भूकंपाचे प्रकार आणि त्सुनामी | Bhukamp information in Marathi
भूकंप– पृथ्वीतील भूकवचामधील खडकांमध्ये विभंग निर्माण होऊन तुटलेल्या खडकांमध्ये घर्षण निर्माण होते. पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होते. भूकंपामुळे पाळीव प्राण्यांना व मनुष्यांना जीवित हानी होते. भूकंपामुळे मातीचे घरे कोसळतात. शासकीय कार्यालय, इमारती, रस्ते यांचे भूकंपामुळे खूप नुकसान होते. भूकंपामुळे जैवविविधतेचे हेही नुकसान होते.
भूकंपनाभी – ज्या ठिकाणाहून भूकंप तरंग निर्माण होतात ते भू-केंद्र पृथ्वीच्या अंतरंगातील असतात.
भूकंप तरंगाचे प्रकार–
1) प्राथमिक तरंग-प्राथमिक तरंग हे सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. प्राथमिक तरंगामुळे त्या तरंगांच्या कणांची हालचाल सारखे तरंगाच्या दिशेने मागेपुढे होत असते.
2) द्वितीयक तरंग- द्वितीय तरंग हे भूपृष्ठावर प्राथमिक तरंगा नंतर पोहोचली जातात. प्राथमिक तरंगापेक्षा द्वितीयक तरंग हे विध्वंसक असतात. द्वितीयक तरंगांना पाण्यामधून प्रवास करता येत नाही. तरंगाचे हालचाल काटकोन दिशेने होते.
3)पृष्ठतरंग- भूपृष्ठावरील हॅपी केंद्रापासून पृष्ठतरंग यांची निर्मिती होते. पृष्ठ तरंगाचा वेग खूप प्रमाणात कमी असतो. पृष्ठ तरंग हे विध्वंसक असतात.
भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र कोणती आहेत ?
अरुणाचल प्रदेश, नागालँड, हिमालय, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, बिहारचा उत्तर भाग, अंदमान निकोबार, मिझोराम, मनिपुर हे भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र आहेत.
त्सुनामी
सागरतळावर भूकंप, ज्वालामुखी आणि नैसर्गिक घटकांमुळे भेगा पडतात त्यामुळे त्सुनामीच्या लाटा भरपूर प्रमाणात तयार होतात. समुद्र किनारी जेव्हा भूकंप होते तेव्हा महाकाय सागरी लाटा किनाऱ्यावर येऊन आपटतात. त्यामुळे अपरिमित हानी होतात. हिमलोट, उल्कापात, अणुस्फोट, भूमिपात यामुळे महासागरात मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होतात. सुनांमीची लाटा अधिक प्रमाणात भूकंप व ज्वालामुखी मुळे तयार होतात. महासागरातील सर्वसाधारण लाटा पेक्षा सुनामीच्या लाटा वेगळ्या पद्धतीचे असतात. सुनामीच्या लाटा खूप वेगवान असतात. सुनामीमुळे किनाऱ्यालगतच्या लोकांचे खूप नुकसान होते. घरे पडतात, पर्यावरणाची वित्तहानी होते, लोक मृत्युमुखी पडतात.
ज्वालामुखी
ज्वालामुखी ही एक पर्यावरणीय / नैसर्गिक आपत्ती आहे. अतिउष्णतेमुळे भूपृष्ठ मधील खडकावर चा दाब कमी होऊन खडक वितळते त्यामुळे शिलारस तयार होते. शिलारस याला भेगा पडल्यामुळे त्याचा साठा जमिनीवर होतो. त्यामुळे त्या शिलारसातील वायु वातावरणामध्ये मिसळले जातात. शीलारसामधून बाहेर पडलेल्या वायू चा उपयोग बाष्पामध्ये भरपूर प्रमाणात असते.
कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साईड हे वायू शिलारस या ज्वालामुखीत मिसळलेले असतात. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, यासारखे अनेक रासायनिक पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूपृष्ठावर साचले जाते. ज्वालामुखीतून निघालेला लाव्हारस हा दूरपर्यंत पसरला जातो. ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्यातून वायू बाहेर पडतो ते वायू वातावरणात मिसळले जाते. वातावरणात वायू मिसळल्यामुळे ढगांची निर्मिती होते. ढगांची निर्मिती झाल्यामुळे कधी कधी पाऊस पडतो. जपान मध्ये कुशिनोराबु या बेटावर २९ मे २०१५ रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
भारताचा भूगोल – पर्वत व पठार Bharatacha Bhugol
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक Samajsudharak in Marathi
Upsc Book List In Marathi 2021 Free Download