ITI कसे करायचे? ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी | ITI Course information in Marathi

ITI admission, Qualification, And Job | ITI Course information in Marathi

        तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेखात अनेक विषयावर लेख पाहिले. तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण पाहणार आहोत. तो विषय म्हणजे आयटीआय ITI कशी करायची? आयटीआय म्हणजे काय? आयटीआय हा कोर्स कोण करू शकतो? आयटीआय ची ऍडमिशन प्रोसेस काय असते? व आपण आयटीआयला ॲडमिशन कसे मिळवायचे? इत्यादी असे अनेक आयटीआय बद्दलची संपूर्ण माहिती आपण मराठी भाषेत माहिती मिळविणार आहोत.

आपण आजच्या या लेखामध्ये खाली दिल्या प्रमाणे किंवा या अनुक्रमे नुसार काही महत्वाचे मध्ये पाहणार आहोत :- 

1. आयटीआय ITI म्हणजे काय?

2. आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) या दोघांमध्ये काय फरक आहे? 

3. आयटीआय ITI हा कोर्स किती वर्षाचा असतो?

4. आयटीआय ITI कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?

5. आयटीआय ITI कोर्स ची फी किती असते?

6. आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी.

7. आयटीआय ITI कोर्स नंतर काय?

8. अंतिम निष्कर्ष :-

 •~ The Full Form of ITI (Industrial Training Institute) औद्योगिक प्रशिक्षण संस्था  ~•

1. आयटीआय ITI म्हणजे काय? 

            ITI म्हणजे Industrial Training Institute औद्योगिक प्रशिक्षण संस्था होय. ITI म्हणजे शासनाची मान्यताप्राप्त असलेली अनेक विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था आहे. वाढती इंडस्ट्रीज च्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने या कोर्सची सुरुवात केली. तर मित्रांनो आयटीआय हा एक असा कोर्स आहे जो की तुम्ही कमी वयात शिक्षण पूर्ण करून एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये काम करू शकता. 

2. आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) या दोघांमध्ये काय फरक आहे? 

            तर सर्व विद्यार्थ्यांना असे वाटते की आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) हे दोन्ही कोर्स सारखे आहेत. तर तसं नाही या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण आयटीआय कोर्स हा 2 वर्षाचा असतो. आणि डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) हा कोर्स 3 वर्षाचा असतो. तर आयटीआय करणार्या विद्यार्थ्यांचा हा फायदा आहे की ते 2 वर्षांनंतर लगेच विद्यार्थ्यांला एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवता येते. आणि डिप्लोमा इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला कोर्सच्या विषयांमध्ये त्यांना चांगला नॉलेज मिळतो आणि त्यांना हवी असेल तर पुढचा शिक्षणही घेता येतो. 

3. आयटीआय ITI हा कोर्स किती वर्षाचा असतो?

         तर विद्यार्थी मित्रांनो आयटीआय या कोर्सचा कालावधी 2 वर्षाचा हा कोर्स असतो. यामध्ये विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन चा शिक्षण दिला जातो. आणि काही कोर्स 6 महिना, 9 महिना व 1 वर्षाचे सुद्धा असतात. त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे ट्रेड Trade असतात इंजीनियरिंग ट्रेड (Engineering Trade) आणि नॉन इंजीनियरिंग ट्रेड (Non Engineering Trade)

4. आयटीआय ITI कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?

         तर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की आयटीआय कोर्स करण्यासाठी आपली योग्यता व पात्रता काय असावी लागते? तर विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त असलेल्या विद्यालयातून किंवा शाळेतुन 8th, 10th आणि 12th पास होणे गरजेचे असते. आणि दहावी व आठवीच्या सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुण मिळविणे अनिवार्य असते. किंवा आयटीआय कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) सुद्धा घेतली जाते. त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे कॉलेज अलोट होतात ते म्हणजे Government College आणि Private College त्यानुसार तुम्ही आवडते कॉलेज निवडू शकता. 

5. आयटीआय ITI कोर्स ची फी किती असते?

