STI Syllabus 2024 in Marathi | MPSC STI syllabus in Marathi

संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | STI exam syllabus

MPSC STI syllabus in Marathi: STI Syllabus 2024 संयुक्त पूर्व परीक्षा PSI (Police Sub Inspector), STI (State Tax Inspector) (STI Syllabus in Marathi 2020),ASO (Assistant Section Officer) या पदांसाठी असते. यातील STI पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. STI पदाची तयारी करणाऱ्या विध्यार्थांना परीक्षा पद्धतीबाबत माहिती देणारा लेख. STI syllabus

संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण ( STI Syllabus – PRE)

(PSI,STI,ASO)

विषय व संकेतांक  प्रश्न संख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी १०० १०० पदवी मराठी आणि इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
sti syllabus pre

अभ्यासक्रम STI syllabus

१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 

२) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), 

३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास 

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. 

५) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण.

६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र.

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

STI होण्यासाठी मुख्य परीक्षा पुढीलप्रमाणे घेतली जाते. STI syllabus Mains

प्रश्नपत्रिकांची संख्या  –  दोन 

एकूण गुण – ४००

पेपर १ संयुक्त पेपर – २०० गुण

पेपर २ स्वतंत्र पेपर – २०० गुण

Apply Now

पेपर क्रमांक विषय गुण प्रश्र्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी
मराठी १०० ५० मराठी – बारावी मराठी एक तास
इंग्रजी ६० ३० इंग्रजी – पदवी इंग्रजी
सामान्य ज्ञान ४० २० पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान २०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास
STI syllabus mains

STI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम – STI Syllabus

पेपर १

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी – Common vocabulary sentence structure grammar use of idioms and phrases and their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान

१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२) माहिती अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

३) संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग आणि वेक टेक्नॉलॉजी सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ होते व त्याचा दर्जा शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया एशिया विद्या वाहिनी ज्ञान वाहिनी सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य

पेपर २ स्वतंत्र पेपर – २०० गुण

१) बुद्धिमत्ता चाचणी

२) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल  – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न

३) महाराष्ट्राचा इतिहास –  सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

४)भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ भूमिका, अधिकार व कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या

५) नियोजन –  प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

६) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ- जसे ऊर्जा, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, गृह, परिवहन, (रस्ते बंदर) दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार) रेडिओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर चे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेण्ट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता

७) आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण संकल्पना व त्यांचा अर्थ आणि व्यक्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा,WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, जीएसटी, विक्रीकर, VAT,WTO, इत्यादींशी संबंधित कायदे आणि नियम

८)आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतःप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.

९) सार्वजनिक वित्त व्यवस्था – महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याचे सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्य पातळीवरील कर सुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणा ची केंद्राला समस्‍या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्‍य, रिजर्व बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावर राज्य स्तरावरील आढावा.

STI exam Latest News

UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा|maharashtra public service commission exam 2021

Polity questions for mpsc exam practice

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

4 thoughts on “STI Syllabus 2024 in Marathi | MPSC STI syllabus in Marathi”

Leave a Comment