Money and currency in Marathi: वरवर पाहता पैसा व चलन हे एकच वाटतात. मात्र यामध्ये फरक आहे. वस्तू व सेवा विकत घेत असताना विनिमयाचे साधन म्हणून आपण जे वापरतो त्याला पैसा असे म्हणतात. पैसा ही विस्तृत संकल्पना आहे.
पैसा ही मोजण्यास कठीण असणारी निर्जीव संकल्पना आहे.
वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणारी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. कागदी नोटा व नाणी यांच्या स्वरूपात एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने किंवा सरकारने निर्गमित व स्वीकृत केलेल्या पैशाला वैध चलन असे म्हणतात.
सर्व चलन हे पैसे असतात. परंतु सर्वच पैसे हे चलन नसतात.
पैशाची चार महत्त्वाची कार्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
- १) मूल्य संग्रहण – पैशाची मूल्य हे संग्रहित करून ठेवता येण्याजोगी असावे त्यामध्ये बदल होता कामा नये.
- २) हिशेबाचे एकक – पैसा हा हिशेबाचे एकक म्हणून वापरला गेला पाहिजे.
- ३) विनिमयाचे माध्यम – पैसा वस्तू विनिमयाचे माध्यम असावा. यातून वस्तूचे योग्य मूल्य काढणे सहज साध्य होते. अर्थव्यवस्थेत पैशाला सर्वमान्य स्वीकृती असते. शासनाने किंवा मध्यवर्ती बँकेने स्वीकृती दिल्यामुळे सर्वांचा पैशावर विश्वास बसतो.
- ४) आस्थगित देयमान – उधारी कर्ज यासारखी जे देणे असतात. ते पैशाच्या माध्यमातून खेळता येतात पैशाची किंमत बऱ्याच काळापर्यंत स्थिर असते.
भारतात 1957 पूर्वी एक पैसा एक आणा, चार आणा, बारा आणा, अशा प्रकारची नाणी अस्तित्वात होती.
नाणे दुरुस्ती कायदा 1955 नुसार दशमान चलन पद्धती अस्तित्वात आली. एक रुपया समान 100 पैशांमध्ये विभाजित करण्यात आला. त्यानुसार मार्च 1962 मध्ये पहिला नवा पैसा अस्तित्वात आला.
भारतात चलन पद्धतीचे व्यवस्थापन भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया द्वारे व्यवस्थापन केले जाते.
१) भारतीय नाणी
भारतात एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशा नाणी चलनात आहेत. 30 जून 2011 पासून 50 पैशापेक्षा कमी मूल्याची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याची रिझर्व बँकेने ठरवले आहे. त्यामुळे देशातील सर्वात कमी मूल्याचे विधिग्राह्य चलन 50 पैशाचे आहे.
भारतीय भारतीय नाण्यांचा साठी सध्या भारतीय नाणे कायदा 2011 अस्तित्वात आहे. या कायद्यामध्ये नाण्यांच्या सहाय्याने पेमेंट करण्याची किंवा स्वीकारण्याची जास्तीत जास्त मर्यादा एक हजार रुपयांची निर्धारित करण्यात आली आहे.
भारतीय नानी निकेल आणि त्याच्या संयोगापासून बनवली जातात.
भारत सरकारच्या टाकसाळी
मुंबई, अलीपुर (कोलकता), सैफाबाद व चेरालापल्ली (हैदराबाद), नोयडा येथे आहेत.
• विविध नाणी वितळवून त्यापासून धातू मिळवून तो इतर ठिकाणी वापरणे, नाणी खराब करणे, बाळगून ठेवणे यावर कायदेशीर मनाई आहे.
रुपयाचे नवे चिन्ह कोणी तयार केले?
रुपयाचे नवे चिन्ह 2010 मध्ये डी. उदयकुमार यांनी तयार केलेले आहे.
२) भारतीय नोटा
भारतीय चलनी नोटांसाठी रिझर्व बँक कायदा 1934 लागू आहे. 1938 पासून रिझर्व बँकेच्या नोटा चलनात आल्या. जानेवारी 1938 मध्ये रिझर्व बँकेची पहिली पाच रुपयांची नोट आली यानंतर इतर नोटा चलनात आल्या. एक रुपयाची नोट चलनी नोट म्हणून मान्य नसून एक रुपयाच्या नोटेला नाणीच समजले जाते.
सर्व नोटा आरबीआय मार्फत छापल्या जातात व चलनात आणल्या जातात. सर्व चलनी नोटा वचनचिठ्ठी (Promisory Note) च्या स्वरूपात असतात. आरबी आय दहा हजार रुपयांपर्यंतची नोट छापू शकते. 1954 मध्ये एक हजार पाच हजार वीस हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 1978 मध्ये त्या चलनातून काढून घेण्यात आल्या एक हजार रुपयाची नोट ऑक्टोबर 2009 मध्ये पुन्हा चलनात आणण्यात आली.
भारतातील चलनी नोटांचे छापखाने
- इंडियन सेक्युरिटी प्रेस, नाशिक
- करन्सी नोट प्रेस, नाशिक
- बँक नोटे प्रेस, देवस
- सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद
- सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद याठिकाणी भारतातील छापखाने आहेत.
•चलनाची दर्शनी किंमत आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या धातूंची किंमत जेव्हा समान असते तेव्हा त्या चलनाला प्रामाणिक चलन असे म्हणतात.
समाविष्ट असणाऱ्या धातूंची किंमत जास्त असल्यास त्याला प्रतिक चलन म्हणतात.
•देशाच्या मध्यवर्ती बँकेने स्वीकृत व पुरस्कृत केलेल्या चलनाला कायदेशीर चलन म्हणतात.
•मर्यादित कायदेशीर चलन ५० पैशाचे आहे.
• अमर्याद कायदेशीर चलन म्हणजे एक रुपया व त्यापेक्षा अधिक मूल्यांच्या सर्व नाणी व नोटांचा माध्यमातून कोणत्याही मोठ्या रकमेची देणी देता येतात किंवा व्यवहार करता येतात. म्हणून यांना अमर्यादित कायदेशीर चलन म्हणतात.
पैशाचा पुरवठा – पैशाचा पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या चलनाची किंवा पैशाची संख्या होय. चलनाचा पुरवठा म्हणजे देशातील लोकांच्या जवळ असलेल्या रकमा अदा करण्याचे एकूण साधनांचा साठा होईल.
चलनपुरवठ्याध्ये लोकांच्या हातातील पैसा व बँकेमधील पैसा यांचाही समावेश होतो तसेच इतर संस्थांच्या जवळ असणारा पैसाही चलन पुरवठ्याचा भाग समजला जातो.
वित्त आयोग (Finance Commission) निर्मिती,अधिकार,15 वा वित्त आयोग
भारतीय अर्थसंकल्प – व्याख्या, अर्थसंकल्पाचे प्रकार, सार्वजनिक वित्त
Maharashtra Police Bharti 2020 – Syllabus | Exam Pattern | Physical |