सीए कसे बनावे? सीए बनण्यासाठी काय करावे? Chartered accountant course 2024
सीए चा फुल फॉर्म आहे चार्टर्ड अकाउंटंट. ICAI (The institute of of Chartered Accountants of India) www.icai.org ह्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
काही विद्यार्थी आहेत की त्यांना असे वाटते की भविष्यात आपण पण एक चांगला सीए बनावे. अशा विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळावे यासाठी लेखा-मधून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सीए होण्याची क्रमवार प्रक्रिया स्पष्ट करून देत आहोत. या परीक्षेसाठी आपल्याला अकरावीसाठी कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे. मात्र कॉमर्स मध्येच प्रवेश असावा असे बंधनकारक नाही. कठिण परिश्रमानंतर हा कोर्स साडेचार ते पाच वर्षाचा असतो. या कोर्सच्या यशस्वी परीपूर्ततेनंतर किमान सात लाख रुपये प्रति वर्षइतका पगार मिळतो. सीए म्हणजेच मराठीत सनदी लेखपाल जो एखाद्या संस्थेचा, संघटनेचा किंवा वैयक्तिक लेखा-कर्म पाहत असतो.
Chartered accountant course 2024 | CA Information in Marathi
पुढील तक्त्यातील माहिती तुम्हाला पात्रता नोंदणी शुल्क आणि त्याची कालमर्यादा परीक्षा आणि विषय यासंदर्भात माहिती देईल.
सीए फाउंडेशन कोर्स | सीए इंटरमीडिएट कोर्स | सीए अंतिम अभ्यासक्रम | |
नोंदणीची अंतिम तारीख | 30 सप्टेंबर आणि 30 जून | 20 फेब्रुवारी आणि 31 ऑगस्ट | अंतिम तारीख नाही |
परीक्षा कधी होते? | मे आणि नोव्हेंबर | मे आणि नोव्हेंबर | मे आणि नोव्हेंबर |
नोंदणी वैधता | तीन वर्ष | चार वर्ष | पाच वर्ष |
विषय | 4 | 8 | 8 |
शुल्क | 11300 | 27200/23200 | 32300 |
पात्रता | बारावी पास असावे | सी ए फाउंडेशन कोर्स किंवा पदवी/ पदव्युत्तर पदवी (post graduation) | सीए इंटरमीडिएट कोर्सआणि तीन वर्षांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण (CA Articleship) |
सप्टेंबर 2017 पासून ICAI (The Institute of Chartered Accountants of India) ने सनदी लेखपाल आ संबंधित अभ्यासक्रम पुनर्रचित केला आहे. त्यांनी सीपीटी च्या ठिकाणी फाउंडेशन कोर्स, आयपीसीसी च्या ठिकाणी इंटरमीडिएट कोर्स आणि जुन्या अंतिम कोर्सच्या च्या जागी नवीन अंतिम कोर्स सुरू केला आहे.
संपूर्ण सनदी लेखापाल अभ्यासक्रम साडेचार ते पाच वर्षाचा असू शकतो. जर विद्यार्थ्याने प्रत्येक परीक्षा पहिल्या प्रयत्नात परीक्षा पास केली तर.
पुढील प्रमाणे सप्टेंबर 2017 पासून सी ए कोर्स असेल.
- 1. CA Foundation course
- 2. CA Intermediate Course
- 3. CA Articleship
- 4. CA Final Course
सीए होण्यासाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.
1. एक पहिल्यांदा तुम्हाला सी ए फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी करावी.
पहिल्या टप्प्यामध्ये फाउंडेशन कोर्सला नोंदणी करत असताना आपल्या मनामध्ये एक गैरसमज असतो की कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात किंवा सीए होऊ शकतात.
मात्र तसे काही नाही कला, वाणिज्य, विज्ञान कोणत्याही शाखेचा विद्यार्थी सीए फाउंडेशन कोर्सला नोंदणी करण्यासाठी पात्र आहे. अट इतकीच आहे की किमान बारावीमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त मार्क असावेत.
नोंदणी प्रक्रिया कोठे करावी?
सी ए फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी प्रक्रिया ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर करावे.
नोंदणी केल्यानंतर आपल्याला अभ्यासासाठी चार महिन्याचा वेळ मिळतो. यानंतर तुमची परीक्षा असते. परीक्षेला बसण्यासाठी परीक्षा फॉर्म भरावा लागतो. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेसाठी प्रवेश पत्र मिळते. नोंदणी करणे आणि परीक्षेसाठी अर्ज करणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.
फाउंडेशन परीक्षा वर्षातून दोन वेळा होत असते. परीक्षा मे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असते. परीक्षेसाठी नोंदणी डिसेंबर आणि जूनमध्ये करावी लागत असते.
फाउंडेशन कोर्स साठी एकत्रित शुल्क 11300 रुपये आहे ज्यामध्ये नोंदणी फी, परीक्षा फी, ऑनलाइन फॉर्म फी अंतर्भूत असते.
सी ए फाउंडेशन कोर्स साठी चार विषय असतात. यामध्ये मूलभूत लेखा आणि हिशेब तपासणी (basic Accounting Auditing) विषयक प्रश्न असतात.
दोन विषयांमध्ये / पेपर मध्ये वर्णनात्मक (Subjective) उत्तरे अपेक्षित आहेत तर दोन विषयांमध्ये वैकल्पिक (Objective) उत्तरे अपेक्षित आहेत.
सीए फाउंडेशन कोर्स पेपर्स, ca foundation
- पेपर 1 – Principle and practice of accounting
- पेपर 2 – business laws and business correspondence and reporting
- पेपर 3 – business mathematics and logical reasoning and statistics
- पेपर 4 – business economics and business and commercial knowledge
सी ए फाउंडेशन कोर्स पेपर्स चा निकाल जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये जाहीर केला जातो.
वैधता – फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी केल्यानंतर तीन वर्षाच्या आत आपल्याला ही परीक्षा पास होणे आवश्यक असते. म्हणजे जास्तीत जास्त सहा प्रयत्नात ही परीक्षा आपल्याला पास होणे गरजेचे आहे. सहा प्रयत्नात ही परीक्षा पास झालो नाही तर पुन्हा नोंदणी शुल्क भरून नोंदणी करावी लागते.
फाउंडेशन कोर्स मध्ये पास होण्यासाठी 40% चार पेपर चे मार्क किंवा 50% एकूण मार्क्स मिळणे आवश्यक आहे.
2. सीए होण्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये CA Intermediate Course साठी नोंदणी करावी लागते.
सीए इंटरमीडिएट कोर्स नोंदणी दोन प्रकारे करता येते
- 1. बारावीनंतर
- 2. पदवीनंतर
बारावीनंतर इंटरमीडिएट कोर्स नोंदणी करण्यासाठी फाउंडेशन कोर्स पास केलेला असावा.
पदवीनंतर किंवा पदवीत्तर पदवी नंतर इंटरमीडिएट कोर्स नोंदणी करता येते. ज्यामध्ये फाउंडेशन कोर्स देणे बंधनकारक नाही.
नोंदणी – इंटरमीडिएट कोर्स नोंदणी मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये केली जाते. ज्या ची परीक्षा नोव्हेंबर आणि मे महिन्यामध्ये होते
वैधता – इंटरमीडिएट परीक्षेसाठी नोंदणीची वैधता चार वर्षे असते म्हणजे आपल्याकडे आठ प्रयत्न असतात. आठ प्रयत्नांमध्ये इंटरमीडिएट परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर अभ्यासासाठी 9 महिने आपल्याला मिळतात. या नऊ महिन्यांमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो.
नोंदणी केल्यानंतर इंटरमीडिएट परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते. परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर परीक्षा प्रवेश पत्र मिळते.
इंटरमीडिएट परीक्षा दोन गटांमध्ये विभागणी आहे पहिल्या गटामध्ये शंभर मार्गाचे चार विषय असतात अगदी तसेच दुसऱ्या गटांमध्ये देखील शंभर गुणांचे चार विषय असतात.
गट 1
- Paper 1 accounting 100 marks
- paper 2 corporate laws and other laws (100 marks)
- part 1 company law (60 marks)
- part 2 to other Lords (40 marks)
- paper 3 e cost and Management Accounting (100 marks)
- paper 4 taxation (100 marks)
- section a – Income Tax law (60 marks)
- section B indirect taxes (40 marks)
गट 2
- Paper 5 Advanced Accounting 100 marks
- paper 6 auditing and assurance
- paper 7 Enterprise information systems and strategic management (100 marks)
- part 1 – enterprise information system (50 marks)
- part 2 – strategic management (50 marks)
- paper 8 Financial Management and economics for finance (100 marks)
- part 1 financial management (60 marks)
- part 2 Economics of Finance (40 marks)
इंटरमीडिएट कोर्ससाठी दोन्ही ग्रुप ची एकत्रित फीज 27 हजार दोनशे रुपये इतकी आहे. ज्यामध्ये नोंदणी शुल्क परीक्षा शुल्क इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. इंटरमीडिएट कोर्स पूर्ण केल्यानंतर सीए अंतिम/ ca final साठी नोंदणी करता येते.
3. सीए अंतिम CA final
इंटरमीडिएट कोर्सनंतर आर्टिकल शिप साठी तुम्ही नोंदणी करू शकता. इंटरमीडिएट कोर्स मधील दोन गटातील एकही गट क्लियर असेल तरी आर्टिकलशिप मिळू शकते. आर्टिकलशिप तीन वर्षासाठी असते. आर्टिकलशिप हा सीए होण्याचा अविभाज्य भाग आहे. आर्टिकलशिप सुरू असताना विद्यावेतन आपल्याला मिळत असते. आर्टिकलशिप च्या अंतिम सहा महिन्यांमध्ये तुम्ही अंतिम परीक्षेसाठी नोंदणी करू शकता .
सीए अंतिम कोर्स CA final | ca information in Marathi
सीए अंतिम साठी नोंदणी करण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा नाही. मात्र परीक्षा देण्याची तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम परीक्षा मे आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये प्रत्येक वर्षी होत असते. अंतिम परीक्षेसाठी नोंदणी वैधता पाच वर्षाची असते.
एकूण शुल्क – सीए अंतिम साठी एकूण शुल्क 32 हजार तीनशे रुपये आहे.
सीए अंतिम परीक्षा दोन गटांमध्ये विभागलेली असते ज्यामध्ये प्रत्येक विषयांमध्ये किमान 40 टक्के मार्क असावेत किंवा एकत्रितरीत्या 50 टक्के मार्क असावेत. असे गुण मिळविणारा विद्यार्थी सी ए फायनल किंवा अंतिम पास समजला जातो.
सीए अंतिम परीक्षा झालेल्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत निकाल जाहीर होतो.
सीए अंतिम साठी विषयांची यादी
- Paper 1 – financial reporting
- paper 2 – Strategic financial management
- paper 3 – advanced auditing and professional ethics
- paper 4 – corporate and economic laws
- Paper 5 – strategic Cost Management and performance evaluation
- paper 6a – risk management
- paper 6b – financial services and capital markets
- paper 6c – International taxation
- paper 6D – economic laws
- paper 6e – global financial reporting standards
- paper 6f – multidisciplinary case study
- paper 7 – direct tax laws and international taxation
- paper 8 – indirect tax laws
सीए होण्याच्या तीन पातळी मधील सीए अंतिम किंवा CA Final ही पातळी तुलनात्मक दृष्ट्या कठीण असते. सीए परीक्षा पास होण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि अभ्यासाची गरज असते. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शनाने सीए होणे अतिशय सोपे आहे.
वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक यशस्वी सनदी लेखापाल CA – Chartered accountant होऊ शकता. अधिकृत वेबसाईट. अपेक्षा आहे मनातील सर्व शंकांचे निरसन झाले असेल आणि सीए विषयक पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. ca information in Marathi
Accounting – लेखा Auditing – हिशेब तपासणी
हे ही वाचू शकता –
NEET Exam Information in Marathi
12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?
Hii
Sir B. A ke bad C. A ke liye apply kr sakate hai kya
Yes, आप कर सकते हो| पोस्ट शेअर कर के सहकार्य करे|
Sir ca ki exam ki jo fees hoti hai, open keliye alag general keliye alag Aisa hota hai???
open ka matalab hi general hota hai.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.
Very informative
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/
12 vi nantr direct CA foundation la admissions gheu shakato ka
yes. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/
Helllo Sir,
CA Foundation course ची exam कशी असते mcq टाईप असते का ?
yes. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/
Hi ma’am
CA च्या तयारीसाठी कोणती पुस्तके आहेत..??
yes
sir, CA Graguation ke bad kar sakate hai kya………..?
yes
Ca foundation sathi kadhi apply karaych asata