महाराष्ट्रातील खनिज संपत्ती – प्रमुख 12 जिल्हे । Khanij Sampatti in Maharashtra

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि विभाजन | Khanij Sampatti in Maharashtra

Khanij Sampatti in Maharashtra: महाराष्ट्रातील खनिज संपत्ती निश्‍चितपणे महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर राज्य आहे. अशा या महाराष्ट्रातील खनिज संपत्ती विषयी माहिती आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी फक्त १२% च खनिज संपत्ती आढळते. 

विद्यार्थीमित्रांनो, खनिज संपत्ती चे विभाजन दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये झालेले दिसते.

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती
  • पूर्व विदर्भ
  • कोकण आणि  दक्षिण महाराष्ट्राचा भाग

महाराष्ट्र मध्ये एकूण बारा जिल्ह्यामध्ये लहान-मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. आता ती प्रमुख खनिजे कोणती आहेत ते जाणून घेऊयात. 

खनिज संपत्ती

पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राचे खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. पूर्व विदर्भ मध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर  गोंदिया व यवतमाळ हे खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहेत. कोकण व दक्षिण महाराष्ट्रात रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व कोल्हापूर ही जिल्हे ही खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे / महाराष्ट्रातील खनिज संपत्ती | Maharashtra Khanij Sampatti 

मॅगनीज, लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे आहेत.

मॅगनीज | Magnij in Maharashtra

मॅगनीजचे प्रमुख साठे भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. भारतात आढळणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी त्यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. मॅगनीजचे साठे हे प्रामुख्याने नागपूर, भंडारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतात. 

मॅगनीजचा पट्टा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा या गावापासून सुरु होतो. मध्य प्रदेशात मॅगनीजचा पट्टा हा पुढे जातो. सावनेर-रामटेक हा वैशिष्ट्यपूर्ण मॅगनीजचा पट्टा आहे. खापा, पारशिवनी, कांद्री, रामडोंगरी, गुमगाव, मनसळ, कोदेगाव या भागातील मॅगनीज चे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. कन्हान व तुमसर येथे फेरो – मॅगनीज बनविण्याची सयंत्र उभारण्यात आली आहेत. निम्न प्रतीचे मॅगनीज खनिज भिलाई पोलाद कारखान्यात वापरतात. उच्च प्रतीचा मॅगनीज खनिजाचा थोडा भाग निर्यात केला जातो.

Magnij in Maharashtra
Magnij in Maharashtra

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख साठे तुमसर तालुक्यात आहेत. भंडारा जिल्ह्यातील मॅगनीज चे साठे हे भारतातील मोठ्या साठ्यापैकी एक आहे. भंडारा जिल्ह्यातील मॅगनीज चा साठा हा गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित आहे. त्यामध्ये सिलोमिलोन हा मुख्य खनिज आढळतो.

कोकणात आढळणारे मॅंगनीज खनिज मात्र जांभा प्रकारच्या खडकांमध्ये असलेले दिसून येते.  जांभा खडकांमध्ये विखुरलेल्या धोंडे यांच्या स्वरूपात असलेले हे मॅंगनीज आढळते. पूर्व विदर्भामध्ये आढळणारे मॅंगनीज हे कोकणात आढळणाऱ्या मॅंगनीज पेक्षा उच्च प्रतीचे आहे.

लोहखनिज | Lohkhanij Information in marathi

लोह खनिजाचा साठा भारतात अंदाजे १,३४६ कोटी टनांचा आहे.महाराष्ट्रामध्ये यातील २० टक्के साठे आढळतात. धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत उत्तम प्रकारचे लोहखनिज असते. यातील महत्वाचे खनिज हेमेटाइट आहे. आणि ही खनिजे उघड्या खाणीतून काढले जातात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर इत्यादी लोह खनिजाचा महत्त्वाचा साठा महाराष्ट्रात आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, टॅकोनाईट खडकामध्ये लोहखनिज आढळते. रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा खडकात लोहखनिज आढळतात.

औद्योगिक विकासासाठी लागणारे पोलाद बनवण्यासाठी महत्त्वाचे खनिज लोहखनिज आहे. लोह पोलाद यामधील हेमेटाइट हे महत्त्वाचे खनिज आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे चांगल्या प्रतीचे लोहखनिजाचे साठे आढळतात. 

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीबॉक्साईट | Boxside in maharashtra

बॉक्साईट हे प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रातील कोकण भागांमध्ये आढळणारे प्रमुख खनिज आहे.  बॉक्साईट हे खनिज जांभ्या खडकामध्ये आढळते. बॉक्साईट चा वापर प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो.

भारतात आढळणाऱ्या एकूण बॉक्साइट साठ्यापैकी २१ टक्के बॉक्साइट चे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साईट हे उच्च प्रतीचे असून ते राज्यात सुमारे ६८ दशलक्ष साठे आहेत. बॉक्साईटचे साठे हे महाराष्ट्रामधील रायगड,कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. 

बॉक्साईटचे साठे हे उष्ण व दमट, आणि भरपूर पर्जन्य हवामान असणाऱ्या जांभा खडकात आढळतात. बॉक्साईटचे साठे हे रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, रोहा व मुरुड या तालुक्यात केंद्रीत झाले आहे. बॉक्साईटचे साठे हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात आहेत. बॉक्साईड चा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यात ॲल्युमिनियम कंपनीच्या व बेळगाव येथील कारखान्यात धातु निर्मिती करिता करतात.

डोलोमाईट

डोलोमाईट च्या उत्पादनातील ९० टक्के उत्पादन लोह पोलाद निर्मिती साठी वापरतात. आणि उरलेले खत कारखान्यात वापरले जातात. गडचिरोली, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात डोलोमाईट चे साठे आढळतात.

क्रोमाइट

भारतात क्रोमाईट च्या साठ्यापैकी एकूण दहा टक्के साठा महाराष्ट्रात आहे. व ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा-गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत.क्रोमाइट चा उपयोग हा धातू उद्योग व किमती खड्ड्यावर प्रक्रिया करण्यासाठी व रसायन उद्योगात उपयोग करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली व बागदा, भंडारा या जिल्ह्यात मौनी व नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईट चे साठे आहेत.

कायनाईट व सिलीमनाईट

भारतात कायनाईटच्या उत्पादनातील एकूण १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.कायनाईटचे साठे हे महाराष्ट्रात भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आहेत. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील दहेगाव येथे कायनाईटचे साठे आहेत. भंडारा तालुक्यातील गार्काभोंगा येथे कायनाईट व सिलीमनाईट चे साठे आहेत.

चुनखडी  | Chunkhadi in Maharashtra

महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा साठा नऊ टक्के व उत्पादन फक्त दोन टक्के आहे. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे ही अनेक ठिकाणी आढळून येतात. चुनखडक हा चुन्याचा मूलभूत पदार्थ आहे. बांधकामात लागणारा चुना हा भाजून तयार केलेला चुनखडक असतो. माती व चुनखडक योग्य प्रमाणात मिसळून पोर्टलॅड सिमेंट तयार केला जातो. 

चुनखडक हा जास्त प्रमाणात विखुरलेल्या मातीत चुनखडीच्या रूपात असलेल्या कंकरापासून चुना उपलब्ध होतो. चुनखडीचे साठे हे महाराष्ट्रात चार हजार दशलक्ष टन आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नांदेड, नंदुरबार, नागपूर येथे अंतरट्रॉफी थरामधील चुनखडी व कंकर या जिल्ह्यात आढळतो. यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात चुनखडीचे साठे हे विंध्ययन खडकात आहेत.नांदेड पुणे आणि सांगली या जिल्ह्यात कनिष्ठ दर्जाचे व चुनखडकाचे साठे आहेत.याचा उपयोग चुनाभट्टीत होतो. 

महाराष्ट्रात भेटणारी खनिजे आणि जिल्हे

खनिज जिल्हा
चुनखडी नागपूर, नांदेड, सांगली, नगर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, सातारा
सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग, रत्नागिरी
अभ्रक पूर्व विदर्भ
जांभा पूर्व विदर्भ, कोकण, कोल्हापूर, सातारा
डोलोमाईट यवतमाळ, नागपूर, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर
कायनाईट गोंदिया, भंडारा
मँगनीज नागपूर, सिंधुदुर्ग, भंडारा
बॉक्साइट कोल्हापूर, ठाणे, सांगली, रत्नागिरी, रायगड, सातारा
क्रोमाईट सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी
लोहखनिज चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग

आणखी वाचा …

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती

UPSC Book List In Marathi

Neet Exam Information In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment