भारताचा परकीय व्यापार | Foreign Trade in Marathi 2024

परकीय व्यापार म्हणजे काय? | Foreign trade in marathi 2024

Foreign Trade in Marathi: परकीय व्यापार म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर  राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.

foreign trade in marathi

व्यापाराचे दोन प्रकार आहेत.

१) अंतर्गत व्यापार –  अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडतात. घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापार

२) आंतरराष्ट्रीय व्यापार – आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पुढील चार प्रकार दिसून येतात.

  • विदेशी व्यापार
  • निर्यात व्यापार
  • आयात व्यापार
  • पुनर निर्यात व्यापार

परकीय व्यापाराचे महत्व | Importance Of Foreign Trade in Marathi

1) आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी

 प्रत्येक देशाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन त्याच देशात होईल असे नाही. यासाठी नैसर्गिक साधन सामुग्रीची कमतरता भासते. उपलब्ध नैसर्गिक साधनात सर्व गरजा भागवणे शक्य नसते. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून विशिष्ट वस्तूंचे उत्पादन वाढवणे व व त्या वस्तूंच्या मोबदल्यात इतर वस्तू आयात करणे यालाच आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी असे म्हणतात.

2) विकसनशील आयात

ज्या आयातीमुळे उत्पादन क्षमता निर्माण होते त्या आयातीला विकसनशील आयात म्हणतात.

3) निर्वाह आयात

देशात कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा असल्यास नवीन निर्माण झालेल्या किंवा उपलब्ध असलेल्या उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने कच्च्या तसेच मध्यम टप्प्यातील वस्तूंची जी आयात केली जाते तिला निर्वाह आयात म्हणतात.

4) परकीय व्यापारामुळे वस्तूंच्या किमतीविषयी अपप्रवृत्ती टाळता येते.

5) जगातील विविध देशांमधील उत्पादन विशेषीकरण याचा लाभ सर्व देशांना मिळतो. नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम उपभोग शक्य होतो.

6) परकीय व्यापारामुळे विविध देशातील परस्पर संबंध सुधारून विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होते.

परकीय व्यापाराचे घटक | foreign trade in marathi

परकीय व्यापारात भाग घेणारे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे

  • आयात गृहे: परदेशातून वस्तूंची आयात करणाऱ्या संस्थांना आयात गृहे म्हणतात.  आयात गृहे आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये मध्यस्थीचे काम करतात. 
  • निर्यात गृहे: देशातील विविध उत्पादकांकडून माल खरेदी करून त्याची निर्यात करण्याचे कार्य निर्यात गृहे करतात.

आयात-निर्यात व्यापारी संस्था कंपन्या foreign trade in marathi

अनेक व्यापारी संस्था कंपन्या स्थापन करून आयात-निर्यात व्यवसाय करतात.

आयात-निर्यात संघटना

एकाच प्रकारच्या मालाचे उत्पादन व्यापार करणाऱ्या संस्था आपल्या संघटना स्थापन करतात. एकाच प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होत असल्यामुळे अनेक गोष्टींबाबत अशा संघटनांना लाभ मिळतो.

हे देखील वाचा: What is GDP?

व्यापारतोल (Balance of trade)

व्यापार तोल म्हणजे देशाच्या दृश्य व्यापारातील आयात व निर्यात तिची पद्धतशीर नोंदणी.निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल अनुकूल असतो याउलट आयात मूल्य हे निर्यात मूल्य पेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल प्रतिकूल असतो.

व्यवहार तोल (Balance of payment)

व्यवहार तोला मध्ये चालू खाते व भांडवली खाते यांचा एकत्रित विचार असतो. चालू खात्यात दृश्य व्यापार व अदृश्य व्यापार यांचा समावेश असतो. भांडवली खात्यात खाजगी तसेच सरकारी कर्जांची देवाणघेवाण आणि गुंतवणुकी असतात. foreign trade in marathi.

भारताचा परकीय व्यापार foreign trade in marathi

  • आकारमान
  • संरचना 
  • दिशा

भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान foreign trade in marathi.
एका वर्षात झालेल्या व पैशाच्या स्वरूपात मोजलेल्या परकीय व्यापाराला त्याचे आकारमान म्हणतात. स्वातंत्र्य पूर्वी भारताची निर्यात नेहमी अधिक असायची म्हणजे भारताचा व्यापारतोल अनुकूल असायचा.स्वातंत्र्यानंतर लगेच भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली. भारताचा व्यापार तोल प्रतिकूल बनला.
स्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापार तूटही सतत वाढतच गेला.

Upsc Book List In Marathi 2022 Free Download

भारताच्या परकीय व्यापाराची संरचना foreign trade in marathi

परकीय व्यापाराची संरचना म्हणजे भारत कोणकोणत्या वस्तूंची आयात निर्यात करतो त्या वस्तूंच्या आयातीचे व निर्यातीचे प्रमाण एकूण आयाती पैकी व निर्याती पैकी किती आहे याचा अभ्यास होय.

