शिक्षक भरती २०२१ Latest Shikshak Bharti 2021

केंद्रीय आदिवासी विभागाअंतर्गत शिक्षकांची भरती, Shikshak Bharti 2021

 शिक्षक भरती २०२१ केंद्रीय आदिवासी विभागाअंतर्गत शिक्षकांची मोठी भरती होणार आहे. ३४७९ परमनंट कायमस्वरूपी भरती होणार आहे. 

 केंद्रीय आदिवासी मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये नव्याने शिक्षकांची भरती होणार आहे. (EMRS – Eklavya Model Residencial School)  देशभरातील सतरा राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या एकलव्य निवासी शाळांमध्ये ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.  यामध्ये चार प्रकारचे शिक्षक भरण्यात येतील असे केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने आपल्या जाहिरातीमध्ये कळवले आहे. 

Shikshak Bharti 2021
Shikshak Bharti 2021

 प्राचार्य, उपप्राचार्य, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ग्रॅज्युएट टीचर अशा चार प्रकारच्या शिक्षकांच्या एकूण ३४७९ जागा भरावयाच्या आहेत. 

 Shikshak Bharti 2021 भरती प्रक्रिया कशी होणार आहे?

एकलव्य निवासी शाळेमध्ये होणारी ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.  आधी संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे.  यानंतर मुलाखत कार्यक्रम पार पडणार आहे. सदर भरती प्रक्रिया राज्य स्तरावर ती राबवण्यात येणार आहे. 

देशातील एकूण 17 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिक्त असलेल्या/ भरावयाच्या जागा पुढील तक्त्यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत. 

Shikshak Bharti 2021 – अर्ज करण्याची मुदत

आदिवासी मंत्रालय अंतर्गत या प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची मुदत १ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत आहे. 

परीक्षेची अंदाजित तारीख

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षा पार पाडल्या जातील असे मंत्रालयाकडून कळविण्यात आलेले आहे. 

अर्ज करण्यासाठी लिंक

https://tribal.nic.in

सध्या देशामध्ये २८८ एकलव्य निवासी शाळा कार्यरत आहेत.  यापुढे ४५२ नव्या एकलव्य निवासी शाळा स्थापण्यात येणार आहेत.  या नव्याने निर्माण होणाऱ्या शाळांसाठी शिक्षकांची गरज भागवण्यासाठी वेळोवेळी अशा पद्धतीने भरती करण्यात येईल असे केंद्रीय आदिवासी मंत्रालयांमार्फत कळविण्यात आलेले आहे. 

आणखी माहिती पहा…

Maharashtra government teacher recruitment 2021

Maharashtra police bharti 2021

Railway Bharti 2021

NDA Admission process in Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment