सातारा पोलीस भरती पेपर | Satara Police Bharti Questions Paper in Marathi

सातारा पोलीस भरती पेपर | Satara Police Bharti Questions Paper in Marathi

सातारा पोलीस भरती चा फॉर्म भरला असाल तर आजच्या या लेखात दिलेला Satara Police Bharti Questions Paper in Marathi या लेखात दिलेले प्रश्न लेखी परीक्षेपूर्वी वाचून नक्की जा, म्हणजे तुम्हाला सातारा पोलीस भरती पेपर च स्वरूप समजून जाईल.

Satara Police Bharti Questions Paper in Marathi

Satara Police Bharti Questions Paper in Marathi
Satara Police Bharti Questions Paper in Marathi

1) कोणत्या शहरात 90 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले?
A. मुंबई
B. पुणे
C. डोंबिवली
D. औरंगाबाद

2) पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे?
A. जॉन चेसन
B. लॉर्ड लॉडविक
C. सर फर्गुसन
D. सर सिडने

3) महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्रसपाटीपासून सर्वांत उंचावर कोणता पॉईंट आहे?
A. एल्फिस्टन
B. सिडने
C. बॉम्बे
D. आर्थरसीट

4) जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
A. रुक्मिणी स्वयंवर
B. यथार्थ दीपिका 
C. सीतास्वयंवर
D. अपरोक्षानुभूती

5) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
A. छ. शिवाजी महाराज
B. छ. संभाजी महाराज
C. छ. राजाराम राजे
D. छ. शाहू राजे

(6) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
A. कराड
B. फलटण
C. वाई
D. माण

7) मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
A. बिपीन बिहारी
B. दत्ता पडसलगीकर
C. देवेन भारती
D. परवीर सिंग

8) महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकॅडमी कोठे आहे?
A. नाशिक
B. पुणे
C. नागपुर
D. मुंबई

9) कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे?
A. उपविभागीय अधिकारी
B. पोलीस निरीक्षक
C. सहाय्यक पोलीस निरीक्षक
D. पोलीस उपनिरीक्षक

10) कोणता दिवस ‘पोलीस शहीद दिवस’ म्हणून ओळखला जातो?
A. 22 जून
B. 21 ऑक्टोबर
C. 23 में
D. 24 ऑगस्ट

11) हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राज दरबारात ( 1877 ) कोण उपस्थित होते ?

A. गणेश वासुदेव जोशी
A. महात्मा गांधी
A. लोकमान्य टिळक
A. शिवरामपंत परांजपे

12) कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28 हजार ग्रामपंचायती डिजीटल करत आहे?
A. महागाव
B. महानेट
C. महाजाल
D. गावनेट

13) NDDB हे मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे?
A. अमुल डेअरी
B. गोकुळ डेअरी
C. वारणा डेअरी
D. मदर डेअरी

14) नवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट मध्ये करार झाला?

A. लवासा सिटी
B. सहारा सिटी
C. नैना सिटी
D. अॅम्बी व्हॅली

15) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

A. मनोधैर्य
B. बेटी बचाव
C. सबलानारी
D. किशोरी शक्ती

16) पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे?
A. महें
B. भिलार
C. माहुली
D. गोंदवले

(17) कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे सुरू होणार आहे?
A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नाशिक

18) 2017 हे वर्ष कशासाठी शासनाने साजरे केले?
A. क्रीडा वर्ष
B. महिला कल्याण वर्ष
C. व्हिजीट महाराष्ट्र
D. कृषी उन्नती वर्ष

19) महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही?
A. सोलापूर
B. कोल्हापूर
C. ठाणे
D. पिंपरी-चिंचवड

20) काउन्टर इन्सर्जन्सी अॅण्ड अॅन्टी टेरिरिस्ट स्कूल कोठे स्थापन झाले आहे?
A. पुणे
B. नाशिक
C. मुंबई
D. नागपूर

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

21) 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंती निमित्त साजरा होतो?
A. मौलाना आझाद
B. लोकमान्य टिळक
C. सरदार पटेल 
D. महात्मा गांधी

22) आजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये हे मानकरी नाहीत?

A. श्री. मनोहर जोशी
C. डॉ. विजय भटकर
B. डॉ. राणी बंग
D. डॉ. श्री. अनिल काकोडकर

23) ऑलम्पिकमधील कोणत्या क्रीडा प्रकारात ललिता बाबर ने भाग घेतला होता?
A. 3000 मी. स्टीपलचेस
B. 42 कि.मी. मॅराथॉन
C. 10,000 मी. धावणे
D. 21 कि.मी. धावणे

24) 1983 च्या जगजेत्या क्रिकेट सघांमध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता?
A. दिलीप वेंगसरकर
B. संदीप पाटील
C. किरण मोरे
D. रवी शास्त्री

25) कोणत्या राज्यात 100 टक्के विद्युतीकरण (ग्रामीण भाग) झालेला नाही?
A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. पंजाब
D. हरियाणा

26) ग.वा जोशी यांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ?

A. स्त्री धर्मनीती
A. स्त्री विचारवती
A. सार्वजनिक सभा
A. परमहंस सभा

27) प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे?
A. राबरी
B. भोरप्या
C. कमळगड
D. चंदन वंदन

28) नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे?
A. मत्स्यगंधा
B. रायगडाला जेव्हा जाग येते
C. अखेरचा सवाल
D. गगनभेदी

(29) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे?

A. दिवाण
B. फडणीस
C. चिटणीस
D. मुजुमदार

30) कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल?
A. लॉर्ड ऑकलैंड
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड माउंटबॅटन
D. लॉर्ड एडविक

31) कोणाच्या 125 व्या स्मृतीवर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. डॉ. आंनदीबाई जोशी
C. महात्मा ज्योतीबा फुले
D. लोकमान्य टिळक

32) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हे असे दोन भाग पाडण्यात आले?
A. 1960
B. 1848
C. 1949 
D. 1947

33) कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही?
A. जखिणवाडी
B. पांडवगड
C. राजपुरी
D. कुरोली

34) कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही?
A. मकरंदगड
B. भैरवगड
C. प्रतापगड
D. वर्धनगड

35) पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
A. 1334 मी.
B. 1273 मी.
C. 1194 मी.
D. 1301 मी.

36) कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली?
A. 1708
B. 1712
C. 1714
D. 1720

37) कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही?
A. गृहरक्षक दल
B. परिवहन
C. कामगार सुरक्षा
D. तुरुंग

38) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिह्यातील मूळ गाव कोणते?
A. साप
B. कन्हेरखेडे
C. किल्हई
D. मसुर

39) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
A. रास्ते
B. मोहिते
C. घोरपडे
D. पंतप्रतिनिधी

40) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले?
A. लंडन
B. हेलसिंकी
C. न्यूयॉर्क
D. मॉस्को

सातारा जिल्हा पोलीस भरती पेपर

सातारा जिल्हा पोलीस भरती पेपर
सातारा जिल्हा पोलीस भरती पेपर

41) कोणत्या शाहिराने ‘गर्जा महाराष्ट्र’ हे गीत लिहिले आहे?
A. पट्ठे बापुराव
B. कृष्णराव साबळे
C. हैबतीराव
D. रामचंद्र गुरव

42) कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही?
A. एकच प्याला
B. लग्राची बेडी
C. भ्रमाचा भोपळा
D. इथे ओशाळला मृत्यू

43) संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते?
A. ऋग्वेद
B. युजवेंद
C. सामवेद
D. अथर्ववेद

44) (धरण कामपूर्ण वर्ष) अयोग्य जोडी ओळखा.
A. कोयना – 1960
B. धोम – 1971
C. कन्हेर – 1988
D. वीर – 1965

45) (नदी-बंधारा) अयोग्य जोडी ओळखा?
A. वसना-कृष्णा रेवडी
B. माण-गोंदवले
C. बेरळा-मायणी
D. उरमोडी-चिखली

46) (केंद्र शहर) अयोग्य जोडी ओळखा

A. ऊस संशोधन केंद्र – फलटण
B. गहू संशोधन केंद्र – महाबळेश्वर
C. कृषी विद्यालय – बोरगाव
D. कृषी संशोधन केंद्र- कराड

47) सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?

