MPSC question with answers in Marathi | MPSC Previous year question paper with Answer key 2024

MPSC question with answers in Marathi | MPSC Previous year question paper with Answer key 2024

MPSC question with answers in Marathi: MPSC question with answer for preparation. In this practice set we have given some important previous year mpsc question.

1) भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे ‘स्वयंशासनाच्या संस्था’ असे वर्णन आहे?(ASO 2012)

  • a) 73 वी घटनादुरुस्ती 
  • b) मूलभूत हक्क 
  • c) उद्देश पत्रिका 
  • d) राजनीतीची मार्गदर्शक तत्वे

उत्तर – राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे

कारण – भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन. राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल व त्यांना प्रशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक ते अधिकार बहाल करील हे कलम गांधीवादी तत्व म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.


2) राज्य नीतीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणती गुणवैशिष्ट गैरलागू ठरते? (PSI २०१३)

  • a) मूलभूत अधिकाऱ्यांशी अनुरूप 
  • b) न्यायालय निर्णय योग्य 
  • c) परिवर्तनीय 
  • d) कल्याणप्रद

उत्तर – न्यायालयीन निर्णय योग्य

  • कारण – मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत तर मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत.
  • सामाजिक आर्थिक लोकशाहीची उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत ही मार्गदर्शक तत्वे तीन प्रकारात वर्गीकृत करण्यात येतील.
  • समाजवादी तत्वे – कलम 38 1, 39 A, 41, 42, 43, 44 A,46, 47
  • गांधीवादी स्वरूपाचे तत्वे – कलम 40 43 47 48
  • उदारमतवादी स्वरूपाची तत्वे कलम 44, 45, 48, 48 A, 49, 50, 51.

3) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे? (ASO 2012)

  • a) भाग 1 
  • b) भाग 2 
  • c) भाग 3 
  • d) भाग 4

उत्तर – भाग 4


4) योग्य जोड्या जुळवा. (PSI २०१३)

अ) राजकीय तत्त्वे.       १) रोजगाराची उपलब्धता

ब) सामाजिक तत्वे        २) शांततापूर्ण सह अस्तित्व

क) आर्थिक तत्वे          ३) ग्रामपंचायतीचे संघटन

ड) आंतरराष्ट्रीय तत्वे      ४) 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण

अ    ब     क      ड

  • a) १      २.    3       4
  • b) २.     ३     4      1
  • c) ३      ४     1      2
  • d) ४      1      2     3   

उत्तर – 3


4) खालील विधाने विचारात घ्या. STI 2016

A)राज्य हे सहा वर्षापासून ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

B) जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास अथवा अपत्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते 14 व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

C) राज्य हे बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल हे मार्गदर्शक तत्व आहे.

  • a) A आणि B
  • b) B आणि C
  • c) A आणि C
  • d) वरील सर्व

उत्तर – वरील सर्व

86 वी घटनादुरुस्ती 2002 मे 10 ते 14 वयोगटातील मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्काचा दर्जा देण्यात आला त्यानुसार कलम 21 A समाविष्ट करण्यात आले आणि वरील प्रमाणे मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्यात बदल करण्यात आला.


5) योग्य कथन /कथने ओळखा.

A)अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

B) 86 व्या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आले.

  • a) कथन A बरोबर कथन B चूक
  • b) कथन A चुकीचे कथन B बरोबर
  • c) दोन्ही कथने बरोबर आहेत 
  • d) दोन्ही कथने चुकीची आहेत

उत्तर – कथन A चुकीच्या कथन B बरोबर

  • कारण – कलम 45 प्रमाणे सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी व शिक्षणाची तरतूद राज्य करेल.
  • घटनेमध्ये 86 व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार बदल करण्यात येऊन कलम 21 A हे कलम टाकण्यात आले.
  • त्यामध्ये राज्यसंस्था 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे व या कलमानुसार प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क बनविण्यात आला.

6) खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्यांचा समावेश नंतर 42व्या राज्य घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला?

A)कामगारांना काम निर्वाह वेतन चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी द्यावी.

B) कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे.

C)सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य.

D)पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि पणे व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.

  • a) A,B, आणि C
  • b) B,C आणि D
  • c) A,B आणि D
  • d) A,C, आणि D

उत्तर – B,C आणि D

  • 42 व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये चार नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये 39f, 39a, 43a आणि 48a यांचा समावेश होतो.
  • 43A कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे.
  • 48A-पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • 39f मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबीची शाश्वती देणे.
  • 39a समान न्याय व गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा यांना चालना देणे.
  • 97 वी घटनादुरुस्ती 2011 नुसार कलम 43b समाविष्ट करण्यात आलेले हे तत्व सहकारी संस्था संदर्भात असून त्या स्वेच्छेने संघटित करणे त्यांचे स्वायत्त कामकाज लोकशाही नियंत्रण व्यवस्थापन यांना राज्यांनी चालना द्यावी असे सांगण्यात आले. याच घटनादुरुस्तीने मूलभूत हक्क मध्ये कलम 19c मध्ये संस्था संघटना सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क समाविष्ट करण्यात आला.

7) भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? (COMBINE 2017)

  • a) राज्यघटनेची उद्देशिका 
  • b) राज्याची मार्गदर्शक तत्वे 
  • c) मूलभूत कर्तव्य 
  • d) नववी सूची

उत्तर – राज्याची मार्गदर्शक तत्वे


अधिक सरावासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

MPSC question mpsc economics questions in Marathi useful for all mpsc and saralseva (Direct Recruitment) exams.

MPSC पदांची माहिती

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment