GDP म्हणजे काय | GDP in Marathi | GDP Information in Marathi
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ? GDP म्हणजे काय?
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आणि GDP या संकल्पना समजुन घेण्याआधी राष्ट्रीय आणि उत्पन्न हे समजुन घेऊ.
उत्पन्न: अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते. त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे लागतात.तर काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यास कष्ट करावे लागत नाही. उदा. व्याज, देणग्या इ.
राष्ट्रीय: राष्ट्रीय म्हणजे एकतर क्षेत्राबाबत संदर्भ दिला जातो.किंवा नागरिकांच्याबाबत त्यांच्या अदिवासाच्या किंवा नागरिकत्वाबाबत वापरला जातो. भारताच्या नागरीकांचा निवास व देशाचे आर्थिक क्षेत्र यांचा एकत्रित विचार करून उत्पन्नाचे मोजमाप करणे याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येऊ शकते.
मध्यवर्ती वस्तू विरुद्ध अंतिम वस्तू –
मध्यवर्ती वस्तू: एका उद्योगाने पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंना मध्यवर्ती वस्तू म्हणतात.
अंतिम वस्तु: ज्या वस्तूची खरेदी अंतिम उपभोगासाठी केली जाते अशा वस्तूंना अंतिम वस्तू असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना केवळ अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचेच मोजमाप केले जाते.
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? | Net national product in Marathi
देशांतर्गत संस्था व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात मिळवलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते.
- उत्पन्न पद्धत (income method)
- उत्पादन पद्धत (product method)
- खर्च पद्धत (expenditure method)
- उत्पन्न पद्धत(income method) –
- उत्पन्न पद्धत (income method)
1) उत्पन्न पद्धत (income method in marathi)
या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते.वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उत्पन्न पद्धत म्हणतात. उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते.
2) उत्पादन पद्धत (product method in Marathi ): या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.
3) खर्च पद्धत(expenditure method in Marathi): राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते. उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो. गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील असा दोन प्रकारचा असतो.
स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? | What is Gross Domestic product in Marathi
राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
येथे पहा… 12 वी नंतर काय करावे?
स्थूल राष्ट्रीय उत्पाद GNP (Gross National product) –
GDP मधील उत्पन्न मोजणी ही भौगोलिक सीमा या घटकावर आधारभूत आहे. मात्र, GNP हे नागरिक तत्वावर आधारित देशाचे उत्पन्न आहे. देशाच्या नागरिकांनी परदेशात कमवलेले उत्पन्न आणि परकीयांनी आपल्या देशात कमवलेले उत्पन्न यांचा फरक GDP त मिळवून स्थूल राष्ट्रीय उत्पाद काढला जातो.
सूत्र – GNP = GDP + (X-M)
X = EXPORT
M = IMPORT
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP | Net national product in Marathi
GROSS म्हणजे ढोबळ तर NET म्हणजे निव्वळ होय. ढोबळ म्हणजे एखाद्या आर्थिक क्रियेतून बाकी राहिलेले उत्पन्न.
उदा. समजा, एका कारखान्यात एक लाख रुपये गुंतवून सुरू केलेल्या व्यवसायात एका वर्षात 20 हजार उत्पन्न निघाले. मात्र यासाठी पाच हजार रुपयांची यंत्राची झीज झाली. यासाठी हे पाच हजार रुपये झीज भरून काढण्यासाठी वापरावी लागते. मिळालेल्या उत्पन्नातून हा खर्च वजा करावे लागेल. मग या व्यवसायातील निव्वळ उत्पन्न 15 हजार रुपये झाले असे म्हणता येईल.
झीज म्हणजेच घसारा होय. यालाच Depreciation असे म्हणतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात हा घसारा वजा करून येणारे उत्पन्न होय.
सूत्र – NNP = GNP – D
निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP (Net domestic product) –
GDP मधून घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळते.
सूत्र – NDP = GDP – D
दरडोई उत्पन्न PCI (Per capita income) –
राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते. GDP जास्त असेल व लोकसंख्याही जास्त असली तर PCI कमी येतो.
क्रयशक्ती समानता म्हणजे काय ? क्रयशक्ती समानता कशी मोजतात ?
क्रयशक्ती समानता PPP | Purchasing power parity in Marathi
कार्ल गुस्ताव कॅसेल या स्वीडिश अर्थ तज्ञाने क्रयशक्ती ही संकल्पना मांडली. क्रयशक्ती समानता किंवा क्रयशक्ती हा विनिमय दराच्याही पलीकडे चलनाची खरेदी शक्ती दर्शवितो. चलनाची तुलना करताना दोन देशांची वास्तव किंमत व क्रयशक्ती हे दोन भिन्न दर्शक असतात.
उदा. भारतात एक डॉलर म्हणजे सरासरी 80 रुपये आहेत असे मानू. त्या 80 रुपयात आपण भारतात कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकतो यावर क्रयशक्ती अवलंबून असते.
भारतात 80 रुपयात आपण ज्या वस्तू खरेदी करू शकतो त्याच 80 रुपयात (एक डॉलर मध्ये) आपण अमेरिकेत ज्या वस्तू खरेदी करू शकतो या दोन्हीतील खरेदी वरून क्रयशक्ती काढली जाते. समजा भारतातल्या 80 रुपयांमध्ये 4 पेन येत असतील आणि अमेरिकेतल्या एक डॉलर मध्ये दोन पेन येत असतील तर भारताच्या रुपयाची क्रयशक्ती जास्त आहे असे समजले जाते.
1 डॉलर = 80 रुपये हा झाला विनिमय दर आणि डॉलर व रुपयामध्ये आपण ज्या ज्या वस्तू खरेदी करतो त्या वस्तू म्हणजे प्रत्येक चलनाची खरेदी शक्ती होय. एका अर्थाने खरेदी शक्ती म्हणजे क्रयशक्ती म्हणता येईल.
अर्थव्यवस्थेतील क्षेत्रानुसार जीडीपी व्यक्त केला जातो. त्याला क्षेत्रीय जीडीपी असे म्हटले जाते. हे क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत.
- प्राथमिक क्षेत्र: नैसर्गिक स्त्रोत आपण पासून किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित जे व्यवसाय केले जातात अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात आणि या प्राथमिक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आहे ते प्राथमिक क्षेत्रातील उत्पन्न म्हणून गणले जाते उदाहरणार्थ कृषि उत्पन्न, पशुपालन,वन्य उत्पादन इ.
- द्वितीय क्षेत्र: द्वितीय क्षेत्राला उद्योग-क्षेत्र असे म्हणतात. आणि या उद्योग क्षेत्रांमध्ये जे उत्पन्न मिळवले जाते या उत्पन्नाचा समावेश द्वितीय क्षेत्रातील उत्पन्न या वर्गवारीत केला जातो.
- तृतीय क्षेत्र: तृतीय क्षेत्रांमध्ये प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांना सहाय्यकारी क्रियापद असतात. ज्या पूरक क्रिया असतात. त्या तृतीय क्षेत्रात येतात. आणि अशा क्रिया पासून जे एकंदर उत्पन्न निघणार आहे. किंवा उत्पादन होणार आहे. या सर्वांचा समावेश या तृतीय क्षेत्रातील उत्पादनात होतो. उदाहरणार्थ व्यावसायिक सेवा, ग्राहक सेवा, वितरण सेवा, बँकिंग सेवा, यासारख्या सेवांचा समावेश होतो.
- चतुर्थ क्षेत्र: चतुर्थ क्षेत्रात माहिती आधारित सेवांचा समावेश होतो. तसेच नवीन संकल्पना उच्च ज्ञानाशी संबंधित गोष्टी यांचा समावेश चतुर्थ क्षेत्रात होतो. उदाहरणार्थ संशोधन व विकास, संख्याशास्त्र ,माहिती तंत्रज्ञान इत्यादी.
- पंचम क्षेत्र: पंचम क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमता व व सेवा यांच्याशी संदर्भात असणारे व्यवसाय येतात. या व्यवसायातून होणारे उत्पन्न हे पंचमी क्षेत्रातील उत्पन्न म्हणून गणले जाते.
अशा क्षेत्रीय स्वरूपात GDP व्यक्त केला जातो त्याला जी क्षेत्रीय GDP असे म्हणतात. भारत सरकारने व CSO च्या क्षेत्रीय वर्गीकरणा प्रमाणे…
कृषि वने व मासेमारी – प्राथमिक क्षेत्र
खाणकाम, उत्खनन, उत्पादन, वीज, वायू, पाणीपुरवठा आणि बांधकाम – द्वितीयक क्षेत्र
व्यापार, हॉटेल, वाहतूक, रियल इस्टेट, व्यावसायिक सेवा, लोकप्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा – तृतीयक क्षेत्र
भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप –
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केलेला होता. तो प्रयत्न 1968 च्या दरम्यान करण्यात आला.
दादाभाई नौरोजी यांच्या मोजमापा नुसार दरडोई उत्पन्न 20 रुपये इतके आले होते तर एकूण उत्पन्न 340 कोटी रुपये दर्शवले होते.
1925 ते 29 या काळात राष्ट्रीय उत्पन्न 2301 कोटी तर दरडोई उत्पन्न 78 रुपये सांगितले. हा प्रयत्न डॉ. V.K.R.V. राव यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मांडले. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हटले जाते.
पुढे 4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली. याचे अध्यक्ष पीसी महालानोबिस हे होते. या समितीने आपला अहवाल 1951मध्ये तर अंतिम अहवाल 1954 मध्ये मांडला होता.
केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापे साठी सरकारकडून एक संस्था केंद्रीय सांख्यिकीय संघटना स्थापन करण्यात आली. CSO चे मुख्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते. सध्या 2011- 12 हे आधारभूत वर्ष मानण्यात आले आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय – (NSSO)
1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. 1970 मध्ये यांची पुनर्रचना करून राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना असे रूपांतर करण्यात आले. अलीकडे परत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय करण्यात आले.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून विविध प्रकारची सर्वेक्षणे केली जातात त्यात घरगुती सर्वेक्षण उपक्रम सर्वेक्षण ग्राम सुविधा सर्वेक्षण व भुमी व पशुधन सर्वेक्षण केले जाते.
NSSO चे कार्य चार विभागामार्फत चालते.
- 1) सर्व्हे डिझाईन व रीसर्च विभाग कोलकत्ता
- 2) फिल्ड आँपरेशन्स विभाग, नवी दिल्ली व फरीदाबाद
- 3) डाटा प्रोसेसिंग विभाग, कोलकाता
- 4) समन्वय व प्रकाशन विभाग, नवी दिल्ली
NSSO मार्फत सर्वेक्षण या नावाने एक द्वैमासिक जनरल प्रकाशन केले जाते.
राष्ट्रीय सांख्यिकी आयोग डॉ. सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 2000 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला. देशातील सांख्यिकीय विभागाचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम हा आयोग करत होता.
या आयोगाने सांखिकी घडामोडी विषयी सुसूत्रीकरण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानुसार 12 जुलै 2006 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ची स्थापना करण्यात आली. याचे अध्यक्ष संख्याशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणून कार्य करतात.
हे देखील वाचा
Maharashtra Police Bharti 2021
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था Urban Local Self Government Institutions|74 th amendment
1 thought on “राष्ट्रीय उत्पन्न, GDP म्हणजे काय ? स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? | What is GDP in Marathi”