current affairs for mpsc 2020

mpsc current affairs | chalu ghadamodi

भारताकडून आणखी 43 ॲप्स वर बंदी current affairs for mpsc

भारताकडून आणखी 43 ॲप्स वर बंदी घालण्यात आली.  या भारताच्या कृतीला चीनने जागतिक व्यापार नियमांचा भंग असे प्रत्युत्तर दिले आहे.   ॲप्स बंदीच्या भारत सरकारच्या निर्णयावर चीनने टीका केली आहे.  भारतीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी ॲप्सवर घातलेली ही बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे असंही म्हटलं आहे. 

चिनी प्रवक्ते जी रोंग यांनी म्हटले आहे की चिनी कंपन्या आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि देशांमधील इतर नियमांचे पालन करून व्यवसाय करतात. 

 चीन आणि भारत हे देश एकमेकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारे देश असून ते एकमेकांसाठी धोकादायक नाहीत अशी भुमिका चीनने मांडली आहे. 

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या ॲप वरती बंदी घालण्यात आलेली आहे 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारने चीनच्या 59 एप्स वर बंदी घातली होती. यानंतर दोन सप्टेंबरला 118 ॲप्स वरती बंदी घालण्यात आली होती. current affairs for mpsc

current affairs for mpsc
diego maradona current affairs for mpsc

महान फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाच्या 1986 च्या फिफा विश्वचषक विजेतेपदाचे शिल्‍पकार दिएगो मॅराडोना यांचे वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले.  1986 मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये मोलाची भूमिका मॅराडोना यांनी निभावली होती. 

एलन मस्क जागतिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाउंडर एलन मस्क यांनी बिल गेट्स ना मागे टाकत जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.  49 वर्षीय एलन मस्त यांची नेटवर्थ 127.9 अरब डॉलर इतकी झाली आहे.  अमेझॉन चे फाउंडर जेफ बेजोस हे या यादीमध्ये पहिल्‍या क्रमांकावरती आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दशकातील सर्वोत्तम कामगिरी च्या आधारे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये भारतीय खेळाडू विराट कोहली याला पाच विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे.  

  • दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 
  • दशकातील सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू
  • सर्वोत्तम ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटपटू (दशकातील)
  • आयसीसी सद्भावना पुरस्कार 
  • दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू

निवार चक्रीवादळ

बंगालचा उपसागरावरती कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ निर्माण झाले आहे 25 नोव्हेंबर रोजी निवार चक्रीवादळ तमिळनाडू व पुडुचेरी यांच्या किनारी भागात 25 नोव्हेंबर 2020 रोजी  तडाखा देईल असा हवामानाचा अंदाज आहे. current affairs for mpsc

रेडिओ खगोलशास्त्रात मोलाचे योगदान देणाऱ्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या खोडद येथील रेडिओ दुर्बिणी ला जागतिक सन्मान प्राप्त झाला आहे. आय. ई. ई. ई.  माइल स्टोन सन्मान मिळवणारी ही पहिली रेडिओ दुर्बीण ठरली आहे. आय.ई.ई.ई. (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स) या जागतिक संस्थेने जीएमआरटी ला हा पुरस्कार दिलेला आहे.संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या प्रकल्पाला माईलस्टोन प्राप्त होणे अभिमानास्पद आहे. याआधी 1895 मध्ये रेडिओ लहरी बाबत केलेल्या कामासाठी जे सी बोस यांना तर 1928 मध्ये सी व्ही रामन यांना माइल स्टोन प्राप्त झाले आहेत.

current affairs for mpsc

Nobel Puraskar 2020 | नोबेल पुरस्कार २०२० | Nobel Priz

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षण

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment