माध्यमिक वर्गांसाठी बी.एड. (B.Ed.) ही पात्रता आवश्यक असते. B.ED पात्रता धारण करण्यासाठी प्रथम पदवी संपादन करणे आवश्यक असते. ही पदवी कला(Arts), वाणिज्य(Commerce), विज्ञान(Science) यापैकी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते. उच्च माध्यमिक अध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) असणे गरजेचे आहे. बी.एड. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य शासनाची MAH-B.Ed.-M.Ed.CET ही परीक्षा द्यावी लागते.
अध्यापनशास्त्रीय पदवी धारण केल्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (TET – Teachers Eligibility Test) जाहीर करण्यात आलेली आहे. ही पात्रता परीक्षा राज्यपातळीवर ती दरवर्षी होत असते. या परीक्षेला पात्र असणे आवश्यकच आहे.
अधिकृत संकेतस्थळ – https://mahatet.in
- प्राध्यापक कसे व्हावे?
महाविद्यालयीन प्राध्यापकांना पदव्युत्तर पदवी नंतर नेट असणे आवश्यक आहे. यासाठी वर्षातून दोन वेळा नेट(NET- National Eligibility Test) परीक्षा घेतली जाते. नेट परीक्षेच्या धरतीवर राज्य शासना द्वारे सेट(SET- State Eligibility Test) परीक्षा घेतली जाते. नवीन 2020 च्या शैक्षणिक बदलानुसार अभ्यासक्रम M. Phil वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट अनिवार्य केले आहे.
- नोकरीची संधी कोठे मिळते?
महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद, खाजगी संस्था, आदिवासी कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादी शासकीय तसेच खाजगी विभागांमध्ये कार्यरत असतो. वरील संस्थांच्या निवासी,अनिवासी, साखर शाळा यासारख्या विविध प्रकारच्या शाळांमध्ये कार्य करता येते.
हे देखील वाचा
MAHA TET । MAHA TET Exam बद्दल सर्व काही
डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? how to become a doctor in Marathi
Tet dilyanntr Tait on dyavech lagteka?
हो, TAIT शिवाय नोकरी मिळत नाही.कृपया माहिती शेअर करा. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
Mi anganwadi sevika aahey mala b.ed satee mahiti saga
खूप छान माहिती दिलीत
सर माझं बीएससी कॉम्प्युटर सायन्स + बी.एड झालं आहे. मी आता physics मधून पुन्हा बीएससी करत आहे. मी Tait परीक्षा पास झाले तर पुढे काही प्रोब्लेम येऊ शकतो का?
काहीच नाही उलट आनंद होईल की तुम्ही शिक्षक झाला म्हणून… आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/
मी इंग्लिश मिडीयम मधून माझा पदवी पर्यन्त शिक्षण पूर्ण केलं आहे मला मराठी स्कूल मधी शिक्षक बनता येइल का
ho. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
सर माझा मुलगा दहावी पास झाला तरी त्याला आयटीआय करायचा आहे कोणता ट्रेड घ्यावा दहावीत त्याला ८४टक्के पडले आहेत
electrical ghya. lavakar swavlambi hota yeyil.
माझे MA Hindi letrature मधून झाले आहे . B.ed Marathi medium मधून झाले आहे तर मी juniur college ver apply करू शकते का ?
Yes.
सर मी 14th ला आहे मला thechar cha करायचं आहे मग 15th झाल्यावर काय करु
Maz B. Com BEd zalay.
Mi madhyamik la apply kel tar approval hoil ka?
Karan khup jan mhantat fakt BA or BSc asel tarch approval hotay.
Ata mi MA Economics pan karatey. So plz guide mi
Mi anganwadi sevika aahey mala b.ed satee mahiti saga
Arogya Bharti Sathi ka nahi try karat aahat tumhi?
Sir graduation complete houn 2 year zalet aata me b. Ed kru shakte ka
Karu Shakta
Mi graduate zali ahe b. Com zal aahe mala junior and senior kg sathi study karaych aahe but konta course karu?.
Maz 12 th complete zal ata mla teacher bana sathi kay krav lagel pude
Hi,
4 varshache B. El. Ed kara.