रॅमन मॅगसेसे पुरस्कार | Ramon Magsaysay Award in Marathi 2024
जगामध्ये विविध कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार विविध पुरस्काराने होत असतो.
नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोत्तम पुरस्कार असल्याचे मानले जाते. ज्या पद्धतीने नोबेल पुरस्कार जागतिक पातळीवर सर्वोत्तम आहे. त्याच पद्धतीने आशिया खंडामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मानाचा मानला जातो.
रॅमन मॅगसेसे पुरस्काराला आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार फिलिपाईनची राजधानी असलेल्या मनीला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन यांच्यामार्फत दरवर्षी दिला जातो. पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर ब्रदर्स फंड च्या ट्रस्टी द्वारा करण्यात आली.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कधी सुरू झाला?
फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्या नावाने हा पुरस्कार 1957 पासून सुरू करण्यात आला आहे.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो?
सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, सामुदायिक नेतृत्व, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते.
रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे स्वरूप कसे आहे?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्तीला प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम या स्वरूपात हा पुरस्कार मिळतो.
पहिले रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते कोण?
आशियाचा प्रति नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सर्वात प्रथम श्री विनोबा भावे यांना इसवी सन 1958 मध्ये देण्यात आला.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व पुढीलप्रमाणे… Ramon Magsaysay Award Winners
- किरण बेदी
- मदर तेरेसा
- प्रकाश आमटे
- सोनम वांगचुक
- अरविंद केजरीवाल
- आर. के. लक्ष्मण
- चिंतामणराव देशमुख
- टी. एन.सेशन
- जयप्रकाश नारायण
- बाबा आमटे
- विनोबा भावे
- एम. एस. स्वामीनाथन
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2022 | Ramon Magsaysay Award 2022
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2022 एकूण चौघांना देण्यात आला. 30 नोव्हेंबर 2022 रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
१) कंबोडियाचे मानसोपचार तज्ञ सोथियारा छिम
२) जपानी नेत्रतज्ञ तदाशी हथोरी
३) फिलिपाईन्सच्या बालरोग तज्ञ बर्नाडेट माद्रिद
४) इंडोनेशियामध्ये प्लास्टिक प्रदूषण विरोधात काम करणारे फ्रान्सचे गॅरी बेनेचेघिब
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे हे आहेत.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कधी सुरू करण्यात आला?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कुठे दिला जातो?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार फिलिपाईन्सची राजधानी मनीला इथे दिला जातो.
आमचे आणखी वाचनीय लेख…
मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते । dnyanpeeth puraskar Marathi list 2022
UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे
रवीश कुमार ला पण हा अवार्ड मिळाला आहे.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/