Dharashiv police Bharti Question Paper 2024
जर तुम्ही सुद्धा धाराशिव पोलीस भरती २०२४ ची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेला मागील वर्षीचा Dharashiv police Bharti Question Paper परीक्षेला जाण्याआधी सोडवून नक्की जा.
Osmanabad police bharti questions paper
1. भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता?
A. जर्मनी
B. अमेरिका
C. इस्त्रायल
D. फ्रान्स
2. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
A. 545
B. 548
C. 544
D. 540
3. पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ?
A. ब्रह्मदेश
B. ऑस्ट्रेलिया
C. बेल्जियम
D. USA
4. ‘रायटर्स बिल्डिंग’ ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे?
A. लखनौ
B. कोलकत्ता
C. बेंगलोर
D. अहमदाबाद
5. ‘चाबहार’ हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे?
A. अफगाणिस्तान
B. इराक
C. कुवेत
D. इराण
6. ‘कॅलिम्पांग’ हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे?
A. सिक्कीम
B. अरूणाचल प्रदेश
C. पश्चिम बंगाल
D. मिझोरम
7. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे?
A. संत चोखामेळा
B. संत गोरोचा काका
C. संत एकनाथ
D. संत नामदेव
8. महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती?
A. 46
B. 48
C. 44
D. 49
9. ‘विष्णुदास भावे’ हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. खेळ
B. नाटक
C. स्वास्थ्य
D. राजकारण
10 …….हा वायू गोबर व नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो.
A. मिथेन
B. इथेन
C. क्लोरीन
D. बेन्झीन
11. ……यांच्या जन्मदिनी भारतात ‘विज्ञान दिन’ साजरा केला जातो?
A. सी. व्ही. रमण
B. जगदीशचंद्र बोस
C. डॉ. हन्सन
D. डॉ. अब्दुल कलाम
12. ……या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधूमेह होतो.
A. मुत्रपिंड
B. स्वादुपिंड
C. लिव्हर
D. किडनी
13. बांबू म्हणजे एक प्रकारचे……होय.
A. रांगते खोड
B. गवत
C. कंदमूळ
D. यापैकी नाही
14. माणसाच्या मांडीच्या हाडास …….अशी संज्ञा आहे.
A. फिमर
B. पॅटेला
C. अलना
D. रेडीअस
15. एकपेशीय प्राण्यास ……असे म्हणतात?
A. आदिजीव
B. जिवाणू
C. कुहरांगी
D. यापैकी नाही
16. आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा ………. चे उदाहरण आहे.
A. अपवर्तन
B. अपस्करण
C. परावर्तन
D. यापैकी नाही
17. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते?
A. श्वसन
B. फसफसने
C. प्रकाश संश्लेषण
D. विरेचण
18. उस्मानाबाद जिल्ह्यात …….. येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे.
A. कुंथलगिरी
B. तेर
C. अणदूर
D. परंडा
19. ‘सेंटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाचे लेखक कोण?
A. सलमान रश्दी
B. मैथीलीशरण गुप्ता
C. अमृता प्रीतम
D. वरुण गांधी
20. ………….हा दिवस ‘दहशतवाद विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
A. 11 में
B. 21 मे
C. 21 एप्रिल
D. 11 एप्रिल
Osmanabad Police Bharti question paper
21. ‘उचल्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. दया पवार
B. विश्वास पाटील
C. लक्ष्मण माने
D. लक्ष्मण गायकवाड
22. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते?
A. 356
B. 354
C. 352
D. 360
23. औद्योगिक क्रांती………… मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्या टप्प्याने पाश्चात्य जागात पसरत गेली.
A. फ्रान्स
B. इंग्लंड
C. जर्मनी
D. भारत
24. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला?
A. माधवराव
B. रघुनाथराव
C. दुसरा बाजीराव
D. नानासाहेब पेशवे
25. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला.
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड बेटिक / बेंटिंग
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड मेकॉले
26. मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
A. बराकपूर
B. कानपूर
C. मेरठ
D. आग्रा
27. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ……..येथे भरले.
A. मुंबई
B. कलकत्ता
C. मद्रास
D. जयपूर
28. ग्रॅड कॅनियत ही घळई कोणत्या देशात स्थित आहे?
A. चीन
B. अर्जेंटिना
C. अमेरिका
D. घाना
29. दक्षिण कोरिया ह्या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
A. Kim Jongji
C. Ban-Ki Moon
B. Kim-Jong Un
D. Yoon Suk Yeol
30. उरूग्वे या देशाची राजधानी कोणती?
A. किटो
B. माँटेव्हिदेओ
C. काराकास
D. बोंगोटा
31. इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही?
A. टेसला
B. अमेझॉन
C. स्पेस एक्स
D. सोलार सिटी
32. एनी बेसेन्ट व………. यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
A. गोपाळ कृष्ण गोखले
B. लोकमान्य टिळक
C. लाला लजपतराय
D. महात्मा गांधी
33. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ……….किताबाचा त्याग केला?
A. लॉर्ड
B. सर
C. रावबहादूर
D. बॅरिस्टर
34. सातारा जिल्ह्यात……. यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
A. क्रांतीसिंह नाना पाटील
C. एस.एम. जोशी
B. ना. ग. गोरे
D. अच्युत पटवर्धन
35. कोल्हापूर संस्थानात…………..यांनी जातीभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले.
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
C. राजर्षी शाहू महाराज
D. नरहरी कुरुंदकर
36. सन 1938 मध्ये ……. यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली
A. स्वामी रामानंद तीर्थ
B. डॉ. राम मनोहर लोहिया
C. विश्वनाथ लवंदे
D. महाराज सयाजी गायकवाड
37. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
A. अमेरिका
B. जर्मनी
C. स्विडन
D. फ्रान्स
38. चेत्रई येथील ……. ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.
A. मरिना
B. कलगुट
C. कोबालम
D. कोलावरी
39. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाहा परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल?
A. वातावरण
B. पर्यावरण
C. परिसंस्था
D. अन्नसाखळी
40. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो?
A. 12 जुन
B. 14 जुन
C. 12 जुलै
D. 14 जुलै
धाराशिव पोलीस भरती प्रश्नपत्रिका
41 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समुहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे?
A. हरंगुळ
B. सांगवी
C. शिगोली
D. किलज
42. सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे?
A. हिमाचल प्रदेश
B. अरुणाचल प्रदेश
C. जम्मू-काश्मीर
D. सिक्किम
43. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत ?
A. गोपाळ हरी देशमुख
B. गणेश वासुदेव जोशी
C. विष्णुशास्त्री पंडित
D. दादाभाई नौरोजी
44. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
A. अमरावती
B. सोलापूर
C. नाशिक
D. अहमदनगर
45. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही.
A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
B. मुंबई उच्च न्यायालय
C. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण
D. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ
47. पोलीस उपआधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात?
A. तीन स्टार
B. अशोक स्तंभ
C. अशोक स्तंभ व एक स्टार
D. अशोकस्तंभ व दोन स्टार
48. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.
A. मुक्त आर्थिक धोरण
B. परस्परावलंबन
C. अलिप्तवाद
D. आण्विक विकास
49. भारताचे …………हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.
A. प्रधानमंत्री
B. राष्ट्रपती
C. संरक्षणमंत्री
D. आर्मीचे जनरल
50. पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
A. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद
B. कावेरी पाणी वाटप
C. निर्वासितांचे प्रश्न
D. आंध्रप्रदेशातील नक्षलवाद
51. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही?
A. अमेरिका
B. इंग्लंड
C. भारत
D. यापैकी नाही
52. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही?
A. संघराज्य
C. स्वतंत्र न्याय व्यवस्था
B. संसदीय शासन पद्धती
D. दुहेरी नागरिकत्व
53. शांतता! कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले आहे?
A. विजय तेंडुलकर
B. वसंत बापट
C. संतोष पवार
D. वसंत कानेटकर
54. नाईटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
A. लता मंगेशकर
B. सरोजिनी नायडू
C. इंदिरा गांधी
D. राणी लक्ष्मीबाई
55. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे?
A. एक कदम स्वच्छता की ओर
B. स्वच्छ व सुंदर भारत
C. स्वच्छ भारत, सशक्त भारत
D. एक कदम आरोग्य की ओर
56. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण …………….मोजण्याकरिता वापरतात.
A. काल मापन
B. प्रकाशाची तीव्रता
C. बातावरणातील आर्द्रता
D. आतावरणातील हवेचा दाब
57. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते.
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड डफरीन
58. भारतात रेल्वे ची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड कॅनिंग
C. लॉर्ड माऊंटबॅटन
D. लॉर्ड ऍटली
59. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
A. 1949
B. 1952
C. 1969
D. 1980
60. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
A. प्रेमकुमार घुमल
B. विरभद्र सिंग
C. सुखविंदर सिंग सुखू
D. जे.पी. नड्डा
Police Patil Bharti Osmanabad question paper
61. एक अश्वशक्ती म्हणजे वॅट (watt) होय.
A. 746
B. 764
C. 476
D. 674
62. जेवण: भोजन: झोप 😕
A. वामकुशी
B. निशा
C. गादी
D. निद्रा
63. सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे?
A. हुशार
B. सचिन
C. आहे
D. यापैकी नाही
64. जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वमानामाचा उपयोग करतो?
A. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
B. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
C. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
D. यापैकी नाही
65. ‘माझा चष्मा आण’ यातील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे?
A. संकेतार्थ
B. विध्यर्थ
C. आज्ञार्थ
D. विधानार्थ
66. दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. ‘जिभेला हाड नसणे.’
A. भिती वाटणे
B. निंदा करणे
C. स्तुती करणे
D. वाटेल ते बोलणे
67. आपल्या स्वभाविक बोलण्याला काय म्हणतात?
A. काव्य
B. नाट्य
C. गद्य
D. पद्म
68. ‘राम पुस्तक वाचतो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
A. सकर्मक क्रियापद
B. सहाय्यक क्रियापद
C. अकर्मक क्रियापद
D. प्रयोजक क्रियापद
69. ‘गाय झाडाखाली बसली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? zadakhali – adhorekhit
A. नाम
B. शब्दयोगी अव्यय
C. विशेषण
D. क्रियाविशेषण
70. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात?
A. केवलप्रयोगी अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. उभयान्वयी अव्यय
D. क्रियाविशेषण अव्यय
71. केवलप्रयोगी अव्यये असतात.
A. भावनाप्रधान
B. विचारप्रधान
C. कल्पनाप्रधान
D. वास्तवप्रधान
72. ‘राजूने पुस्तक कोठे ठेवले?’ या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती?राजूने – adhorekhit
A. द्वितीया
B. पंचमी
C. तृतीया
D. प्रथमा
73 . ‘राम सतत गावी जात असे’ हे वाक्य कोणत्या काळातील आहे?
A. रीती वर्तमान
B. पूर्ण भुतकाळ
C. रीती भुतकाळ
D. सामान्य भुतकाळ
74. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.
A. तो मुलगा पेरू खातो
B. मी कामावरून आताच आलो.
C. सिहाकडून गाय मारली गेली.
D. आईने मुलीस समजावले
75. संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झाला अशा शब्दाला काय म्हणतात?
A. तत्सम शब्द
B. तद्भव शब्द
C. देशी शब्द
D. यापैकी नाही
76. ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला ……….म्हणतात.
A. अभ्यस्त शब्द
B. उपसर्गघटित शब्द
C. साधित शब्द
D. प्रत्ययघटित शब्द
77. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात?
A. अव्ययीभाव समास
B. तत्पुरुष समास
C. द्वंद्व समास
D. बहुव्रीही समास
78. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समुहाचा बोध होत असेल तर तो ……समास आहे.
A. बहुव्रीही
B. नवीन कर्मणी
C. द्विगू
D. कर्मधारय
79. ‘धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
A. इंद्रधनुष्य
B. चाण
C. कोदंड
D. दंड
80. ‘ज्याला सीमा नाही असा’ या शब्दसमुहाला एक शब्द निवडा.