आयातीची संरचना foreign trade in marathi
भारताने 2018 19 मध्ये आयात केलेल्या वस्तूंचे गट पुढील प्रमाणे
१)इंधन (एकूण आयात पैकी 32.5%)
२)भांडवली वस्तू (13.8 %)
३)अन्न व संबंधित वस्तू (3.2%)

वैयक्तिक वस्तू 

2018 19 मध्ये भारताने आयात केलेल्या वस्तू
१)पेट्रोलियम (27.4% )
२)इलेक्ट्रॉनिक वस्तू (11.2%)
३)सोने व चांदी (7.1%)
४)रसायने (6.8%)
1951 पासून भांडवली वस्तूंची आयात वाढत गेली आणि उपभोग्य वस्तूंची आयात कमी होत गेली. आयात वाढणार्‍या वस्तू रसायने, खनिजतेल, धातु, खते इत्यादी.

निर्यातीची संरचना

भारतातील वस्तू निर्यात पुढीलप्रमाणे
सन 2018 19 मध्ये निर्यात केलेल्या पहिले तीन वस्तू प्रकार
१) उत्पादित वस्तू (70%)
२) अशुद्ध पेट्रोलियम (14.5%)
३) कृषी व संलग्न वस्तू (11.8%)
वस्तूंचा निर्यातीचा विचार वैयक्तिक वस्तूमानानुसार केल्यास 2018 19 मध्ये भारताने निर्यात केलेल्या वस्तू पुढील प्रमाणे.
१) खडे व दागिने(12%)
२) यंत्रसामुग्री व साधने (8%)
३) वाहतूक साहित्य(7%)
४) धातू वस्तू(5%)

एकूण वस्तूंच्या निर्यातीत पैकी अभियांत्रिकी वस्तूंचा विचार करता सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची झाली आहे. 2003-04 पासून भारताने सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूंची केली आहे.
भारताच्या निर्याती मधील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होऊन उत्पादित घटकांचा वाटा वाढत गेलेला आहे.
भारत पेट्रोलियम पदार्थाची जरी आयात करत असला तरी पेट्रोलियमच्या निर्यातीचे प्रमाणही वाढत आहे. यामध्ये भारतातील पेट्रोलियम शुद्धीकरणाच्या क्षमतेचा विकास दिसून येतो. शुद्ध पेट्रोलियम पदार्थ भारत मोठ्या प्रमाणात निर्यात करतो.

भारतातील काही वस्तूंचा जागतिक निर्यातीतील हिस्सा

  • तांदूळ  29%
  • मसाले  17%
  • मोती मौल्यवान खडे  17
  • चहा  9%
  • तंबाखू  6%

भारताच्या परकीय व्यापाराची दिशा
भारताच्या परकीय व्यापारातील आयातीची दिशा म्हणजे भारत कोणकोणत्या देशांकडून वस्तूंची आयात करतो त्याचे एकूण आयातीची प्रमाण आणि निर्यातीची दिशा म्हणजे भारतात कोणकोणत्या देशांना निर्यात करतो त्या निर्यातीचे एकूण निर्यातीची असलेले प्रमाण होय.

भारत सध्या जवळपास दोनशे देशांकडून आयात-निर्यात करतो.

आयात व्यापाराची दिशा

सन 2018 19 मध्ये भारताच्या आयातीच्या दिशे बाबत महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे
सदर वर्षात भारताने 514 अब्ज डॉलर इतक्या मूल्यांची आयात केली. यातील अशिया मधून 62 टक्के आयात तर युरोप मधून 15 टक्के अमेरिका मधून 12 टक्के आयात केलेली आहे. वैयक्तिक देशांचा विचार केल्यास 2018 19 मध्ये भारताने सर्वाधिक आयात चीन कडून केली. यानंतर यु एस ए , यु ए व सौदी अरेबिया अशा देशांचा क्रमांक लागतो.

निर्यात व्यापाराची दिशा

सन 2018 19 आली भारताने 329 अब्ज डॉलर इतक्या मूल्यांची निर्यात केली. यामध्ये आशिया खंडात सर्वाधिक निर्यात झाली यानंतर अमेरिका युरोप व आफ्रिका खंडामध्ये निर्यात झाली. वैयक्तिक देशानुसार निर्यात अमेरिकेला सर्वाधिक यानंतर यूएई हॉंगकॉंग व इंग्लंड असा देशांचा क्रमांक लागतो.

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? Best For You.

Govt. Website for Foreign Trade

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

6 thoughts on “भारताचा परकीय व्यापार | Foreign Trade in Marathi 2024”

  1. Thank You sir, आयात निर्यातची माहिती व्यवस्थित पणे मांडली त्यामुळे चांगल्या प्रकारे समजले.

    Reply
  2. Thank You ????आयात निर्यातची माहिती व्यवस्थित पणे मांडली त्यामुळे चांगल्या प्रकारे समजले.

    Reply

    Reply

Leave a Comment