MPSC time table 2023 | MPSC Exam Date
महाराष्ट्र मध्ये अनेक विद्यार्थी MPSC Exam ची तयारी करत आहेत.अनेक विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी.
सन 2023 मध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.
दिलेल्या वेळापत्रकामध्ये लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे पूर्व आणि मुख्य असे एकत्रित वेळापत्रक जाहीर केले आहे.
MPSC time table 2023 या वेळापत्रकामध्ये जानेवारी 2023 पासून ते डिसेंबर 2023 पर्यंत ची माहिती विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. सदर दिलेली माहिती ही अंदाजित आहे. तत्कालीन परिस्थितीनुसार तारखे मध्ये बदल होण्याची शक्यता आहे हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
काही महत्त्वाच्या परीक्षा आणि त्याच्या तारखा पुढील तक्त्यामध्ये दर्शवलेल्या आहेत.
क्र. | परीक्षेचे नाव | संवर्ग | परीक्षेचे स्वरूप | जाहिरात कधी येईल? | पूर्व परीक्षेचा दिनांक | मुख्य परीक्षेचा दिनांक |
१ | दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग | दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | जानेवारी २०२३ | १९ मार्च २०२३ | |
२ | महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा – २०२३ | (१) सहायक कक्ष अधिकारी(२) राज्य कर निरीक्षक(३) पोलीस उपनिरीक्षक(४) दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक(५) कर सहायक(६) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(७) उद्योग निरीक्षक(८) लिपिक-टंकलेखक (९) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय(१०) सहायक मोटार वाहन निरीक्षक | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | जानेवारी २०२३ | ३० एप्रिल २०२३ | |
3 | महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्यपरीक्षा २०२३ | (१) सहायक कक्ष अधिकारी (२) राज्य कर निरीक्षक(३) पोलीस उपनिरीक्षक(४) दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | – | – | ०२ सप्टेंबर, २०२३ |
४ | महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२३ | (१) कर सहायक(२) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(३) उद्योग निरीक्षक(४) लिपिक-टंकलेखक(५) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | – | – | ०९ सप्टेंबर, २०२३ |
५ | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – २०२३ | (१) राज्य सेवा – ३३ संवर्ग(२) यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा(३) विद्युत अभियांत्रिकी सेवा(४) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा(५) विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (६) कृषि सेवा(७) सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र (८) अन्न व औषध प्रशासकीय सेवा (९) वनसेवा | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | फेब्रुवारी २०२३ | ४ जून २०२३ | |
६ | राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ | राज्य सेवा – ३३ संवर्ग | वर्णनात्मक | – | – | ३० सप्टेंबर, २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ |
वरील दिलेले वेळापत्रक हे अंदाजित वेळापत्रक आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या तयारीचा आराखडा तयार करता यावा. आणि एक नियोजनबद्ध अभ्यास व्हावा यासाठी हे वेळापत्रक उपयुक्त ठरू शकते.
अधिक विस्तृतपणे वेळापत्रक खाली दिलेली लिंकवरती तुम्ही पाहू शकता.
आणखी माहिती…