नागरिकत्व म्हणजे काय? | Indian Citizenship in Marathi Best | 5 Ways to get Indian Citizenship in Marathi
नागरिकत्व म्हणजे राज्यसंस्थेचे सदस्यत्व होय. लोकशाही शासन व्यवस्थेत नागरिकत्व हे महत्त्वाचे तत्व आहे. नागरिकत्वावरच लोकशाही अवलंबून असते. लोकशाहीमध्ये सत्ता नागरिकांच्या हातामध्ये केंद्रित झालेली असते म्हणून लोकशाहीचा आधार नागरिकत्व आहे. भारतीय नागरिकत्व(Indian Citizenship) या विषयी घटनात्मक माहिती पाहू.
नागरिकांना राज्यसंस्थेचे अधिकार प्राप्त होतात. भारताचे नागरिकत्व Indian Citizenship धारण करणाऱ्या नागरिकांना काही कर्तव्य व जबाबदाऱ्या ही असतात.
भारतीय नागरिकांना प्राप्त अधिकार Indian Citizenship Rights
भारतीय राज्यघटनेने भारताचे नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तिंनाच काही अधिकार दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे.
- कलम 15 भेदभाव करण्यास मनाई
- कलम 16 रोजगारात समान संधी
- कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क
- कलम 29 व 30 संस्कृतीक शैक्षणिक हक्क
लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच आहे संसदेचे तसेच राज्य विधीमंडळाचे सदस्यत्व फक्त भारतीय नागरिकांनाच मिळू शकते. भारतातील काही महत्त्वाची पदे धारण करण्याचा हक्क सुद्धा फक्त भारतीय नागरिकांनाच (भारताचे नागरिकत्व असणाऱ्या )आहे यामध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, महान्यायवादी, महाधिवक्ता इत्यादी.
भारतामध्ये जन्म तत्वा द्वारे आणि स्वीकृती तत्वा द्वारे असलेल्या नागरिकाला सुद्धा राष्ट्रपती होता येते.अमेरिकेमध्ये फक्त जन्मतत्वा द्वारे नागरिक असलेला व्यक्तीचा राष्ट्रपती होऊ शकतो.
भारतीय राज्यघटनेच्या भाग-2 मधील कलम 5 ते 11 दरम्यान नागरिकत्व बद्दल तरतुदी देण्यात आल्या आहेत.
यामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी कोणती व्यक्ती भारताचे नागरिक असतील या तरतुदी आहेत घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबत कोणत्याही तरतुदी घटनेत नाहीत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 11 नुसार नागरिकत्व बाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे.या अधिकाराचा वापर करुन संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला त्यामध्ये 1980, 1992, 2003, 2005 मध्ये सुधारणा करण्यात आल्या.
कलम 5 – घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व Indian Citizenship
घटनेच्या सुरुवातीला भारताच्या राज्य क्षेत्रात अधिवास करत असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. जर ती व्यक्ती भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती किंवा तिच्या मातापिता पैकी कोणीही एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले होते किंवा ती अशा प्रारंभाच्या लगत पूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यता निवासी आहे.
कलम 6 – पाकिस्तानातून आलेले नागरिक
पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक मानले जाईल जर…
तिच्या माता पिता पैकी किंवा आजा आजी पैकी कोणीही एकाचा भारतात जन्म झाला असेल
अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केले असेल व तेव्हापासून भारताचा निवासी असेल तर
अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केले असेल व घटनेच्या प्रारंभ पूर्वी सक्षम अधिकार्याकडे अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी करून घेतली असल्यास.
कलम 7 – पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व
एक मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाहीत.
कलम 8 – भारताबाहेर अधिवास करणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व
भारताबाहेर राहत असणाऱ्या व्यक्तीस भारतीय नागरिक मानले जाईल. जर…..
त्या व्यक्तीने परदेशातील भारतीय दूतावासात नागरिकत्व साठी अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी केली असेल तर.
कलम 9 – कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही देशाचे स्वेच्छेने नागरिकत्व स्वीकारले असेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही.
कलम 10 – भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील.
कलम 11 – संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबीसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल.
नागरिकत्व कायदा 1955 (Indian Citizenship Act 1955)
कलम 11 नुसार संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला.1955 च्या नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व मिळण्याच्या पाच मार्गांची तरतूद करण्यात आलेली आहे.
- १) जन्म तत्वा द्वारे
- २) वंश तत्वा द्वारे
- ३) नोंदणी तत्वा द्वारे
- ४) स्वीकृती तत्वा द्वारे
- ५) प्रदेशाच्या सम्मिलीकरणा द्वारे
- १) जन्म तत्वा द्वारे Indian Citizenship
26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्यानंतर एक जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल.
एक जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मात्यापित्यांच्या पैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल तर.
3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असलेला जर त्याच्या जन्माच्या वेळी त्यांचे मातापिता दोन्ही भारताचे नागरिक असतील तर किंवा त्याच्या मातापित्यांचे पैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर.
भारतात नियुक्त करण्यात आलेल्या परकीय दूतावासातील अधिकारी व शत्रु परकीयांची मुले भारताचे नागरिकत्व जन्मतात वा द्वारे प्राप्त करू शकत नाहीत.
- २) वंश तत्वा द्वारे Indian Citizenship
26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेल्या व्यक्ती वंश तत्वा द्वारे भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर.
10 डिसेंबर 1992 रोजी किंवा नंतर भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापिता पैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल तर.
3 डिसेंबर 2004 च्या पुढे भारताच्या बाहेर जन्मलेल्या व्यक्ती तत्व आणि भारताचा नागरिक असणार नाही मात्र जन्मानंतर एक वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने जर त्याच्या जन्माची नोंदणी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडे केली असतो भारताचा नागरिक बनू शकेल.
- ३) नोंदणी तत्वा द्वारे Indian Citizenship
भारतीय असणाऱ्या व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सात वर्षे भारतात सामान्यता निवासी आहे.
मूळ भारतीय असणारा आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती
भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सात वर्षे भारतात सामान्यतः निवासी असलेल्या व्यक्ती.
भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांचे अल्पवयीन मुले
पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकांची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झाली आहे.
पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्यांची नोंदणी पाच वर्षापासून भारताचा परकीय नागरिक म्हणून झाली आहे आणि जो नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या पूर्वी एक वर्ष भारतात निवासी आहे.
नोंदणी तत्त्वाने नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तींना विहित नमुन्यात निष्ठेची शपथ घ्यावी लागते.
- ४) स्वीकृती तत्वा द्वारे Indian Citizenship
पुढील पात्रता असणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अर्जावर विचार करून केंद्र शासन त्या स्वीकृत नागरिकत्व बहाल करू शकते.
तो अशा देशाचा नागरिक किंवा प्रजाजन नसावा जेथे भारतीयांना स्वीकृती तत्वा द्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे.
जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल तरी त्याने त्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची अधिसूचना केंद्र शासनाकडे केलेली असावी.
अर्ज करण्याच्या लगत पूर्वीच्या बारा महिन्याच्या काळात त्यांनी भारतात सलग वास्तव्य केले असावे किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा किंवा दोन्ही बाबी अंशतः असाव्यात.
अशा बारा महिन्याच्या लगत पूर्वीच्या 14 वर्षाच्या काळात त्यांनी किमान अकरा वर्षे भारतात वास्तव्य केले असावे किंवा भारत सरकारच्या सेवेत असावे किंवा अंशतः दोन्ही बाबी केलेल्या असाव्यात.
त्याला आठव्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
भारत सरकारचे एखाद्या व्यक्तीस स्वीकृती तत्वा द्वारे नागरिकत्व देताना वरील अटी मधून सूट देऊ शकते.जर त्याने विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता, मानवी प्रगती या क्षेत्रामधील वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान केली असेल तर.
- ५ ) प्रदेशाच्या संमिलीकरणाद्वारे
भारताच्या राज्य क्षेत्रात एखादा प्रदेश सम्मिलित करण्यात आला तर त्या प्रदेशातील व्यक्ती कोणत्या तारखेपासून भारताचे नागरिक ठरतील हे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निश्चित करण्यात येईल.
नागरिकत्व कायदा 1955(Indian Citizenship Act 1955) मध्ये नागरिकत्व संपण्याचे तीन मार्ग सांगण्यात आले आहेत.
- नागरिकत्वाचा त्याग करणे.
- नागरिकत्व संपुष्टात येणे.
- नागरिकत्व काढून घेणे.