सी आय डी ऑफिसर कसे बनावे? | CID Information in Marathi
आपण टिव्हीवर गुप्त हेरगिरीच्या संबंधात दाखवल्या जात असलेल्या टिव्हीवरील मालिका पाहत असतो.तेव्हा आपल्यालाही त्या गुप्त हेरांकडे पाहुन वाटत असते की आपण देखील गुप्त हेर बनावे. पण गुप्तहेर कसे बनायचे त्यासाठी काय करावे लागते याबाबत पुरेशी माहीती नसल्यामुळे खुप जणांना आपल्या मनातील ईच्छा पुर्ण करता येत नसते.
असे आपल्या सोबतही होऊ नये म्हणुन आजच्या लेखात आपण सी-आयडी कसे बनावे? CID Information in Marathi त्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे असते? कोणती परिक्षा द्यावी लागते इत्यादी बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
CID Meaning in Marathi
सीआयडी चा मराठी मध्ये अर्थ समजण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे आहे तो म्हणजे सीआयडी हे एका कोणत्या पदाचे नाव नसून हे विभागाचे नाव आहे. सीआयडी म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग. CID – Crime Investigation Department.
सी-आयडी आँफिसर कोण असतो?
सी-आयडी चे पुर्ण रुप होते (सेंट्रल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंट)सी-आयडी हा एक गुप्त हेर असतो जो भारत सरकारसाठी गुन्हयांविषयी हेरगिरीचे काम करत असतो.आणि गुन्हेगाराला पकडत असतो.सी-आयडीच्या पथकाची स्थापणा ही 1906 मध्ये झाली होती जी ब्रिटीश सरकारद्वारे करण्यात आली होती.सी आयडी आँफिसरचा पोलिसां प्रमाणे कोणताही विशिष्ट पोशाख तसेच गणवेश नसतो.ते कोणत्याही पोशाखात काम करत असतात.
सी-आयडी आँफिसरचे काम काय असते?
- अशा प्रकारचे गुन्हेगारी खटले जे खुपच गुंतागुंतीचे असतात.ज्यामध्ये चोरी,लुट,दरोडा,हत्या अपहरण,बलात्कार अशा गुन्हयांचा समावेश होतो अशा गुन्हयांची गुप्तपणे चौकशी करण्याचे काम हे एका सी-आयडी आँफिसरचे असते.
- कोणत्याही गुन्हयाबाबद कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यासाठी आधी एका सी-आयडी आँफिसरला आधी त्या गुन्हयासंबंधी ठोस पुरावे गोळा करावे लागतात.मगच तो संशयित गुन्हेगाराला पकडु शकतो.आणि कोर्टात हजर करू शकतो.
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय असते?
सी आयडी आँफिसर बनण्यासाठी आपली वयोमर्यादा काय असावी हे समजुन घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्गानुसार काय वयाची अट ठेवण्यात आली आहे हे आधी बघावे लागेल.
- आपण जर सामान्य वर्गातुन ओबीसी वर्गातील असाल तर आपल्यासाठी वयाची अट ही 20 ते 27 वर्ष एवढी ठेवण्यात आली आहे.
- आणि जर आपण फक्त ओबीसी वर्गातील असाल तर आपल्यासाठी वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
- आणि समजा जर आपण एस टी किंवा एस टी प्रवर्गातील असाल तर आपल्यासाठी वयाची अट ही 20 ते 32 वर्ष इतकी राहणार आहे.
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी शैक्षणिक तसेच शारीरीक पात्रता काय असावी लागते?
CID Information in Marathi – Educational Qualification
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:
- कमीत कमी आपण कोणत्याही एका क्षेत्रात बारावी उत्तीर्ण झालेलो असले पाहिजे.
- आपण भारताचे नागरीक असणे देखील गरजचे आहे.
- आणि जर आपल्याला सी आयडी मध्ये चांगल्या मोठया पदावर जायचे असेल तर आपण आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे खुप आवश्यक आहे.
- सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी स्त्री आणि पुरुष हे दोघेही अर्ज करू शकतात.
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी लागणारी शारीरीक पात्रता खालीलप्रमाणे :
CID Information in Marathi – Physical Qualification
- पुरूषांची ऊंची कमीत कमी 165 सेंटीमीटर म्हणजेच 5 फुट 2 इंच असावी लागते.
- आणि महिलेची ऊंची कमीत कमी 150 सेंटीमीटर म्हणजेच 5 फुट असणे गरजेचे आहे.
- पुरूष आणि महिला दोघांची छाती कमीत कमी 76 सेंटीमीटर इतकी असायला हवी.
- आपली नेत्रदृष्टी ही म्हणजेच डोळयांचा/चष्म्याचा नंबर आपल्याला चष्मा लागलेला असो किंवा नसो 6/6 इतकी असणे गरजेचे आहे.
- आपल्या डोळयांचा (जवळचा नंबर) 0.6 इतका असावा लागतो.
सी-आयडी आँफिअर बनण्यासाठी आपण कितीवेळा प्रयत्न करू शकतो?
CID Information in Marathi – Attempts
जशा पदधतीने आपल्याला सरकारी नोकरीमध्ये 4 ते 7 वेळा प्रयत्न करण्याची सवलत देण्यात आलेली असते.एकदम त्याचप्रमाणे येथे सुदधा आपल्याला सवलत प्राप्त होत असते.
- ह्यामध्ये जनरल ओबीसीमधील उमेदवार हा 4 वेळा प्रयत्न करू शकतो.आणि ओबीसी वर्गातील उमेदवार हा 7 वेळा प्रयत्न करू शकतो.
- आणि एस सी तसेच एस टी वर्गातील उमेदवार हा कितीही वेळा प्रयत्न करू शकतो ह्याबाबद त्याच्यासाठी कोणतीही मर्यादा लादली गेलेली नाहीये.
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी सगळयात आधी द्याव्या लागत असलेल्या परिक्षेचे स्वरूप कसे असते?
CID Information in Marathi – Exam pattern
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी आपल्याला सगळयात आधी तीन टप्पे हे पार पाडावे लागत असतात. ज्यामध्ये पहिले युपीएससी द्वारे (UPSC) आपली लिखित स्वरुपात परिक्षा घेतली जाते.आणि जी आपल्याला दोन टप्पयात द्यावी लागत असते. CID Information in Marathi
पेपर 1 : ही एकुण दोनशे गुणांची परिक्षा असते.ज्यात दोन तासाचा वेळ हा प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी आपल्याला मिळत असतो.आणि समजा आपले एखादे उत्तर चुकले तर आपल्या गुणांमधुन 0.25 गुण हे कमी केले जात असतात.
पेपर 2 : ही प्रश्नपत्रिका एकुण 200 गुणांसाठी तयार केलेली असते.आणि ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी आपल्याकडे चार तासाचा कालावधी असतो.आणि समजा आपले एखादे उत्तर चुकले तर यात 0.50 गुण हे वजा केले जात असतात.
पेपर 3 : सुरूवातीच्या दोन परिक्षांमध्ये पात्र ठरल्यानंतर ही तिसरी आणि शेवटची परिक्षा घेतली जात असते.जिथे आपली मुलाखत घेतली जाते.आपण त्या मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला सी आयडी आँफिसरचे पद प्राप्त होत असते.
सी-आयडी आँफिसर बनण्यासाठी द्याव्या लागत असलेल्या परिक्षेचा अभ्यासक्रम काय असतो?
CID Information in Marathi
- पेपर 1 : जनरल अव्हेअरनेस,जनरल इंटलिजंस,काँटिटेटिव्ह अँप्टीटयुड,इंग्लिश काँम्प्रहेंशन इत्यादी.
- पेपर 2 : काँटिटेटिव्ह अँप्टीटयुड,इंग्लिश लँग्वेज काँप्रेशन इत्यादी.
सी-आयडी आँफिसरचे वेतन काय असते?
CID Information in Marathi – Salary
एका सी-आयडी आँफिसरचे वेतन किमान काय असते? हे जाणुन घ्यावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की सी-आयडी आँफिसरचे वेतन हे साधारणत किमान 80 हजार ते 1 लाखापर्यत असते.
सी- आयडी आँफिसरच्या अंगी कोणते गुण तसेच कौशल्य असावे लागते?
- एका सी-आयडी आँफिसरचे कम्युनिकेशन स्कील म्हणजेच संवाद कौशल्य हे अत्यंत उत्तम असावे लागते.
- एका सी आयडी आँफिसरच्या अंगी कोणत्याही गुन्हेगारी घटना तसेच प्रसंगाविषयी डीप थिंकिंग करण्याची क्षमता असणे खुप गरजेचे आहे.कारण याच्याने त्याला लवकरात लवकर पुरावे गोळा करून गुन्हेगाराला पकडता येत असते.
- एका सी- आयडी आँफिसरची निरीक्षण शक्ती ही एकदम सुक्ष्म असायला हवी.जेणेकरून त्याला कोणत्याही केसमध्ये सुक्ष्म निरीक्षण करता येत असते.आणि गुन्हेगारापर्यत पोहचता येत असते.
- सुक्ष्म तार्किक क्षमता त्याच्यात असावी लागते.
आणखी पहा …
मी cid मध्ये जाण्यासाठी कुठे अर्ज करू शकतो ,,please help me
At post Nangaon tal daund dist pune
CID chi police bhartisarkhi add vaigre kahi pdte ky?
Sadhya tari Police Bharti chi Ad aahe.