           आयटीआय कोर्स ची फी एका वर्षासाठी 5000/ वर्ष पासून सुरुवात होते. आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये 25 हजार ते 50 हजार पासून फी असते. आणि आपणाला सरकारी कॉलेज मध्ये ॲडमिशन मिळवायचे असेल तर त्या कॉलेजची फी कमी असते. व खाजगी कॉलेज ची फी ही जास्त असते. त्यामध्ये सरकारी कॉलेज मध्ये प्रति वर्षे 7 हजार ते 10 हजार इतकी फी आकारली जाते. 

6. आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी.

          आपण पाहायला गेले तर आयटीआय कोर्स चे अभ्यासक्रम हे 100+ आहेत. त्यामध्ये आपण आपल्या आवडी चा कोणताही कोर्स निवडू शकतो. तर या लेखांमध्ये आपण काही प्रमुख कोर्सची नावे देणार आहोत ते सध्या Top Level ला आहेत.

∆ 10th नंतरचे आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी खालील प्रमाणे  :- 

कोर्सची नावे कालावधी नोकरीचे प्रकार
फिटर (Fitter) 2 वर्षे  Fitter, Welder, Technician, Mechanical fitter, Pipe fitter, Trainer इत्यादी.
इलेक्ट्रिशियन (Electrician) 2 वर्षे Supervisor, Technician, Wireman, Lineman, Repair Expert इत्यादी.
प्लंबर (Plumber)  1 वर्ष Plumber, Pipe Fitter, Roof Plumber इत्यादी. 
मशीन टूल मेंटेनन्स (Machine Tool Maintenance)  2 वर्षे Mechanical fitter, Compressor attendant, Mechanical tool maintenance, Auto mechanical diesel, Brass finisher इत्यादी.
क्राफ्टस्मन फुड प्रोडक्शन (Craftsman Food Production)  1 वर्ष Food safety associate, Skilled knife operator, Cleaning operative इत्यादी.
वेल्डर (Welder)  1 वर्ष Welder, Tack Welder, Fabricator helper, Arc welder, Steel Welder इत्यादी.
पेन्ट टेक्नॉलॉजी (Paint Technology)  2 वर्षे Painter, Wood Painter, 3D Texturing Artist इत्यादी.
मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)  1 वर्ष  Spare parts sales assistant, Autodiesel engines mechanic, Auto fitter इत्यादी.
सिव्हिल (Civil Draughtsman)  2 वर्षे Structural droughtsman, architectural assistant इत्यादी.
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator and Programming Assistant)  1 वर्ष Computer operator, Data entry, Control operator, Data Capturer, Customer service operators इत्यादी.
ITI

7. आयटीआय ITI कोर्स नंतर काय?

            डिप्लोमा कोर्स म्हणजेच तांत्रिक किंवा अभियांत्रिकीय अभ्यासक्रमात आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ते तुम्ही करू शकता. विद्यार्थी सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरी करू शकता. किंवा विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात त्यामध्ये वेल्डर (Welder), इलेक्ट्रिशियन(Electrician) चे दुकान काढू शकता. 

8. अंतिम निष्कर्ष :-

          तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या लेखांमधून समजले असेल की आयटीआय कशी करायची? आयटीआय म्हणजे काय? आयटीआय हा कोर्स कधी करतात? व त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता काय आहे? इत्यादी अशा अनेक गोष्टी किंवा बाबींचा तुम्हाला सर्वांना कळालेच असेल. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आयटीआय कशी करायची? याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा आयटीआय बद्दल शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता.

         तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखातून समजले असेल की आयटीआय ITI हा कोर्स कशी करायची? इत्यादी तर तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की आयटीआय ITI कशी करायची? किंवा आयटीआय ITI म्हणजे काय? व त्यानुसार तुम्ही आयटीआय ITI या कोर्सच्या तयारीला लागू शकाल.
हे हि वाचा …

वकील कसे होतात?

शिक्षक कसे होतात?

UPSC information in Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

12 thoughts on “ITI कसे करायचे? ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी | ITI Course information in Marathi”

  1. Scvt dijel mekaynik 1varshacha asto ka msbvt che fiter cours1yearcha asto ka.karandvte fitter2year dijel mekaynik 2year kasa kay

    Reply
  2. 8 वी पास नसताना पन 9वी 50/टकेनी पास असताना ITI मध्ये कारपेटर साठी प्रवेश कसा घेता येतो

    Reply

Leave a Comment