A. अमर्याद
B. अपार
C. असीम
D. अनंत
धाराशिव (उस्मानाबाद) पोलीस भरती प्रश्नपत्रिका
81. ‘कणीक तिंवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
A. कणीक भिजविणे
B. खूप मारणे
C. सूड उगविणे
D. यापैकी नाही
82. ‘अकलेचा खंदक’ म्हणजे?
A. अकलेचे खंदक खणने
B. अतिशय हुशार मनुष्य
C. अतिशय मुर्ख मनुष्य
D. शहाण्यांनी खोदलेला खंदक
83) राजेशच्या खिश्यात 5 रु., 10 रु, 20 रु, च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रु. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?
A. 4
B. 5
C.6
D. 2
84. सिता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000, 25000 रुपये गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो. तर सिताचा नफा किती?
A. 4000
B. 8000
C. 6000
D. 10,000
85. संतोष, मनोहर, जय यांच्या आजच्या वयाची बेरीज 65 वर्षे आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 4:5:7 आहे. तर मनोहरचे आजचे वय काय?
A. 25
B. 30
C. 35
D. 20
86. माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तासकाटा पश्चिम दिशा दाखवती तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
A. वायव्य
B. उत्तर
C. दक्षिण
D. आग्रेय
87. रिक्त स्थान पूर्ण करा.
27 22 17 35 29
23 16 9 25 ?
A. 14
B. 15
C. 16
D. 17
88. जर Clock= 44, Time=47, तर Watch=?
A. 45
B. 55
C. 52
D. 50
89. पुढीलपैकी कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे?
A. 487893
B. 5489649
C. 847842
D. 44200
90. भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ ची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली?
A. 1985
B. 1995
C. 1976
D. 1975
91. बस भाडे शेकडा 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले. तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?
A. 35 टके
B. 30 टक
C. 31 टके
D. 32 टके
92. सुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहिण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते?
A. काका-पुतणी
B. भाऊ-बहीण
C. मामा-भाची
D. आजोबा-नात
93. सुरेश हा पुर्वेकडे 5 किमी चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वळून तो 4 किमी. चालला त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 5 किमी चालला. त्यानंतर उजवीकडे वळून तो परत 5 किमी. चालला तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल?
A. 9 किमी उत्तर
B. 5 किमी दक्षिण
C. 4 किमी पूर्व
D. 5 किमी पश्चिम
94. रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर 30 मी. असल्यास 3 किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील?
A. 100
B. 101
C. 200
D. 202
95. कोणता अंक मोठा आहे?
A. 0.05
B. 0.5
C. 0.005
D. 0.0005
96. मालती स्वतः जवळील 2000 रु. 5% दराने 5 वर्षांसाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल?
A. 500
B. 50
C. 250
D. 5000
97. एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे तर या संख्येचा 2/9 भाग शोधा?
A. 80
B. 40
C. 90
D. 45
98. x शहरात 90 हजार लोकांपैकी 0.45 टक्के लोक साक्षर आहेत. y शहरात 75 हजार लोकांपैकी 0.55 टक्के लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
A. x
B. y
C. दोन्हीकडे साक्षर समान
D. यापैकी नाही
99. एका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा 1/3 भाग कर्जफेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या रकमेचा 1/3 भाग घरखर्चासाठी खर्च केला. तेव्हा त्याच्याजवळ 1600 रु. उरले. तर त्या गृहस्थाकडे सुरुवातीस किती रक्कम होती?
A. 3000
B. 3300
C. 3900
D. 3600
100. 10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा दोन वर्षांनी वाढते. तर नवीन माणसांचे वय किती?
A. 45 वर्ष
B. 44 वर्ष
C. 40 वर्षे
D. 42 वर्षे
Dharashiv police Bharti Question Paper या सराव पेपर मध्ये दिलेल्या प्रश्नसंबंधी काही doubt असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Also Read,
Police Bharti GK One liner Question and Answers Marathi