शेतकरी चळवळ | Shetkari Chalval in Marathi
1857 उठावानंतरच्या शेतकरी चळवळी–
1. संथाळाचे बंड (1955-56)
सिद्धू व कानू यांच्या नेतृत्वाखाली जून 855 मध्ये उठावाची सुरुवात झाली. संथाळाचा राग शांत करण्यासाठी संथाळ परगणा नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करावा लागला होता. इंग्रज आणि जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करत असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बंड पुकारले होते.
2. बंगालमधील निळचे बंड (1859)
शेतकऱ्यांवर अत्याचार करून व त्यांना जबरदस्तीने नीळ उत्पादन करण्यास भाग पाडत असत त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व दिगंबर विश्वास व विष्णू विश्वास यांनी केले. नीलदर्पण या नाटकांमध्ये दीनबंधू मित्र यांनी आंदोलनाचे वर्णन केले आहे. खिस्ती मिशनरी लोकांनी देखील या उठावाला पाठिंबा दिला होता.
3. पवणा ( पूर्व बंगाल ) येथील उठाव(1873-76)
शंभू पाल यांनी चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. बंकिमचंद्र चटर्जी व आर सी दत्त यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा होता देखील यांना पाठिंबा होता.हिंदू पेट्रीयट या वृत्तपत्राचे संपादक हरिश्चंद्र यांनी यासंदर्भातील भूमिका महत्त्वाची होती.
4. दख्खनचे बंड(1874-75)
दख्खन मधील हा खूप महत्त्वाचा रिवोट झालेला आहे त्याला देखन रिवोट देखील म्हणतात. 1828 मध्ये रॉबर्ट किथ पिंगल यांनी रयतवारी पद्धत लागू केली होती. रयतवारी पद्धतीचा पहिला परिणाम हा शेतकरी व सावकार यांच्या संबंधावर झालेला आहे. जून 1875 पर्यंत हा उठाव पुणे जिल्ह्यात पसरला. प्रामुख्याने शेतकऱ्यांचा रोख गहाणपत्राकडे होता. ज्या ज्या शेतकऱ्यांवर सावकाराकडून अन्याय व अत्याचार झालेला होता ते सर्व शेतकरी या उठावाचे नेतृत्व करत होते. हे बंड इतके जबरदस्त होते की सरकारला देखील या बंडखोराविरुद्ध साक्षीदार मिळाला नाही.
5. डेक्कन राइट्स कमिशन
शेतकरी उठावाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने डेक्कन राइट्स कमिशन नेमले होते. यामध्ये सी डब्ल्यू कारपेंटर, जेबी रीची, सर ऑकलँड कॉलविल हे इत्यादी सदस्य डेक्कन राइट्स कमिशन मध्ये बघायला मिळतात. त्यांनी द डेक्कन एग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 मध्ये हा कायदा देखील मंजूर केलेला आहे. हा कायदा तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी तो मंजूर केला. टेम्पल ला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची चांगली माहिती होती त्यामुळे मंजूर झालेल्या कायद्यावर टेम्पल च्या विचारांचा चांगला प्रभाव होता. पूर्ण सार्वजनिक सभा व काही राष्ट्रीय वृत्तपत्राची द डेक्कन एग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट या कायद्याला पाठिंबा मिळाला.
Rivers In India | भारतातील 10 प्रमुख नद्या
6. उत्तर प्रदेशातील किसान सभा
फेब्रुवारी 1918 उत्तर प्रदेशातील गौरीशंकर मिश्रा व इंद्र नारायण द्विती यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेची स्थापना झाली या सभेत पं. मदन मोहन मालवीय यांनी पाठिंबा दिलेला आहे.
न्हावी धोबी बंद-न्हावी धोबी बंद ही एक चळवळ आहे. हा सामाजिक बहिष्कार याचा एक प्रकार होता. झींमोरीसिंह, दुर्गापात सिंग व बाबा रामचंद्र यांची नावे या नेतृत्वच्या संदर्भात पुढे येऊ लागली.
7. अवध किसान सभा (1920)
असहकारावर विश्वास असणाऱ्यांनी प्रतापगड येथे 17 ऑक्टोंबर 1920 रोजी अवध किसान सभा ही पर्यायी किसान सभा स्थापन केले आहे. गौरीशंकर मिश्रा, माता बदल पांडे, बाबा रामचंद्र, देवनारायण पांडे, केदारनाथ यांच्या प्रयत्नाने नव्या संघटनेमध्ये वाढ झाली. यामध्ये 330 किसान सभा या संघटनेमध्ये स्थापन झाल्या. अयोध्या येथे 20 -21 डिसेंबर रोजी कसे किसान सभेचा एक लक्ष शेतकऱ्यांचा विराट मोर्चा येथे काढण्यात आलेला होता. या मेळाव्यात बाबा रामचंद्र हे शेतकऱ्यांवरील अत्याचारांचे प्रतीक म्हणून दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत हजर राहिले होते.
8. एका चळवळ
राष्ट्रीय काँग्रेस व खिलाफत च्या नेत्यांनी एकत्रित येऊन ही चळवळ सुरू केली होती म्हणून या चळवळीला ऐक्य अर्थात एका या नावाने ओळखले गेले. एका चळवळीचे नेतृत्व सामान्य लोकांकडे होते. शिस्त व अहिंसा अशी तत्त्वे न पाळली गेल्याने चळवळीचा राष्ट्रीय कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला आणि अत्यंत दडपशाहीमुळे 1922 पर्यंत या चळवळीचा शेवट झाला.
9. मलबारच्या मोपल्याचे बंड(1921)
दक्षिण मलबारमधील केरळ मुसलमानांच्या पट्टेदारांना व शेतकऱ्यांना मोपला म्हटले जाईल. ते शेती करत किंवा हिंदू जमीनदारांकडे कुळे म्हणून राबत. ब्रिटिशांच्या कर धोरणांमुळे जसजशी त्यांची पिळवणूक होऊ लागली तसतसे 836 ते 1894 या काळात या भागांमध्ये त्यांनी 22 उठाव केले.
10. बार्डोलीचा सत्याग्रह(1928)
सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. बार्डोली येथील शेतकऱ्यांच्या ब्रिटिशांनी हिसकावून घेतलेल्या जमिनीच्या विरोधातील हा सत्यग्रह होता. यावेळी बार्डोलीच्या स्त्रिया या सत्याग्रहांमध्ये सहभागी झाल्या होत्या वल्लभभाई पटेल यांचे कार्य पाहून त्यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली.
11. चौकीदार करा विरुद्ध आंदोलन
बिहार व बंगालमधील शेतकऱ्यांना त्यांच्या वरती जूलूम जबरदस्ती करणारे अधिकारी होते ते वेतन भागवण्यासाठी हा चौकीदार कर द्यावा लागत असे या कराराविरुद्ध आंदोलन तेथे सुरू झाले.
12. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन (1930)-
सुभाषचंद्र बोस यांच्या आव्हानाने प्रभावित होऊन आनंदस्वामी यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1939 ते 40 यावर्षी लाल डगलेवाला या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती.
13. अखिल भारतीय किसान सभा (11एप्रिल 1936)
या सभेची स्थापना 1936 मध्ये लखनऊ येथे झाली या सभेचे संस्थापक स्वामी सहजानंद व त्याचे महासचिव एन जी रंगा होते. पहिल्या अधिवेशनासाठी पंडित नेहरू उपस्थित होते आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.
14. साने गुरुजी व शेतकरी आंदोलन
1938 साली पूर्व खानदेश मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली होती. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी ठिकठिकाणी सभा व मिरवणुका घेतल्या. त्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली.धुळे, अमळनेर या कामगार संघटनांची प्रबळ केंद्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेर गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष देखील होते.
भारतीय स्वातंत्र्य वेळेचे शेतकरी आंदोलने–
15. 1946 ची बंगालची तेभागा चळवळ
तेभागा चळवळ प्रामुख्याने जमीनदाराविरुद्ध होती. तेभागा म्हणजे तीन भाग अर्थात बंगालच्या बटाईदार शेतकऱ्यांची भूमिका होती की बटाईच्या हिश्यातील आपल्या पिकाच्या अर्ध्या ऐवजी तिसरा भाग जमीनदारांना देण्यात यावा. हजोम या आदिवासी शेतकऱ्यांची मागणी होती की आपला कर वस्तूच्या स्वरूपात न घेता तो पैशांच्या स्वरूपात रोख घ्यावा. अशा पद्धतीने ही चळवळ होती.
16. तेलंगणा मधील शेतकरी चळवळ (1946-1959)
हैदराबाद संस्थानातील निजामच्या मालकी हक्काची जी जमीन आहे जिला सर्व खास असे म्हणत. ती राज्याच्या एक तृतीयांश होती.
सावकार,जमीनदार व निजामाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करत त्रास देत.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे आंदोलन सुरू झाले होते. साम्यवादी नेतृत्वाने या बरीच आघाडी घेतली होती.
17. वारली चळवळ
मुंबई जवळील वारली या आदिवासी जमातीच्या शेतकऱ्यांनी जगल ठेकेदार,सावकार, सरकारचे पाठबळ असलेले जमीनदार यांच्याविरुद्ध ही चळवळ सुरू केली. मे 1945 मध्ये किसान सभेच्या मदतीने ही सर्व सुरू झाली. साम्यवादी विचारांचा प्रभाव या चळवळीवर होता.
Plasichi Ladhai | प्लासीची लढाई 1757