A. 1918
B. 1915
C. 1913
D. 1920

48) खालीलपैकी सातारा जिल्हाात कोणते पोलीस आऊटपोस्ट नाही?
A. माहुली
B. खटाव
C. शिखर शिंगणापूर
D. रेठरे

49) सातारा जिल्ह्याचे होमगार्ड समादेशक कोण आहेत?
A. खंडेराव धरणे
B. रमेश चोपडे
C. अजित टिके
D. विजय पवार

50) (उपविभाग-उपविभागीय अधिकारी) अयोग्य जोडी ओळखा?
A. सातारा ग्रा – प्रेरणा कट्टे
B. पाटण – निता पाडवी
C. गृह मुख्यालय राजलक्ष्मी शिवणकर
D. वाई नंदा – पारजे

51) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
A. सातारा
B. कोल्हापूर
C. पुणे
D. सांगली

52) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
A. विजय कुमार
B. सतीश माथूर
C. अजित सिन्हा
D. अजित डोवल

53) MCOCA (मोक्का) हा कायदा कशा विरुद्ध वापरला जातो?
A. मालमत्तेचे गुन्हे
B. शरीराविरुद्धचे गुन्हे
C. संघटीत गुन्हेगारी
D. दाखलपात्र गुन्हे

54) मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार नाही?
A. गृहनिर्माण
B. गृह
C. नगरविकास
D. विधी व न्याय

55) केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या देशातील पहिल्या 10 हगणदारीमुक्त शहरांचे यादीत कोणते शहर नाही?
A. कागल
B. पाचगणी
C. मुरगुड
D. फलटण

56) बालहक्क सरंक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल अॅपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते?
A. चिराग
B. निर्भया
C. दामिनी
D. बाल

57) (गाव संत) आयोग्य जोडी ओळखा?
A. वडगाव – जयराम स्वामी
B. मायणी – यशवंतबाबा
C. धावडशी – ब्रह्मेद्र स्वामी
D. वाई – गोपालनाथ

58) ‘ हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण’ समुहदर्शक शब्द ओळखा.

A. तितिक्षा
B. तगाई
C. विठा
D. दैववादी

59) विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा?
A. अनुज X अग्रज
B. नितांत X अंत
C. इष्ट X अनिष्ट
D. लघु × गुरू

60) विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?
A. ग्राह्य x त्याज्य
B. साम्य X भेद
C. कर्णमधुर x कर्णकटु
D. कृश × कृपण

Satara District Police Bharti Exam Question Paper

Satara District Police Bharti Exam Question Paper
Satara District Police Bharti Exam Question Paper

61) भुंगा समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा?
A. भ्रात
B. मिलिद
C. भ्रमर
D. मधुण

62) सिंह समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा?
A. केसरी
B. समर
C. पंचानन
D. मृगेंद्र

63) ब्रह्मांड आठवणे – अर्थ ओळखा.
A. पराभव करणे
B. मरणे
C. भिती वाटणे
D. नाश होणे

64) क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
A. ओनामा
B. एरंडाचे गुन्हाळ
C. उंटावरचा शहाणा
D. उंबराचे फूल

65) अशुद्ध शब्द ओळखा?
A. परीक्षा
B. प्रावीण्य
C. नावीन्य
D. उज्वल

66) ‘सम्’ हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा.
A. संतोष
B. संगम
C. संस्कृत
D. सुगध

67) कोणता वाङ्मय रसाचा प्रकार नाही?
A. शृंगार
B. रौद्र
C. बीभत्स
D. तिखट

68) कोणता काव्यरसाचा गुण नाही?
A. प्रसाद
B. माधुर्य
C. ओज
D. हास्य

69)कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही?

A. भाकरी
B. अण्णा
C. दलाल
D. ताई

70) कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही?
A. पेशवा
B. बटाटा
C. हापूस
D. कोबी

71) कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही?
A. क्रियाविशेषण अव्यय
B. नाम
C. सर्वनाम
D. विशेषण

72) विजोड पद ओळखा?
A. गाय
B. घोडा
C. मौस
D. बैल

73) कोणते सामान्यनाम नाही?
A. कळप
B. वर्ग
C. कापड
D. हिमालय

74) कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही?
A. वर्णनात्मक
B. कल्पनात्मक
C. रसात्मक
D. चरित्रात्मक

75) एखाद्या उताऱ्याच्या लांबीच्या किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत सलगरितीने सारांश लेखनामध्ये लिहावा लागतो?
A. एकतृतीयांश
B. अर्था
C. पूर्ण
D. तीन चतुर्थांश

76) कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही?
A. पेक्षा
B. तर
C. परीस
D. विना

77) वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा?
A. तप्तर
B. चमत्कार
C. शब्द
D. शुद्ध

78) कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही?
A. शाबास
B. अहाहा
C. फक्कड
D. वाहवा

79) जाणून घेण्याची इच्छा असणारा समुहदर्शक शब्द ओळखा?
A. जिवलग
B. मनकवडा
C. जिज्ञासू
D. हृदयस्पर्शी

80) 312, 243, 645, 978, 534 विजोड संख्या ओळखा?
A. 312
B. 243
C. 534
D. 978

Satara police constable question paper gk answer key
Satara police constable question paper gk answer key

81) धावणे : थकवा :: उपवसा: ?
A. फराळ
B. भुक
C. एकादशी
D. आरोग्य

82) वधुला जसा वर तसे कोणाला दिर?
A. जाऊ
B. भावजय
C. नणंद
D. बहिणी

83) 4 ला 27 तसे कोणाला 125 = ?
A. 36
B, 64
C. 25
D. 16

84) AZY : CXW: EVU : ?
A. FUT
B. HSR
C. GTS
D. GTR

85) 2, 5, 14, 7, 122, 365

A. 43
B. 41
C. 69
D. 58

86) संज्ञाचा क्रम लावल्यास मध्यभागी कोणते पद येईल?
चिरा, रेती, खडक, शिलाखंड, खडा.

A. खड़ा
B. चिरा
C. रेती
D. खडक

87) लहान, सुक्ष्म, मोठा, प्रचंड, बिंदू,
A. लहान
B. सूक्ष्म
C. मोठा
D. प्रचंड

88) माला मीराला म्हणाली, “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते” तर मीरा मालाची कोण?
A. मावशी
B. आत्या
C. भावाची मुलगी
D. भावजय

प्र. क्र. 89 ते 91
सतलज, बियास, कृष्णा, कावेरी, सावित्री या युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून ते रंग हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडले आहेत. पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा.

A. सतलज रंग हिरवा किंवा निळा नाही.
B. बियासचा रंग पांढरा आहे.
C. सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे.
D. कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही.

89) सतलजचा रंग कोणता?
A. हिरवा
B. पांढरा
C. तांबडा
D. काळा

90) कावेरीचा रंग कोणता?
A. तांबडा
B. काळा
C. हिरवा
D. निळा

Satara police bharti sarav paper

91) कृष्णा हिचा रंग कोणता?
A. हिरवा
B. काळा
C. तांबडा
D. निळा

प्र. क्र. 92 ते 94
92) प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर, 1993 रोजी झाला तर ….. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?
A. बुधवार
B. गुरुवार
C. मंगळवार
D. सोमवार

93) 1993 च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी आली असेल?
A. रविवार
B. शुक्रवार
C. गुरुवार
D. सोमवार

94) प्रियंकाचा 7 वा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
A. रविवार
B. सोमवार
C. मंगळवार
D. शनिवार

95) एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत, प्रत्येक स्पर्थक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
A. 110
B. 121
C. 61
D. 55

96) A M C K E I G ? ?
A. HI
B. IG
C. GJ
D. GI

97) ABC EDC FGH JIH KLM ?
A. ONM
B. NLM
C. NOP
D. OMN

98) AZ DW GT JQ?
A. LD
B. NM
C. MO
D. MN

99) एका सांकेतिक भाषेत PLATO या शब्दाला संकेत 35204 हा आहे तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?
A. OPT
B. TOP
C. POT
D. PTO

100) TEACHING या शब्दातील अक्षरांची जुळवा जुळव करून CHEATING हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार GRADIENT शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द होईल?
A. DIRAGENT
B. DIARGENT
C. DIGRAENT
D. DIGARENT

तर मित्रांनो मला अशा आहे Satara Police Bharti Questions Paper in Marathi या लेखातील प्रश्न समजले असतील, काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.

हे देखील वाचा

Important Pune Police Bharti Question Paper in Marathi

Mumbai Police Previous Year Question Paper

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment