सहकार चळवळ | Cooperation movement in Marathi
Sahakar chalval in Marathi: महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगती सहकार्याने झालेली दिसते. योग्य सहकार्यासाठी व्यक्ती व्यक्ती मध्ये सहकार असणे गरजेचे आहे. विना सहकार नाही उद्धार असे म्हणत सहकाराची चळवळ सुरू झाली. महाराष्ट्राचा देशाचा जास्तीत जास्त विकास सहकार चळवळीतून झालेला दिसून येतो. अशा या सहकार बद्दल जाणून घेऊया.
‘समान आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समान आर्थिक सामाजिक सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती स्वच्छेने ज्या चळवळीत सामील होतात त्यास सहकार चळवळ असे म्हणतात.’ cooperation movement in Marathi
सहकारामध्ये समान उद्दिष्ट, समान गरजा, सामूहिक प्रयत्न, ऐच्छिक सहभाग हे वैशिष्ट्यपूर्ण घटक दिसून येतात. सहकार भांडवलशाही व समाजवाद यांना जोडणारा दुवा आहे. सहकारात एक व्यक्ती एक मत असते. सहकारामध्ये नफा महत्वाचा नसून दुर्बल घटकांचे कल्याण महत्त्वाचे असते.
- कृषी पतसंस्था – कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणे
- बिगर कृषी पतसंस्था – गैरकृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणे
- कृषी बिगर पतसंस्था – कृषी क्षेत्रातील गैर वित्तीय सहकारी संस्था उदाहरणार्थ साखर कारखाने
- बिगर कृषी बिगर पतसंस्था – गैर कृषी क्षेत्रात कार्य करणारी गैर वित्तीय संस्था
आंतरराष्ट्रीय सहकारी गट ICA(international cooperative alliance)
1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी गट सहकारी संस्थांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आला. या संस्थेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. दिल्ली, मोशी, अबिदजान,सँन जोस येथे चार प्रादेशिक कार्यालय आहेत. आंतरराष्ट्रीय सहकारी गट ही एक गैरसरकारी संघटना आहे. कार्ये -विविध आंतरराष्ट्रीय संस्थांना सहकाराचे महत्व पटवून देणे.ही संस्था सहकार चळवळीचे नेतृत्व करते. सहकारी संस्थांना तांत्रिक मदत करणे.सहकार संबंधी धोरणात्मक सल्ला देणे.
सहकाराची जुनी तत्वे
1844 रॅशडेल सोसायटीने सात सहकारी तत्वे मांडली. यांना सहकाराची जुनी तत्वे असेही म्हणतात.
- १) खुले सभासदत्व
- २) लोकशाही नियंत्रण
- ३) भांडवलावर मर्यादित व्याज
- ४) राजकीय व धार्मिक तटस्थता
- ५) रोख व्यवहार
- ६) शिक्षण प्रसार
- ७) व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश
1964 मध्ये डी जी कर्वे समितीने सहकाराची तत्वे सुचवली होती. 1966 मध्ये या तत्त्वांचा स्वीकार केला गेला.
सहकाराची नवीन तत्वे सेवेन बुक यांनी 1995 मध्ये मांडली.
- १) खुले व ऐच्छिक सभासदत्व
- २) लोकशाही नियंत्रण
- ३) सदस्यांचा आर्थिक सहभाग
- ४) सहकार शिक्षण
- ५) स्वातंत्र्य व स्वायत्तता
- ६) सहकारामध्ये सहकार
- ७) समाजिक कल्याणाची भावना
भारतातील सहकार चळवळ | India corporation movement in Marathi information
फ्रेडरिक निकोलसन याने 1892 मध्ये ग्रामीण व शहरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. एडवर्ड लॉक यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या दुष्काळ विषयक आयोगाने(1901) कृषी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
1904 मध्ये सहकारी पतपुरवठा पतसंस्था कायदा अस्तित्वात आला. 1912 मध्ये सहकारी संस्था कायदा तयार करण्यात आला. सहकारी संस्थांचा विकास व समन्वय यांचा अभ्यास करण्यासाठी आर. जी. सरैया समितीची (1945) स्थापना करण्यात आली.या समितीला सहकार नियोजन समिती असेही म्हणतात. 1951 मध्ये ए. डी. गोरवला समितीची स्थापना करण्यात आली.
1979 मध्ये बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतपुरवठा पुनरावलोकन समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीने सहकारी बँकांची शिखर संस्था नाबार्डची स्थापना करण्याची शिफारस केली. केंद्र शासनाने 2002 मध्ये राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. यामध्ये सहकार वृद्धिंगत करण्यावर भर दिला गेला. 97 घटना दुरुस्ती कायदा 2011 नुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क भारतीय जनतेला देण्यात आला.
सहकार आणि महाराष्ट्र 1919 च्या सुधारणा कायद्यान्वये प्रांतांना स्वतंत्र कायदे करण्याची सुविधा देण्यात आली. यानुसार मुंबई प्रांतासाठी 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आला.महाराष्ट्रात सहकारी चळवळीची सुरुवात 1910 मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापने झाली.
महाराष्ट्रात 1950 मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा करण्यात आला. याला अनुसरून 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियम लागू करण्यात आले.
97 व्या घटना दुरुस्ती ला अनुसरून महाराष्ट्र सहकारी कायद्यात बदल करून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था दुरुस्ती कायदा 2013 करण्यात आला.महाराष्ट्र शासनाने 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून साजरे केले. यावेळी सहकारातून समृद्धीकडे हा नारा देण्यात आला.
सध्या सहकारातून आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत. देशातील सहकारी चळवळ पैकी सर्वाधिक यशस्वी सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये दिसून आली. महाराष्ट्र देशातील एक अग्रेसर राज्य बनण्यामध्ये सहकार आणि सहकारी चळवळींचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र मध्ये विविध उद्योगांना अनुसरून विविध सहकारी संघटना सध्या अस्तित्वात आहेत. उदा. सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ इत्यादी. या सहकारातून समृद्धीकडे जाणारा मार्ग निर्माण करणाऱ्या मार्गिका ठरल्या आहेत. cooperation movement in Marathi
सहकार चळवळ कृषिप्रधान भारतीय देशांमध्ये फक्त कृषी मध्येच नव्हे तर वित्त गृहनिर्माण खरेदी-विक्री अशा असंख्य संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये सध्या सहकार चळवळ कार्यरत असताना दिसून येते.
हीच सहकार आणि सहकार चळवळ यांनी मानवी कल्याणाच्या दृष्टीने गाठलेली यशस्विता आहे.
हे देखील वाचा
रिझर्व बँक ऑफ इंडिया – भारताची मध्यवर्ती बँक
भारतीय शेती चे महत्व आणि अर्थव्यवस्थेतील स्थान
1 thought on “सहकार चळवळ म्हणजे काय ? Sahakar chalval in Marathi”